नाशिक : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यात विशेषत: तिसऱ्या श्रावणी सोमवारला शिवभक्तांची मोठी गर्दी होते. यंदाच्या तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त (दि. ४) त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी जुन्या सीबीएस बसस्थानकातून जादा बसेस धावणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दीड दिवस सीबीएस ते टिळकवाडी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. मार्गावर एसटी बसेस धावणार आहेत. शहर पोलिस …

The post नाशिक : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल

त्र्यंबकेश्वरला फराळाच्या खिचडीने गौतम तलावातील हजारो माशांचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ञ्यंबकेश्वर मंदिराच्या बाजूस असलेल्या गौतम तलावात भाविकांनी टाकलेल्या साबुदाणा खिचडीने तलावातील हजारो मासे मरण पावले आहेत. मृत माशांमुळे तलावाच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सोमवारी (दि. 28) मंदिराच्या दक्षिण दरवाजाला भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले होते. दर्शन आटोपल्यानंतर भाविक दक्षिण बाजूस असलेल्या गायत्री मंदिराच्या दरवाजाने बाहेर पडतात. अनेक भाविकांनी …

The post त्र्यंबकेश्वरला फराळाच्या खिचडीने गौतम तलावातील हजारो माशांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वरला फराळाच्या खिचडीने गौतम तलावातील हजारो माशांचा मृत्यू

त्र्यंबकेश्वरला तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी धावणार जादा बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे आहे. येथे श्रावण महिन्याच्या दर सोमवारी विशेषत: तिसर्‍या श्रावणी सोमवारसाठी राज्यासह परराज्यातील शिवभक्तांची मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ४) भाविकांची संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने सुमारे २५० जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले होते. श्रावण महिन्‍याच्‍या सोमवारनिमित्त शिवमंदिरांमध्ये भाविकांची लगबग सुरू असते. त्र्यंबकेश्‍वरला …

The post त्र्यंबकेश्वरला तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी धावणार जादा बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वरला तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी धावणार जादा बसेस

श्रावणाच्या प्रारंभी त्र्यंबकला उसळली भाविकांची गर्दी

 त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा श्रावणाच्या पहिल्याच दिवशी त्र्यंबकेश्वरला भाविकांची प्रचंड गर्दी झाली. गर्दीचा ओघ वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर ट्रस्टने दर्शनाचे नियोजन जाहीर केले आहे. संपूर्ण श्रावणात त्र्यंबकराजाचे मंदिर पहाटे ५ पासून रात्री ९ पर्यंत दर्शनासाठी खुले राहील, तसेच प्रत्येक श्रावणी सोमवारी मंदिर पहाटे ४ वाजता उघडले जाईल. भक्तांना पूर्व दरवाजा दर्शन बारीतून …

The post श्रावणाच्या प्रारंभी त्र्यंबकला उसळली भाविकांची गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading श्रावणाच्या प्रारंभी त्र्यंबकला उसळली भाविकांची गर्दी

नाशिक : बाळंतिणीची बाळासह झोळीतून रुग्णालयवारी, तब्बल तीन किलोमीटर पायपीट

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा देश ७७ वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करत असताना त्र्यंबक तालुक्यातील ठाणापाडाजवळच्या खैरायपाली ग्रामपंचायत हद्दीतील माचीपाडा या पाड्यावरील महिलेची घरीच प्रसूती झाल्यानंतर तिला बाळासह दवाखान्यात दाखल करण्यासाठी ग्रामस्थांनी चक्क झोळीतून न्यावे लागले. माचीपाडाला पक्का रस्ता नसल्याने आजही ग्रामस्थांना तीन किमी अंतरची पायपीट करावी लागते. माचीपाडातील सरला ज्ञानेश्वर बाह्मणे घरी …

The post नाशिक : बाळंतिणीची बाळासह झोळीतून रुग्णालयवारी, तब्बल तीन किलोमीटर पायपीट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाळंतिणीची बाळासह झोळीतून रुग्णालयवारी, तब्बल तीन किलोमीटर पायपीट

नाशिक : वाडीवऱ्हे पोलिसांनी उतरवली मद्यधुंद पर्यटकांची मस्ती

त्र्यंबकेश्वर ( जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा पहिने बारीत असलेल्या नेकलेस धबधबा परिसरात रविवारी (दि.31) दुपारी चारच्या सुमारास मद्यधुंद टोळक्याने दगडफेक करीत तरुणींची छेड काढल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या टोळक्याची धुडगूस वाढत चाललेली पाहून पर्यटकांसह स्थानिकांनी वाडीवऱ्हे पोलिसांना पाचारण केले. आलेल्या पोलिसांनी या मद्यधुंद तरुणांची झिंग उतरवली. दुपारी उशिरा आलेल्या सात ते …

The post नाशिक : वाडीवऱ्हे पोलिसांनी उतरवली मद्यधुंद पर्यटकांची मस्ती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाडीवऱ्हे पोलिसांनी उतरवली मद्यधुंद पर्यटकांची मस्ती

Nashik : पर्यटकांनी बहरला पहिने घाट

ञ्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सततच्या पावसाने नदी नाले खळाळले आहेत. रविवारची सुटी बहरलेल्या निसर्गाच्या सानिध्यात घालवण्यासाठी पहिणे परिसरात कुटुंबासह सहलीला आलेल्यांची संख्या लक्षणीय होती. रविवारी पावसाने उघडीप दिली. त्यामुळे पर्यटकांच्या आनंदाला उधाण आलेले पहावयास मिळाले. लग्नाचा वाढदिवस, मित्राचा-मैत्रीणीचा अथवा स्वत:चा वाढदिवस साजरा करण्यासाठी ञ्यंबकेश्वर परिसरातील पावसाळी पर्यटनस्थळांना प्राधान्य मिळत आहे. ञ्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी …

The post Nashik : पर्यटकांनी बहरला पहिने घाट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पर्यटकांनी बहरला पहिने घाट

त्र्यंबकेश्वरला नद्यांना पूर, आवण्या थांबल्या

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा    तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. भाताच्या आवण्यांच्या कामांना नुकताच प्रारंभ झाला होता. मात्र, सततच्या पावसाने भात आवणीत पाणी तुंबल्याने आवणीची कामे खोळंबली आहेत. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांना पूर आला आहे. दोन गावांमध्ये असलेल्या लहान पुलावर पाणी आल्याने काही वेळ दोन्ही गावांमध्ये संपर्क तुटल्याची परिस्थिती निर्माण होत …

The post त्र्यंबकेश्वरला नद्यांना पूर, आवण्या थांबल्या appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वरला नद्यांना पूर, आवण्या थांबल्या

नाशिक : त्र्यंबक परिसरात दुर्घटना टाळण्यासाठी पर्यटकांना मज्जाव

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरातील पर्यटनस्थळांवर पावसाचा जोर वाढल्याने हौशी पर्यटक दुपारी तीननंतर माघारी फिरले. स्थानिक वन व्यवस्थापन समितीने सुरक्षेच्या कारणास्तव कडक कारवाईचा इशारा दिल्याने पर्यटकांनी नमते घेतले. ब्रह्मगिरीवर जाण्यास मज्जाव करण्यात येऊनही कोसळत्या पावसात पर्यटक आणि भाविक वर जाण्याचा प्रयत्न करत होते. अहिल्या धरण आणि परिसरात ब्रह्मगिरीचे धबधबे पाहण्यासाठी …

The post नाशिक : त्र्यंबक परिसरात दुर्घटना टाळण्यासाठी पर्यटकांना मज्जाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबक परिसरात दुर्घटना टाळण्यासाठी पर्यटकांना मज्जाव

नाशिक : अल्पवयीन मुलीच्या प्रसुतीने खळबळ

ञ्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील एका १७ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीने नवजात बाळाला जन्म दिल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्र्यंबक पोलीस ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत अत्याचार केल्याचा गुन्हा संशयीतावर दाखल झाला आहे. मात्र हा बालविवाहाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे. दिनांक 15 जुलै 2023 रोजी पिडीता ञ्यंबक उपजिल्हा रूग्णालयात प्रस्तुतीसाठी आली. मात्र …

The post नाशिक : अल्पवयीन मुलीच्या प्रसुतीने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अल्पवयीन मुलीच्या प्रसुतीने खळबळ