नाशिक : यात्रेत मौजमजेसाठी चोरी करणारे दोघे जेरबंद

ओझर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; केवळ यात्रेत मौजमजा करण्यासाठी चोरी करणाऱ्या दोघांसह तीन अल्पवयीन मुलांना नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले असून, त्यातील दोघांना अटक केली आहे. आगसखिंड येथील अमिर स्क्रॅप सेंटर दुकानातून रात्री टेबलच्या ड्राॅवरमध्ये असलेली ७५ हजार रुपयांची रोकड व मोबाइल फोन चोरीस गेला होता. याबाबत सिन्नर पोलिसांसह …

The post नाशिक : यात्रेत मौजमजेसाठी चोरी करणारे दोघे जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यात्रेत मौजमजेसाठी चोरी करणारे दोघे जेरबंद

ढकांबे पेट्रोलपंप दरोडा प्रकरणी दोन संशयित ताब्यात

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील ढकांबे शिवारातील पेट्रोलपंपावर दरोडा प्रकरणातील दोन संशयितांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे. पालखेड चौफुली परिसरात सापळा रचून ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे सुनील रमेश डंबाळे (वय २४) व ज्ञानेश्वर सदू गायकवाड (वय २१) दोघे रा. कापाची करंजाळी, ता. दिंडोरी अशी …

The post ढकांबे पेट्रोलपंप दरोडा प्रकरणी दोन संशयित ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading ढकांबे पेट्रोलपंप दरोडा प्रकरणी दोन संशयित ताब्यात

नगरसूल दरोड्यातील नऊ संशयित आरोपी जेरबंद 

नगरसूल (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; येथील कमोदकर, कटके-कापसे वस्तीलगत व राजकुमार शुक्ला यांच्या वस्तीवर सशस्त्र दरोडा टाकून मारहाणीसह लूट करणाऱ्या नऊ संशयित आरोपींना येवला पोलिसांनी 48 तासांत जेरबंद केले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यांनी सोमवार (दि. ३०) पर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. लखन जनार्दन पवार (वय १९), राजू …

The post नगरसूल दरोड्यातील नऊ संशयित आरोपी जेरबंद  appeared first on पुढारी.

Continue Reading नगरसूल दरोड्यातील नऊ संशयित आरोपी जेरबंद 

Nashik Drug Case : शहरातील पाच ड्रग्ज पेडलरांच्या कोठडीत वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहरात एमडी पुरवणाऱ्या पाच जणांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहेत. संशयितांनी जिल्ह्यात एमडीचा साठा लपवल्याचे पोलिस तपासात समोर आले असून, पोलिसांनी एमडीचा शोध सुरू केला आहे. तर ‘छोटी भाभी’ ड्रग्ज प्रकरणातील संशयित सलमान फलकेचे राजकीय कनेक्शन समोर आल्याने आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. (Nashik Drug Case ) नाशिक : चक्क विशेष …

The post Nashik Drug Case : शहरातील पाच ड्रग्ज पेडलरांच्या कोठडीत वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Drug Case : शहरातील पाच ड्रग्ज पेडलरांच्या कोठडीत वाढ

‘छोटी भाभी’ ला ड्रग्ज पुरवणाऱ्यास पोलिस कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; वडाळा गावात एमडी (मेफेड्रॉन) विक्री करणाऱ्या संशयित ‘छोटी भाभी’च्या ड्रग्ज तस्करीतील गुन्हेगारांची साखळी उघड होत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून सलमान शकील अहमद उर्फ फालके (३०) यास अटक केली आहे. हा संशयित छोटी भाभीला एमडी पुरवत असल्याचे समोर आले आहेत. शहर पोलिसांनी याप्रकरणात आत्तापर्यंत चार संशयितांना अटक …

The post 'छोटी भाभी' ला ड्रग्ज पुरवणाऱ्यास पोलिस कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading ‘छोटी भाभी’ ला ड्रग्ज पुरवणाऱ्यास पोलिस कोठडी

Nashik Crime : सासऱ्याला भोसकणाऱ्या जावयाला अखेर अटक

सातपूर (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; येथील प्रबुद्धनगरमध्ये कौटुंबिक वादातून सासऱ्यावर चाकूहल्ला करीत त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या जावयाला अखेर पोलिसांनी अटक केली. गेल्या काही दिवसांपासून तो पोलिसांच्या हातावर तुरी देत निसटण्यात यशस्वी ठरत होता. याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर पोलिस ठाणे हद्दीतील प्रबुद्धनगर येथील एका कुटुंबात दिलीप सखाराम वाटोरे (६०) यांच्या मुलीला जावई देवीदास कांबळे …

The post Nashik Crime : सासऱ्याला भोसकणाऱ्या जावयाला अखेर अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : सासऱ्याला भोसकणाऱ्या जावयाला अखेर अटक

मालेगाव एक्साईजचे छापासत्र, तिघांना अटक

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा; अमली पदार्थ विरोधी जनजागरण चळवळ व्यापक करुन अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात मोहीम उघडली. मालेगाव तालुक्यातील सौदाणे, आघार तसेच बागलाण तालुक्यातील औंदाणे या गावातील हातभटटी निर्मिती व विक्री केंद्रावर छापेमारी झाली. किराणा दुकान, टपऱ्यांवर अवैध मद्य विक्री करणाऱ्यांवर …

The post मालेगाव एक्साईजचे छापासत्र, तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव एक्साईजचे छापासत्र, तिघांना अटक

एमडी विक्रीत छोटी भाभीच्या पतीसह दोघे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; अमली पदार्थ विरोधी पथकाने सामनगाव आणि वडाळा गावातील एमडी विक्री प्रकरणात दोघांना अटक केली आहे. यात सुरुवातीस अटक केलेल्या छाेटी भाभीचा पती इम्तियाज ऊर्फ चिकन्या ऊर्फ राजा उमर शेख (३२, वडाळा गाव) व अनिल ऊर्फ गुड्ड्या शांताराम चौधरी (१९) या तरुणाचा समावेश आहे. (Nashik Drug Case) शहर पोलिस एमडी विक्री …

The post एमडी विक्रीत छोटी भाभीच्या पतीसह दोघे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading एमडी विक्रीत छोटी भाभीच्या पतीसह दोघे गजाआड

Nashik News : कसारा घाटातील मॉब लिंचिंगमधील चौघे फरार अखेर जेरबंद

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; कसारा घाटात गायींना घेऊन जाणारा टेम्पो अडवून कत्तलीसाठी नेत असलेल्या जनावरांची सुटका करताना जमावाच्या बेदम मारहाणीत दोघांच्या मृत्यूनंतर फरार असलेल्या चौघा संशयितांना इगतपुरी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटक केली. ( Nashik News ) ८ जून कसारा घाटात मॉब लिंचिंगचा हा भीषण प्रकार घडला होता. या गुन्ह्यात फरार असलेले सूरज …

The post Nashik News : कसारा घाटातील मॉब लिंचिंगमधील चौघे फरार अखेर जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : कसारा घाटातील मॉब लिंचिंगमधील चौघे फरार अखेर जेरबंद

Nashik Crime : शहरातील अट्टल चोर पोलिसांच्या जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहरात चेनस्नॅचिंग, मोबाइल चोरीसह दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनिट १ ने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यातही पोलिसांना यश आले आहे. पोलिस ठाण्यात दाखल विविध गुन्ह्यांचा युनिट १ कडून तपास सुरू असताना पोलिस नाइक काठे यांना गुप्त बातमीदारामार्फत सराईताबाबतची माहिती मिळाली. नफीज सय्यद याने साेनसाखळी चोरी व …

The post Nashik Crime : शहरातील अट्टल चोर पोलिसांच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : शहरातील अट्टल चोर पोलिसांच्या जाळ्यात