नगरसेवकांना खरेदी करता येणार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर; रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी आयुक्तांचा निर्णय 

नाशिक : प्रभागांमध्ये विविध विकासकामांसाठी नगरसेवकांना दिल्या जाणाऱ्या व्यक्तिगत निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्यास आयुक्त कैलास जाधव यांनी परवानगी दिली आहे. एका नगरसेवकाला महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीतून प्रत्येकी दहा ऑक्सिज...

Continue Reading नगरसेवकांना खरेदी करता येणार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर; रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी आयुक्तांचा निर्णय 

उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच प्रसुती, कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण अधोरेखित 

निफाड (जि. नाशिक) : एकीकडे ग्रामीण रुग्णालयांना कोविड केअर सेंटरचा दर्जा दिला जात असताना दुसरीकडे मात्र सामान्य रुग्णांना उपचार मिळण्यास अडचणी येत आहे. निफाड उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरु असल्याने प्रवेशद्वारावरच महिलेची प्रसुती झाल्या...

Continue Reading उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच प्रसुती, कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण अधोरेखित 

मालेगाव सामान्य रुग्णालयात परिस्थिती गंभीर! पहाटेपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा

मालेगाव (जि. नाशिक)  : शहरातील सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन साठा अंतिम टप्प्यात आहे. गुरुवारी (ता. १५) पहाटेपर्यंत पुरेल एवढाच साठा असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांनी ‘सकाळ’ला सांगितले. यामुळे आरोग्य यंत्रणेसह रुग्ण व त्यांचे नातेवाईक चिंत...

Continue Reading मालेगाव सामान्य रुग्णालयात परिस्थिती गंभीर! पहाटेपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा

नाशिकमध्ये कामगारांना कंपन्यांकडून ट्रान्स्पोर्टची सोय; ओळखपत्रावरही करता येणार प्रवास 

नाशिक : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत १५ दिवसांची संचारबंदी लागू केली असली तरी कारखाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याने उद्योग-व्यवसायावरील आर्थिक संकट टळले आहे. नाशिकमधील सातपूर, अंबडसह सिन्नर, गोंदे, इगतपु...

Continue Reading नाशिकमध्ये कामगारांना कंपन्यांकडून ट्रान्स्पोर्टची सोय; ओळखपत्रावरही करता येणार प्रवास 

संतापजनक प्रकार! पॅकिंग किटअभावी मृतदेह ६ तास पडून; पाचशेचे कीट देतायत हजार रुपयांना, पाहा VIDEO

नाशिक  : येथील हॉस्पिटलमध्ये मृतदेहाला पॅक करण्यासाठी महापालिकेत पॅकिंग कीट नसल्यामुळे मृतदेह सहा तास पडून राहिला. येथील कर्मचाऱ्यांनी चक्क बाहेरून विकत किट आणून दिले. पाचशे रुपये तिकीट हजार रुपयाला आणून दिल्याने नातेवाईकांनी आश्चर्य व्यक्त केले. या वेळी बिटको हॉस्पिटलमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी बिटको प्रशासनाशी वाद घालत परिस्थिती सुधारण्याची विनंती केली. 

धंदा करीत असल्याचा आरोप

बिटको हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये एक मृतदेह पॅकिंग किट अभावी सहा तास तसाच पडून होता. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पॅकिंग किट बाहेरून आणायला लावले. ही पॅकिंग किट एका कर्मचाऱ्याने एक हजार रुपयाला आणून दिले. बाजारात पाचशे रुपयेची पॅकिंग किट हजार रुपयाला आणून दिल्याने नातेवाईकांनी आश्चर्य व्यक्त केले. येथील बिटको कोविड सेंटर येथे स्वच्छता कर्मचारी सध्या वैद्यकीय उपकरणांवर ज्यादा पैसे आकारत धंदा करीत आहे. सामाजिक कार्यकर्ते राम बाबा पठारे, माजी नगरसेवक हरीश भडांगे व कार्यकर्त्यांनी बिटको सेंटर प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. बिटको हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांच्या कमी संख्येमुळे हॉस्पिटलमध्ये मृत्युदर वाढत असल्याचे दिसून येत असून शासनाने लवकर कर्मचारी नियुक्त करावे, अशी मागणी होत आहे. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

बिटको हॉस्पिटलमध्ये कर्मचारी कमी असल्याने रुग्णांकडे लक्ष देण्यासाठी कोणीच नाही. पर्यायाने मृत्यू ओढावत आहे. या ठिकाणी सुविधा कमी आहे, किती दिवस झाले तरी नाशिक महापालिकेने येथे कर्मचारी भरती केले नाही. ही परिस्थिती अशीच राहिली तर मृत्युदर वाढत जाऊन सामान्य कष्टकरी शोषित गरिबाचे कुटुंब उद्ध्वस्त होतील. 
- रामबाबा पठारे, माथाडी कामगार संघटना 

Continue Reading संतापजनक प्रकार! पॅकिंग किटअभावी मृतदेह ६ तास पडून; पाचशेचे कीट देतायत हजार रुपयांना, पाहा VIDEO

कुक थांबले, कामगार गावाकडे..! हॉटेल व्यावसायिकांची व्यथा; परप्रांतीय कामगार परतू लागले 

नाशिक : ब्रेक द चेन अंतर्गत संचारबंदीची घोषणा झाल्यानंतर कारखाने, ज्वेलरी, हॉटेल, तसेच बांधकाम साईटसवर काम करणारे कामगार गावाकडे परतू लागल्याने किमान महिनाभरासाठी अर्थचक्र मंदावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षभरापासून सर्वाधिक आर्थिक फटका बसलेल्या हॉटेल व्यवसायिकांना फुड पार्सल देता येणार असले तरी कामगार सांभाळणे अवघड असल्याने सुटी देण्यात आली आहे. 

शहरात छोटी-मोठी साडे पाचशेहून अधिक हॉटेल्स आहेत. गेल्यावर्षी कोरोनामुळे तब्बल वर्षभर हॉटेल बंद राहिली. डिसेंबर अखेरीस हॉटेल सुरू झाले असले तरी पूर्ण क्षमतेने सुरू नव्हती. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही संचारबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आल्याने हॉटेल व्यवसाय ताकदीने उभे राहण्यास किती कालावधी लागेल, याची शाश्‍वती नाही. संचारबंदीत फुड पार्सल उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आल्याने हॉटेलमधील कुक स्थीरावणार आहे, परंतु हॉटेलमधील कामगाराचे वेतन आता देणे शक्य नसल्याने अशांना कामाला सुट्टी द्यावी लागत असल्याचे चित्र आहे. ज्वेलरी व्यवसायात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. विशेषत: पश्‍चिम बंगालमधील कामगार दागिने घडणावळीचे कामे करतात. दुकाने बंद राहणार असल्याने व सोने मागणी घटल्याने कामगारांना सुटी द्यावी लागली आहे. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू 

बांधकाम व्यवसायावर परिणाम 

बांधकामांच्या साईटसवर मजुरांची राहण्याची व्यवस्था केल्यास त्या साईटस सुरू ठेवता येणार आहे. मात्र, कोरोना संसर्गाची परिस्थिती सर्वत्र सारखी असल्याने त्यात महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाल्याने परप्रांतिय कामगारांनी घरचा रस्ता धरला आहे. ज्या बांधकामांच्या साईटसवर मटेरियल्स येऊन पडले आहे, त्या कामात जेवढे भागेल तेवढेच काम होणार आहे. सिमेंट, रेतीचा साठा आठ दिवसांपेक्षा अधिक काळ करू शकत नसल्याने फार तर आठ दिवस शहरातील साईटस सुरु राहतील. त्यानंतर आपोआप साईटस बंद होणार असल्याने बांधकाम व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

Continue Reading कुक थांबले, कामगार गावाकडे..! हॉटेल व्यावसायिकांची व्यथा; परप्रांतीय कामगार परतू लागले 

लॉकडाउनमध्ये द्राक्षाची गोडी कायम! देशांतर्गत बाजारात ३५ ते ५४ रुपये किलोचा दर 

कसबे सुकेणे (जि. नाशिक) : वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ३० एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात लाॕकडाउन जाहीर केला आहे. या काळातही शेतीसह अत्यावश्यक सेवा व वाहतूक सुरळीत सुरू राहणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. लॉकडाउननंतरही द्राक्षाची गोडी कायम राहणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

पंधरा दिवसांपूर्वी अल्प दराने शेतकऱ्यांना द्राक्ष विकण्याची वेळ आली. मात्र, आता द्राक्ष हंगामाचा शेवट जसजसा जवळ येऊ लागला आहे तशी द्राक्षांची मागणी वाढत आहे. द्राक्ष हंगामात केवळ १० टक्क्यांपेक्षाही कमी द्राक्षे शिल्लक असल्याने त्या द्राक्षांना चांगला भाव मिळत आहे. देशांतर्गत बाजारपेठेसाठी सरासरी ३५ ते ४५ व निर्यातक्षम द्राक्षाची ५० ते ६० रुपये दराने विक्री होत आहे. त्यामुळे अगोदरच्या द्राक्षबागांची नुकसानभरपाई शेवटच्या द्राक्षबागांमध्ये निघेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. अर्थात, ज्या द्राक्षबागा आता सुरू आहेत त्या मागील वर्षी लॉकडाउनच्या काळात कवडीमोल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. या वर्षीदेखील शेतीसाठीही लॉकडाउन जाहीर झाला असता तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्‍यांची डोकेदुखी वाढली असती. मात्र, महाराष्ट्र शासनाने शेतीहिताचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू  

द्राक्ष हंगामाचा शेवट गोड होणार असून, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे. मात्र, मागील काही काळाचा विचार करता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरून काढणे तरीही शक्य होणार नाही. 
-प्रकाश मोगल, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक, मौजे सुकेणे 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

Continue Reading लॉकडाउनमध्ये द्राक्षाची गोडी कायम! देशांतर्गत बाजारात ३५ ते ५४ रुपये किलोचा दर