Nashik : अकराशे दिव्यांनी उजळला लासलगावच्या भगरीबाबा मंदिराचा परिसर

नाशिक, लासलगाव : पुढारी वृत्तसेवा :  दीपावली म्हणजे लख्ख लख्य दिव्यांचा दीपोत्सव. लखलखत्या दिव्यांनी सर्वांच्याच जीवनाला प्रकाशमय करणारी, प्रकाशाने परिसर आणि जीवन उजळून टाकणारी, फटाक्यांच्या आतीषबाजीने आनंदाला उधाण आणणारी दीपावली म्हणजे संपूर्ण वर्षातील एक मोठा आनंदोत्सव. दिवाळीनिमित्ताने येथील भगरीबाबा मंदिरात अकराशे दिवे प्रज्वलीत करण्यात आले.  वसुबारसच्या शुभ मुहूर्तावर पहिला दिवा ग्रामदैवताला या भावनेने सालाबाद प्रमाणेच …

The post Nashik : अकराशे दिव्यांनी उजळला लासलगावच्या भगरीबाबा मंदिराचा परिसर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अकराशे दिव्यांनी उजळला लासलगावच्या भगरीबाबा मंदिराचा परिसर

Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीत रियल इस्टेट क्षेत्राला मिळणार बूस्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या सर्वच क्षेत्रांवर जागतिक मंदीचे सावट आहे. मात्र, असे असतानाही रियल इस्टेट क्षेत्रावर त्याचा कुठलाही परिणाम दिसून येणार नाही. विशेषत: दिवाळी काळात रियल इस्टेट क्षेत्राला बूस्ट मिळणार असून, बांधकाम व्यावसायिकांनीही ग्राहकांची गरज ओळखून, दिवाळीनिमित्त गृहप्रकल्पांमध्ये विविध योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक ग्राहक आपल्या हक्काच्या घरात प्रवेश करणार …

The post Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीत रियल इस्टेट क्षेत्राला मिळणार बूस्ट appeared first on पुढारी.

Continue Reading Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीत रियल इस्टेट क्षेत्राला मिळणार बूस्ट

Dipotsav 2022 : नाशिककरांकडून गाय-वासराचे मनोभावे पूजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणाऱ्या दिवाळी प्रकाशपर्वाच्या सणाला शुक्रवारी (दि.२१) वसुबारसने प्रारंभ झाला. नाशिककरांनी गाय-वासराचे मनोभाव पुजन करून गो-मातेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दिवाळीनिमित्ताने सर्वत्र चैतन्य आणि आनंद पसरला आहे. शनिवारी (दि.२२) सर्वत्र धनोत्रयोदशी साजरी करण्यात येणार आहे. दोन वर्षाच्या खंडानंतर कोरोना निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करता येत असल्याने नाशिककरांमध्ये यंदा उत्साह अधिक आहे. …

The post Dipotsav 2022 : नाशिककरांकडून गाय-वासराचे मनोभावे पूजन appeared first on पुढारी.

Continue Reading Dipotsav 2022 : नाशिककरांकडून गाय-वासराचे मनोभावे पूजन

Diwali 2022 : महागाईने फराळाचा गोडवा तिखट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येत्या शनिवार (दि.22)पासून प्रकाशपर्वाला प्रारंभ होत असून, सध्या घरोघरी दिवाळीनिमित्त फराळ बनविले जात आहेत. शिवाय बाजारातही रेडिमेड फराळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी केली जात असल्याचा आनंद बघावयास मिळत असला तरी, महागाईमुळे खिशाला बसत असलेली झळ फराळाचा गोडवा काहीसा तिखट करीत आहे. सध्या फराळाचे …

The post Diwali 2022 : महागाईने फराळाचा गोडवा तिखट appeared first on पुढारी.

Continue Reading Diwali 2022 : महागाईने फराळाचा गोडवा तिखट

दीपोत्सव : मिठाई दुकानदारांना ठोठावला 19 हजारांचा दंड

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देवळाली कॅन्टोन्मेंट हद्दीतील मिठाई दुकानांची लष्कराच्या कॅन्टोन्मेंट आरोग्य विभाग व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने तपासणी करत 10 दुकानांतील मिठाईचे नमुने मुंबईत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. तीन दुकानांमध्ये स्वच्छतेबाबत त्रुटी आढळल्याने त्यांना कॅन्टोन्मेंट प्रशासन नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच प्लास्टिक वापराबद्दल दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करत 19 हजार रुपये …

The post दीपोत्सव : मिठाई दुकानदारांना ठोठावला 19 हजारांचा दंड appeared first on पुढारी.

Continue Reading दीपोत्सव : मिठाई दुकानदारांना ठोठावला 19 हजारांचा दंड

‘दिवाळी’निमित्त नाशिक मनपाची वसुली मोहीम; पंचवटीत प्लास्टिक विरोधात कारवाई

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर असताना प्लास्टिकसह कॅरिबॅगचा अतिवापर होऊ नये, यासाठी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने पंचवटी परिसरात केलेल्या कारवाईत दुकानदारांकडून तब्बल 309 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तर 25 हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन पंचवटी विभागाकडून प्लास्टिक वापरणार्‍यांच्या विरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली …

The post ‘दिवाळी’निमित्त नाशिक मनपाची वसुली मोहीम; पंचवटीत प्लास्टिक विरोधात कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading ‘दिवाळी’निमित्त नाशिक मनपाची वसुली मोहीम; पंचवटीत प्लास्टिक विरोधात कारवाई

दीपोत्सव : फटाके बाजारात महागाईचे ‘बॉम्ब’

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके फटाक्यांच्या उत्पादनाचा उशिरा सुरू झालेला हंगाम, फटाके तयार करण्यासाठी लागणार्‍या कागदाची टंचाई, इतर रसायनांच्या वाढलेल्या किंमती, इंधन दरवाढीमुळे महागलेली वाहतूक, कर्मचार्‍यांचा रोजगार या सर्व कारणांमुळे उत्पादन खर्च वाढल्याने यावर्षी फटाक्यांच्या किंमती तब्बल 40 ते 50 टक्क्यांनी वाढल्या असून, दिवाळीच्या फटाके बाजारात यंदा महागाईचा ‘बॉम्ब’ उडणार आहे. गणेशोत्सव, दसरा यानंतर आता …

The post दीपोत्सव : फटाके बाजारात महागाईचे ‘बॉम्ब’ appeared first on पुढारी.

Continue Reading दीपोत्सव : फटाके बाजारात महागाईचे ‘बॉम्ब’

दीपोत्सव : फटाके विक्रेत्यांसाठी नियमांची ‘माळ’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात फटाके विक्री करणार्‍यांसाठी नियमावली असून, नियमांचे पालन करून फटाके विक्री करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. नियमांचे पालन न केल्यास संबंधितांना कारावास, आर्थिक दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे घरात फटाक्यांचा साठा करून त्याची विक्री करणार्‍यांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. दिवाळीत प्रदूषण होऊ नये तसेच फटाके विक्री करताना कोणत्याही प्रकारची …

The post दीपोत्सव : फटाके विक्रेत्यांसाठी नियमांची ‘माळ’ appeared first on पुढारी.

Continue Reading दीपोत्सव : फटाके विक्रेत्यांसाठी नियमांची ‘माळ’