उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत श्यामराव भोसले ‘शिवबंधना’त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- माजी मंत्री बबन घोलप शिंदे गटात प्रवेश करत असल्याने हादरा बसलेल्या शिवसेनेच्या उबाठा गटाला नाशिक रोड परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्यामराव भोसले यांच्या पक्षप्रवेशाने काहीसा दिलासा मिळाला आहे. भोसले यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवबंधन बांधले. उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले …

The post उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत श्यामराव भोसले 'शिवबंधना'त appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत श्यामराव भोसले ‘शिवबंधना’त

महामार्गावर घंटागाडीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

 सिडको . : पुढारी वृत्तसेवा- जुन्या जकात नाक्यासमोर नाशिक मुंबई महामार्गावर घंटागाडीने दुचाकी ला दिलेला अपघातात दुचाकी चालक ठार झाल्याची घटना घडली आहे. तर एक जण जखमी आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कलाम सुलेमान अन्सारी (वय ३९, रा खोडाळा, ता. मोखाडा जि पालघर ) असे मयताचे नाव आहे. तर प्रदीप पांडुरंग शिंदे हा दुचाकीवर मागे …

The post महामार्गावर घंटागाडीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading महामार्गावर घंटागाडीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

वाळूच्या डंपरची ट्रॅक्टरला धडक, कांद्याचा महामार्गावर सडा;

सटाणा(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– बागलाण तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वीरगावजवळ वाळूच्या डम्परने पाठीमागून दोघा ट्रॅक्टरला धडक दिल्याने एक ट्रॅक्टरचालक गंभीर जखमी झाला असून, रस्त्यावर कांदा सांडून शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावरून खानदेशकडून नाशिकच्या दिशेने मोठ्या प्रमाणात डंपरमधून वाळू वाहतूक होत असते. भरधाव वेगाने होणारी ही वाळू वाहतूक अपघातांना निमंत्रण ठरत आहे. …

The post वाळूच्या डंपरची ट्रॅक्टरला धडक, कांद्याचा महामार्गावर सडा; appeared first on पुढारी.

Continue Reading वाळूच्या डंपरची ट्रॅक्टरला धडक, कांद्याचा महामार्गावर सडा;

Nashik News | प्रसंगावधान राखून 15 ही कामगार पळाले, मोठा अनर्थ टळला

सिन्नर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मुसळगाव येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीतील (स्टाइस) त्र्यंबक प्लास्टीक या कारखान्याला शुक्रवारी (दि.5) दुपारी 4.25 च्या सुमारास अचानक भीषण आग लागली. सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरी कारखान्यातील मशिनरींचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.  इलेक्ट्रीक शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. मुसळगाव येथील त्र्यंबक प्लास्टीक या …

The post Nashik News | प्रसंगावधान राखून 15 ही कामगार पळाले, मोठा अनर्थ टळला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News | प्रसंगावधान राखून 15 ही कामगार पळाले, मोठा अनर्थ टळला

पाणी टंचाईने घेतला बळी! माय लेकींचा विहिरीतून पाणी काढताना पडून मृत्यू

मालेगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- तालुक्यातील झोडगे येथे गावाजवळ असलेल्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या माय लेकीचा गुरुवारी (दि.4) रोजी विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. निताबाई जाधव (वय 47) व इच्छामणी जाधव (वय 16) असे मृत्यूमुखी पडलेल्या माय लेकीचे नावे आहेत. त्यांच्या माळमाथा भागासह झोडगे परिसरात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. झोडगेसह परिसरात सद्या वीस दिवसानंतर …

The post पाणी टंचाईने घेतला बळी! माय लेकींचा विहिरीतून पाणी काढताना पडून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading पाणी टंचाईने घेतला बळी! माय लेकींचा विहिरीतून पाणी काढताना पडून मृत्यू

Nashik News | निवडणुकीमुळे जिल्ह्यात चार दिवस ‘ड्राय डे’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रशासनाने पूर्वतयारीस सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात १८ ते २० मे हे तीन दिवस व ४ जूनला मतमोजणीला असे चार दिवस ड्राय डे जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. लोकसभा निवडणुकीची रंगत चढत असून, अद्याप सर्व उमेदवार जाहीर …

The post Nashik News | निवडणुकीमुळे जिल्ह्यात चार दिवस 'ड्राय डे' appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News | निवडणुकीमुळे जिल्ह्यात चार दिवस ‘ड्राय डे’

सावलीसाठी ट्रकचा आडोसा जीवावर बेतला, चाकाखाली दबून युवकाचा मृत्यू

सिडको : पुढारी वृत्तसेवा- उन्हापासून संरक्षण करण्यासाठी ट्रकच्या खाली बसलेल्या युवकाच्या अंगावरून ट्रकचे टायर गेल्याने जागीच ठार झाल्याची घटना अंबड औद्योगिक वसाहतीत घडली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, दुपारी साडेतीनच्या सुमारास अंबड एमआयडीसीतील राज ट्रान्स्पोर्ट या ठिकाणी एक ट्रक उभा होता. यावेळी ऊन असल्याने कृष्णा मुरलीधर जगताप (वय ३८) …

The post सावलीसाठी ट्रकचा आडोसा जीवावर बेतला, चाकाखाली दबून युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading सावलीसाठी ट्रकचा आडोसा जीवावर बेतला, चाकाखाली दबून युवकाचा मृत्यू

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने नाशिकरोडला दगडफेक

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे नाशिकरोड, उपनगर व जय भवानीरोड परिसरात गुरुवारी (दि.4) रात्री दोन समुदायामध्ये तणाव निर्माण होऊन नाशिक-पुणे रस्त्यावर दगडफेक झाली. यावेळी उपनगर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलनानंतर रात्री दीडच्या सुमारास संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निवळला आहे. जय भवानी रोड परिसरात वास्तव्य असलेल्या संकेत सौदागर …

The post सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने नाशिकरोडला दगडफेक appeared first on पुढारी.

Continue Reading सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने नाशिकरोडला दगडफेक

श्री काळाराम मंदिराच्या किरणोत्सवास प्रारंभ; श्रीराम, सीता व लक्ष्मणाच्या मूर्तीस सूर्यस्नान

नाशिक पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यानंतर सूर्योदयाला सूर्याची किरणे श्री काळाराम मंदिरात अशा प्रकारे पडतात की, ते थेट गाभाऱ्यातील श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्तीवर पडून त्यांना सूर्यस्नान घडते. सध्या या किरणोत्सवास सुरुवात झाली असून, तो बघण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव प्रसिद्ध आहे. दरवर्षी हा किरणोत्सव मोठ्या …

The post श्री काळाराम मंदिराच्या किरणोत्सवास प्रारंभ; श्रीराम, सीता व लक्ष्मणाच्या मूर्तीस सूर्यस्नान appeared first on पुढारी.

Continue Reading श्री काळाराम मंदिराच्या किरणोत्सवास प्रारंभ; श्रीराम, सीता व लक्ष्मणाच्या मूर्तीस सूर्यस्नान

सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा ! महिलेस परत मिळाली हरवलेली सोन्याची पोत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा शासकीय रुग्णालयात नातलगासाठी भेटण्यासाठी आलेल्या महिलेची सोन्याची पोत रुग्णालयात गहाळ झाली होती. सुरक्षारक्षकास ती पोत आढळून आल्याने त्यांनी ती प्रामाणिकपणे रुग्णालयीन प्रशासनाकडे दिली. त्यानंतर महिलेने पोत ओळखून ताब्यात घेतली. हरवलेली पोत सुरक्षारक्षकांच्या प्रामाणिकतेमुळे परत मिळाल्याने महिलेच्या डोळ्यात आंनदाश्रु तराळले. दसकवाडी येथील अर्चना चव्हाण यांचे नातलग प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. …

The post सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा ! महिलेस परत मिळाली हरवलेली सोन्याची पोत appeared first on पुढारी.

Continue Reading सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा ! महिलेस परत मिळाली हरवलेली सोन्याची पोत