नितीन गडकरी श्री काळाराम चरणी लीन

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- केंद्रीय रस्ते, वाहतूक व राजमार्गमंत्री नितीन गडकरी यांनी श्री काळाराम मंदिरात महापूजा, अभिषेक करून प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेतले. महंत सुधीर पुजारी यांनी प्रधान संकल्प सोडला. यावेळी महावस्त्र व प्रसाद देऊन गडकरी यांचा सत्कार करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारानिमित्त गडकरी नाशिकला आले होते. त्यावेळी श्री काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने …

Continue Reading नितीन गडकरी श्री काळाराम चरणी लीन

रेल्वे बोगीच्या चाकाखालून धूर, घाबरुन प्रवाशांच्या खिडकीतून उड्या

इगतपुरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनी समोर गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून धूर निघाल्याने एकच खळबळ उडाली. गाडी थांबल्यावर गाडीतील प्रवाशांनी घाबरून खिडकीतून उड्या टाकल्या. याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईला जाणारी गोरखपुर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस शनिवार दि. १८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुंबईकडे जात असतांना मुंढेगाव जवळ गोदान एक्स्प्रेसच्या …

Continue Reading रेल्वे बोगीच्या चाकाखालून धूर, घाबरुन प्रवाशांच्या खिडकीतून उड्या

जागतिक वस्तुसंग्रहालय दिनानिमित्त आज सावानामध्ये मोफत प्रवेश

शहरातील प्राचीन वस्तू, दस्तावेज आणि संपन्न वारशाचा ठेवा असणाऱ्या पाचही वस्तुसंग्रहालयांत शालेय विद्यार्थी आणि तरुणाईची गर्दी दिवसेंदिवस वाढत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. लहान मुले, शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुणाईसाठी हा अनमोल ठेवा प्रत्यक्ष डोळ्यात साठवण्यासाठी अधिक कल असल्याची माहिती शहरातील संग्रहालयप्रमुखांनी दिली. १९७७ पासून १८ मे हा दिवस जागतिक वस्तुसंग्रहालय दिन म्हणून साजरा केला जाताे. …

Continue Reading जागतिक वस्तुसंग्रहालय दिनानिमित्त आज सावानामध्ये मोफत प्रवेश

निवडणूक खर्चात डॉ. भारती पवार आघाडीवर तर भगरे दुसऱ्या स्थानी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील दहाही उमेदवारांनी शुक्रवारी (दि. १७) खर्च निरीक्षकांकडे खर्चाचा तपशील सादर केला. उमेदवारी खर्चात डॉ. भारती पवार यांनी आघाडी घेतली असून त्यांचा २५ लाख रुपये खर्च झाला आहे. आघाडीचे भास्कर भगरे यांनी प्रचार व अन्य बाबींवर १७ लाखांचा खर्च केला. सदरचा खर्च १४ मेपर्यंतचा आहे. मतदान पार पडल्यानंतर बुधवारी …

Continue Reading निवडणूक खर्चात डॉ. भारती पवार आघाडीवर तर भगरे दुसऱ्या स्थानी

सुधाकर बडगुजर यांच्या तडीपारीसंदर्भात आज निर्णयाची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दहशतवादी सलीम कुत्ता पार्टी प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संशयित सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे. या नोटिसीबाबत बाजू मांडण्यासाठी बडगुजर हे आज शनिवारी (दि. १८) पोलिसांसमोर हजर राहणार आहे. त्यांची बाजू ऐकल्यानंतर बडगुजर यांच्या तडीपारीसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक रंगात आलेली असताना शहर …

Continue Reading सुधाकर बडगुजर यांच्या तडीपारीसंदर्भात आज निर्णयाची शक्यता

प्रचाराचा फ्रायडे ठरला ‘ब्लॉकबस्टर”, बड्या नेत्यांनी गाजविले मैदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– राज्यातील पाचव्या व अंतिम टप्प्यातील मतदान सोमवारी (दि. २०) होत आहे. त्यामुळे शनिवारी (दि. १८) प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने, शुक्रवारी (दि. १७) महायुती व महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांनी नाशिकमध्ये येत मैदान गाजविले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह डॉ. भागवत कराड, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सभा, बैठका घेत मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न …

Continue Reading प्रचाराचा फ्रायडे ठरला ‘ब्लॉकबस्टर”, बड्या नेत्यांनी गाजविले मैदान

अखेरच्या टप्प्यात भुजबळांची मनधरणी करण्याचे सर्व स्तरातून प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छगन भुजबळ नाराज असल्याचे सांगितल्यानंतर भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजनांनी तत्काळ भुजबळ फार्म गाठत छगन भुजबळ यांची भेट घेत तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अखेरच्या दिवसापर्यंत भुजबळांची मनधरणी करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभेच्या मतदानाचा …

Continue Reading अखेरच्या टप्प्यात भुजबळांची मनधरणी करण्याचे सर्व स्तरातून प्रयत्न

‘एमडी’ फॉर्म्युला देणाऱ्यासह दोघांची चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा   – सोलापूर येथे एमडी (मेफेड्रॉन) तयार करण्याचा कारखाना व गोदाम सुरू करणाऱ्या संशयित सनी पगारे व अर्जुल पिवाल गँगच्या दोघांना शहर पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. या दोघांची एमडी बनवण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे उघड झाले. एकाने पगारे, पिवाल गँगला एमडी तयार करण्याचा फॉर्म्युला दिला, तर दुसऱ्याने कच्चा माल खरेदीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची …

Continue Reading ‘एमडी’ फॉर्म्युला देणाऱ्यासह दोघांची चौकशी

एस. चोक्कलिंगम् : जिल्ह्यातील लोकसभा तयारीचा घेतला आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकीअंतर्गत जिल्ह्यामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने त्याच्या स्तरावर जाणीवपूर्वक जनजागृती करावी. कमी मतदान असलेल्या मतदान केंद्रांवर लक्ष केंद्रित करताना तेथे हे प्रमाण वाढविण्याकरिता तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर्सला विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना द्याव्या, असे आदेश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् यांनी दिले. लोकसभा निवडणुकीत सोमवारी (दि. २०) नाशिक …

Continue Reading एस. चोक्कलिंगम् : जिल्ह्यातील लोकसभा तयारीचा घेतला आढावा

मविआच्या कार्यकर्त्यांना लक्ष्मीदर्शनाला आळा घालण्याचे प्रशिक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– मतदानापूर्वी शेवटचे दोन दिवस प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून पैशांचा पाऊस पाडला जाणार असल्याने सतर्क राहण्याच्या सूचना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गुरुवारी (दि. १६) लक्ष्मीदर्शनाला आळा कसा घालावा, याचे चक्क प्रशिक्षणच देण्यात आले. प्रतिस्पर्धी उमेदवार आणि त्यांच्या पक्षनेते, पदाधिकाऱ्यांवर कशा पद्धतीने नजर …

Continue Reading मविआच्या कार्यकर्त्यांना लक्ष्मीदर्शनाला आळा घालण्याचे प्रशिक्षण