नाशिकचे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे कोट्यधीश, इतकी आहे संपत्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांनी सोमवारी (दि. २९) उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत त्यांनी जाेडलेल्या शपथपत्रात एकूण १४ कोटी ८० लाख ४९ हजार १९१ रुपयांंची मालमत्ता दाखविली आहे. त्यांच्यावर १९ लाखांचे कर्ज असून विशेष म्हणजे नावावर एकही गुन्हा दाखल नाही. (Rajabhau Waje) राजाभाऊ वाजे यांचे शिक्षण …

Continue Reading नाशिकचे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे कोट्यधीश, इतकी आहे संपत्ती

नाशिकला महायुतीच्या उमेदवाराबाबत श्रेष्ठी निर्णय घेतील : भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शांतीगिरी महाराजांनी सोमवार (दि. २९) शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला. अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना शिवसेनेकडून आपण अर्ज दाखल केल्याचे सांगितले. महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी महाराजांनी शिंदे गटाच्या सेनेचे नाव घेतल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. याबाबत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांना विचारल्यानंतर त्यांनी याबाबत आपल्याला काहीच माहित नसल्याचे …

Continue Reading नाशिकला महायुतीच्या उमेदवाराबाबत श्रेष्ठी निर्णय घेतील : भुजबळ

Jayant Patil | कांदाप्रश्नी भाजपकडून महाराष्ट्राची फसवणूक : जयंत पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कांदा निर्यातबंदी उठवण्याची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी धुडकावून लावणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही गुजरातच्या २ हजार टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीचा निर्णय घेतला. बांगलादेश, श्रीलंका, भुतानला कांदा निर्यातीला परवानगी दिल्याचा जुनाच आदेश दाखवत महाराष्ट्राची फसवणूक केली. महाराष्ट्राला दुय्यम वागणूक देणाऱ्या भाजपला केंद्रातील सत्तेतून हाकलून लावा, अशा शब्दांत महाविकास आघाडीच्या …

Continue Reading Jayant Patil | कांदाप्रश्नी भाजपकडून महाराष्ट्राची फसवणूक : जयंत पाटील

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अॅक्शन मोडवर, चार सराईतांवर तडीपारीची कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यासह तडीपारीची कारवाई करण्याचा पोलिसांकडून सपाटा सुरू आहे. अशाच आणखी चार सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीतील नवाज अकील शेख (२५, रा. घर. नं. १६, गरीब नवाज कॉलनी, वडाळा गाव) व किरण ऊर्फ बिटवा रमेश मल्हारी (२९, रा. ए-२, …

Continue Reading निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अॅक्शन मोडवर, चार सराईतांवर तडीपारीची कारवाई

आरक्षणाबाबत मराठा उमेदवारांना भूमिका मांडावी लागणार, सकल मराठा समाजाच्या बैठकीत ठराव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध मुद्यांवर भूमिका मांडण्यासाठी नाशिक लोकसभा निवडणूक रिंगणातील मराठा उमेदवारांना एका व्यासपीठावर आणण्याचा ठराव सकल मराठा समाजाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा समन्वय समिती गठीत करण्यात येत असून, या समितीच्या माध्यमातून मराठा उमेदवारांना पत्र दिले जाणार आहे. नाशिकच्या शिवतीर्थावर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या नेत्यांची बैठक पार …

Continue Reading आरक्षणाबाबत मराठा उमेदवारांना भूमिका मांडावी लागणार, सकल मराठा समाजाच्या बैठकीत ठराव

नाशिकच्या जागेचा आज निर्णय शक्य : भुजबळ मुंबईत, कोकाटेंचाही दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महायुतीत नाशिकच्या उमेदवारीचा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. उमेदवारीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्यानंतर सिन्नरचे माजी आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी उमेदवारीवर केलेल्या दाव्यानंतर शुक्रवारी (दि.२६) मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई गाठली तर, भाजपनेही हालचाली गतिमान करत नाशिकवर ताबा मिळविण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत. शनिवारी (दि.२७) महायुतीकडून नाशिकच्या …

Continue Reading नाशिकच्या जागेचा आज निर्णय शक्य : भुजबळ मुंबईत, कोकाटेंचाही दावा

पहिल्याच दिवशी हेमंत गोडसेंनी घेतला उमेदवारी अर्ज, चर्चेला उधाण

पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारपासून (दि. २६) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. 3 मे पर्यंत ही प्रक्रीया चालणार आहे. आज पहिल्याच दिवशी छगन भुजबळ यांचे समर्थक दिलीप खैरे यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यापाठोपाठ आता नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनीही उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण …

Continue Reading पहिल्याच दिवशी हेमंत गोडसेंनी घेतला उमेदवारी अर्ज, चर्चेला उधाण

नाशिक, दिंडाेरीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक व दिंडाेरी लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारपासून (दि.२६) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत अर्ज विक्री व दाखल करता येईल. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ३ मेपर्यंत आहे. निवडणूकीकरीता प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा मुख्यालयाला छावणीचे …

Continue Reading नाशिक, दिंडाेरीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज

माघार घेऊनही भुजबळांचा दावा कायम, नाशिक मतदारसंघात पुन्हा ट्विस्ट

नाशिक : दिल्लीश्वरांनी नाव सूचवून महिना उलटला तरी आपले नाव जाहीर न झाल्याने छगन भुजबळांनी आपण नाशिकमधून उमेदवारी करणार नसून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर नाशिकच्या जागेसाठी शिंदे गटाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात होते. मात्र, नाशिक लोकसभा मतदासंघातील महायुतीच्या जागेचा हा घोळ अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. कारण, मी माघार घेतली असली …

Continue Reading माघार घेऊनही भुजबळांचा दावा कायम, नाशिक मतदारसंघात पुन्हा ट्विस्ट

महायुतीत अगोदरच तिढा त्यात मनसेला हवा मानपानाचा विडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महायुतीला बिनशर्त पाठिंबा देऊनदेखील विचारात घेतले जात नसल्याने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा देताना, ‘बोलावलं, तरच प्रचारासाठी जा.’ असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला होता. त्यानंतर राज्यातील विविध मतदारसंघांत मनसे कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांकडून मानपान दिला जात नसल्याचा आरोप करीत, प्रचारातून अलिप्ततेची भूमिका घेतली होती. अशीच …

Continue Reading महायुतीत अगोदरच तिढा त्यात मनसेला हवा मानपानाचा विडा