पाणी जपून वापरा! नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट गडद

नाशिकच्या धरणांतून जायकवाडीला पाणी सोडल्याच्या निर्णयाचे चटके आतापासूनच नाशिककरांना बसत असून, धरणांमधील उपलब्ध पाणीआरक्षणानुसार जुलैअखेर २० दिवसांची तूट येत असल्यामुळे विभागीय महसूल आयुक्तांनी सोमवारी (दि. २२) यासंदर्भात तातडीची बैठक बोलाविली आहे. यात नाशिककरांच्या पाणीवापरावरील निर्बंध अधिक कठोर केले जाण्याची किंबहुना पाणीकपात लादली जाण्याची शक्यता आहे. पाणीकपात टाळण्यासाठी गंगापूर धरणात चर खोदण्याचा एकमेव पर्याय शिल्लक आहे. …

Continue Reading पाणी जपून वापरा! नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट गडद

नाशिककरांची संकटातून सुटका होईना, आता लवकरच १५ टक्के पाणीकपात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नाशिककरांभोवती संकटाची मालिका सुरूच असून, पाणीपट्टी दरवाढीच्या संकटातून सुटका होत नाही तोच पाणीकपातीचे संकट नाशिककरांसमोर उभे ठाकले आहे. नाशिकच्या धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्यात आल्यानंतर नाशिक महापालिकेने मागणी केलेल्या पाणी आरक्षणात तब्बल ७८६ दशलक्ष घनफूट कपात करण्याची तयारी जलसंपदा विभागाने केली आहे. यामुळे नाशिककरांना १५ टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. सुरूवातील आठवड्यातून …

The post नाशिककरांची संकटातून सुटका होईना, आता लवकरच १५ टक्के पाणीकपात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांची संकटातून सुटका होईना, आता लवकरच १५ टक्के पाणीकपात

जायकवाडीला पाणी : नांदुरमध्यमेश्वरच्या दोन गेटमधून विसर्ग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गंगापूर व दारणा धरण समुहामधून जायकवाडीसाठी सोडलेले पाणी नांदुरमध्यमेश्वरमध्ये पोहचले आहे. नांदुरमध्यमेश्वरचे क्रमांक १ व ५ नंबरचे गेट ०.५० मीटरने उघडले असून वेगाने पाणी जायकवाडीकडे झेपावते आहे. पुढील दोन दिवस धरणांमधील विसर्ग कायम राहिल, अशी खात्रीलायक माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरण समुहातून मराठवाड्यातील जायकवाडीसाठी ३.१४३ टीएमसी …

The post जायकवाडीला पाणी : नांदुरमध्यमेश्वरच्या दोन गेटमधून विसर्ग appeared first on पुढारी.

Continue Reading जायकवाडीला पाणी : नांदुरमध्यमेश्वरच्या दोन गेटमधून विसर्ग

जायकवाडीसाठी ‘सर्वोच्च’ निर्णय बंधनकारक : रावसाहेब दानवे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जायकवाडी धरणाचे पाणलोट क्षेत्र कोणते याच्या नोंदी सरकारकडे आहेत. त्यामुळे जायकवाडीत पाणी सोडण्याबाबत मराठवाड्यातील नेत्यांपेक्षा राज्य सरकारचे मत महत्त्वाचे आहे, अशी भूमिका व्यक्त करत जायकवाडीला ८.६ टीएमसी पाणी सोडण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांनाच बंधनकारक असल्याचा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. एका शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुवारी (दि.२३) नाशिक …

The post जायकवाडीसाठी 'सर्वोच्च' निर्णय बंधनकारक : रावसाहेब दानवे appeared first on पुढारी.

Continue Reading जायकवाडीसाठी ‘सर्वोच्च’ निर्णय बंधनकारक : रावसाहेब दानवे

जायकवाडी मृतसाठ्यातून मराठवाड्याला पाणी पुरवा, जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून मराठवाड्यासाठी जायकवाडीत ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयावरून पाणी संघर्ष निर्माण झाला असताना नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरक्षण बैठकीचा संदर्भ देत नाशिक जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग न करता जायकवाडीच्या मृत साठ्यातूनच मराठवाड्याला पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला पाठविल्याची …

The post जायकवाडी मृतसाठ्यातून मराठवाड्याला पाणी पुरवा, जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading जायकवाडी मृतसाठ्यातून मराठवाड्याला पाणी पुरवा, जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव

जायकवाडीच्या पाण्यासंदर्भात संभ्रम कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नाशिक व नगर जिल्ह्यामधून जायकवाडीला पाणी सोडण्याबद्दल उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (दि.२१) नकार दिला आहे. यासंदर्भात १२ डिसेंबरला न्यायालयाने पुढची सुनावणी ठेवली आहे. पण, पाणी सोडण्याबद्दल कोणतेही आदेश नसल्याने गंगापूर व दारणा धरणांमधून देण्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दरम्यान, वरिष्ठ स्तरावरून पाणीसंदर्भातील आदेश प्राप्त झाल्यानंतर योग्य ती …

The post जायकवाडीच्या पाण्यासंदर्भात संभ्रम कायम appeared first on पुढारी.

Continue Reading जायकवाडीच्या पाण्यासंदर्भात संभ्रम कायम

जायकवाडीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अमृता पवार यांची याचिका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत नाशिकमधून वाढता विरोध आहे. भाजप महिला माेर्चाच्या जिल्हाध्यक्षा वास्तुविशारद अमृता पवार यांनी गुरुवारी (दि. ९) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर ५ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने दि. ३१ ऑक्टोबरला जायकवाडीच्या उर्ध्व खोऱ्यातील धरणांमधून ८.६०३ टीमएसी पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये नाशिकमधील …

The post जायकवाडीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अमृता पवार यांची याचिका appeared first on पुढारी.

Continue Reading जायकवाडीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अमृता पवार यांची याचिका

जायकवाडीबाबत 28 नोव्हेंबरपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश

नाशिक: पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यातील धरणातील पाणी जायकवाडीला सोडण्याच्या निर्णयाविरोधात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय तुंगार यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीवेळी मंगळवारी (दि. ७) न्यायालयाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला तसेच राज्य शासनाला २8 नोव्हेंबरपर्यंत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर ५ डिसेंबरला अंतिम सुनावणी न्यायालयाने निश्चीत केली आहे. मात्र नाशिकच्या गंगापुर …

The post जायकवाडीबाबत 28 नोव्हेंबरपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading जायकवाडीबाबत 28 नोव्हेंबरपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश

नाशिक : जायकवाडीला पाणी देण्यास सर्वपक्षीयांचा विरोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा आणि पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत असून ही आकडेवारीच फसवी असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला. जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीला पाणी देण्यास तीव्र विरोध दर्शविला. लोकप्रतिनिधींच्या भावना लक्षात घेत मेरी संस्थेद्वारे दोन दिवसांमध्ये धरणांमधील उपलब्ध साठ्याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी यंत्रणांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात …

The post नाशिक : जायकवाडीला पाणी देण्यास सर्वपक्षीयांचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जायकवाडीला पाणी देण्यास सर्वपक्षीयांचा विरोध

जायकवाडी पाणी प्रश्नाबाबत सात नोव्हेंबरला सुनावणी 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यामधील धरणातील पाणी जायकवाडीला सोडण्याच्या निर्णयाविरोधात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय तुंगार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी (दि. ३) सुनावणीवेळी न्यायालयाने मंगळवारी (दि. ७) पुढील सुनावणी निश्चित केली आहे. जिल्ह्यातील दुष्काळजन्य स्थितीचा कोणताही विचार न करता, नाशिक आणि नगर जिल्ह्यांतून ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश …

The post जायकवाडी पाणी प्रश्नाबाबत सात नोव्हेंबरला सुनावणी  appeared first on पुढारी.

Continue Reading जायकवाडी पाणी प्रश्नाबाबत सात नोव्हेंबरला सुनावणी