Nashik Crime : तलवारी घेवून फिरणाऱ्या तिघांना अटक

नाशिकरोड : येथील पोलीस स्टेशन हद्दीत धारदार हत्यार बाळगणाऱ्या तिघा तरुणांना नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली. यासंदर्भात तिघांवर गुन्हा दाखल झाला असून जीवघेणी हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत. गुप्त बातमीदारामार्फत सपोनि गणेश शेळके यांना द्वारका परिसरातून १०७७ क्रमांकाच्या रिक्षात बसून तीन जण तलवारी घेवून नाशिकरोडच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी …

The post Nashik Crime : तलवारी घेवून फिरणाऱ्या तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : तलवारी घेवून फिरणाऱ्या तिघांना अटक

नाशिक : युवकाच्या खून प्रकरणी अंबड पोलिसांकडून तिघांना अटक

नाशिक(सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत महालक्ष्मीनगर परिसरातील हनुमान मंदिर चौकात मयूर दातीर याचा खुन करून फरार झालेल्या तिघांनाही दहा तासाच्या आत अंबड पोलिसांनी रात्री त्र्यंबकेश्वर जवळील पाड्यावरून ताब्यात घेऊन अटक केली आहे . या बाबत पोलिसांनी सांगितले की, मयूर केशव दातीर (वय २०, रा. महालक्ष्मीनगर अंबड) हा महालक्ष्मीनगर परिसरातील हनुमान मंदिर चौकात …

The post नाशिक : युवकाच्या खून प्रकरणी अंबड पोलिसांकडून तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : युवकाच्या खून प्रकरणी अंबड पोलिसांकडून तिघांना अटक

नाशिक क्राईम : तलवारीने केक कापणारा गजाआड

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा आडगाव पोलिस ठाणे हद्दीतील शिलापूर येथे काही मुलांनी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करत परिसरात दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नांची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबंधिताना अटक केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच गुन्हे शोध पथकाने याबाबत तपास यंत्रणा हलविली. संशयित गणेश कमलाकर दिवे (१९, रा. एकलहरे) आणि शिलापूर गावातील एक विधिसंघर्षित बालकाला …

The post नाशिक क्राईम : तलवारीने केक कापणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : तलवारीने केक कापणारा गजाआड

सावधान! आधारकार्ड अपडेट करताय? नाशिकमध्ये फसवणूक करणारे तिघे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आधारसेवा केंद्रामार्फत आधारकार्ड अपडेशन करताना बायोमेट्रिक फिंगर स्कॅनरद्वारे तिघांनी नागरिकांच्या अंगठ्यांचे ठसे संकलित केले. त्यानंतर सीएससी डीजीपे या ऑनलाइन मनी ट्रान्सफर सर्व्हिस ॲपमध्ये नागरिकांचे ठसे वापरून त्यांच्या बँक खात्यातून लाखो रुपये परस्पर काढून गंडा घातला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी गंडा घालणाऱ्या तिघांना पकडले आहे. तिघांनी आधार ईनेबल …

The post सावधान! आधारकार्ड अपडेट करताय? नाशिकमध्ये फसवणूक करणारे तिघे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading सावधान! आधारकार्ड अपडेट करताय? नाशिकमध्ये फसवणूक करणारे तिघे गजाआड

Nashik Crime : रिक्षा प्रवासात चोरी करणारी परप्रांतीय टोळी गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रिक्षा प्रवास करण्याच्या बहाण्याने प्रवाशांकडील किमती ऐवज चोरणाऱ्या परप्रांतीय टोळीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गजाआड केले. तिघांकडे केलेल्या चौकशीत शहरातील ३ गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी त्यांच्याकडून तीन लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. साजिद वाजिद अली (३९), मुस्तकीन बुंदू पस (३९) आणि सोनू उर्फ मोहम्मद आबिद मोहम्मद …

The post Nashik Crime : रिक्षा प्रवासात चोरी करणारी परप्रांतीय टोळी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : रिक्षा प्रवासात चोरी करणारी परप्रांतीय टोळी गजाआड

Malegaon Murder : १२ तासांच्या आत चौघे मारेकरी जेरबंद

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सोयगावमधील इंदिरानगर भागात मंगळवारी (दि.११) भरदुपारी झालेल्या लावण्यात कॅम्प पोलिसांना यश आले. पाचपैकी चौघा संशयित मारेकऱ्यांना अटक झाली असून, त्यांना बुधवारी (दि. १२) मालेगाव न्यायालयात हजर केले असता १५ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. घटनेत बालंबाल बचावलेले दादाजी काशिनाथ ..गुंजाळ (४०, रा. गवळीवाडा) यांनी कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली …

The post Malegaon Murder : १२ तासांच्या आत चौघे मारेकरी जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Malegaon Murder : १२ तासांच्या आत चौघे मारेकरी जेरबंद

धुळे : गावठी बनावटीची मशीनगन, 20 पिस्टल, 280 जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यातील पळासनेर गावाजवळ वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणे गुन्हे शाखेने केली असून या आरोपीकडून एक मशीन गन, वीस पिस्टल आणि 280 जिवंत काढतुस जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून हा शस्त्रसाठा नेमका या आरोपीने कशासाठी आणला …

The post धुळे : गावठी बनावटीची मशीनगन, 20 पिस्टल, 280 जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : गावठी बनावटीची मशीनगन, 20 पिस्टल, 280 जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला अटक

नाशिक : मोबाइल चोरीच्या संशयावरून तरुणावर हल्ला; दोघांना अटक, तिसरा फरार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मोबाइल चोरल्याचा संशय घेत तिघांनी मिळून एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना राज्य कर्मचारी वसाहत परिसरात घडली. यात शुभम किरण राजगुरू हा तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. शुभमची पत्नी ऋतुजा राजगुरू हिने दिलेल्या फिर्यादीनुसार, गंगापूर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा …

The post नाशिक : मोबाइल चोरीच्या संशयावरून तरुणावर हल्ला; दोघांना अटक, तिसरा फरार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोबाइल चोरीच्या संशयावरून तरुणावर हल्ला; दोघांना अटक, तिसरा फरार

Nashik Sinner : भूमिअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचारी लाच घेताना जाळ्यात

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा | येथील भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील परीरक्षण भूमापक महिला कर्मचाऱ्यास ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सोमवारी (दि.१०) दुपारी दीडच्या सुमारास भूमिअभिलेख कार्यालयातच हा सापळा यशस्वी झाला. प्रतिभा दत्तात्रय करंजे (४२) असे महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. (Nashik Sinner) तालुक्यातील मनेगाव येथील तक्रारदाराने सिटी सर्व्हे नंबर …

The post Nashik Sinner : भूमिअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचारी लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Sinner : भूमिअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचारी लाच घेताना जाळ्यात

नाशिक : एटीएम फोडणारी युपीतील टोळी गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्रीतून तीन एटीएम फोडण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या परप्रांतिय टोळीतील तिघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. या टोळीतील संशयितांविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असून टोळीचा मुख्य सुत्रधार पोलिस वाहनांच्या धडकेत ठार झाला आहे. टाेळीतील एकाकडून पोलिसांनी दोन देशी बनावटीचे पिस्तुल, चार काडतुसे, कोयता अशी …

The post नाशिक : एटीएम फोडणारी युपीतील टोळी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एटीएम फोडणारी युपीतील टोळी गजाआड