नाशिक : वस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्यास स्थानिकांचा विरोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाच्या निर्देशांनंतर शहरातील तब्बल ८१ जातिवाचक रस्ते, गल्ली, कॉलनी तसेच नगरांची नावे बदलण्याचा ठराव मंजूर करत महापालिकेने शासनाकडे अहवाल सादर केला असला, तरी नवीन नामकरणाला स्थानिकांनी विरोध करत जुनेच नाव कायम ठेवण्याचा हट्टाग्रह केल्याने महापालिकेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. शासनाचे आदेश पाळावेत की, स्थानिकांची मागणी पूर्ण करावी, असा प्रश्न …

The post नाशिक : वस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्यास स्थानिकांचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्यास स्थानिकांचा विरोध

नाशिक शहरात तब्बल १,१८६ धोकादायक वाडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात तब्बल एक हजार १८६ धोकादायक वाडे असून, वाडे तत्काळ रिकामे करण्याची गरज आहे. मात्र, याठिकाणीही प्रशासनाने नोटिसांपुरतीच मजल मारल्याने धोकादायक वाड्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी अशोकस्तंभ येथे कारच्या धडकेत वाडा कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर प्रशासनाने नोटिसा बजावल्या होत्या. नंतर मात्र धोकादायक वाड्यांचा विषय जणू काही विस्मृतीतच …

The post नाशिक शहरात तब्बल १,१८६ धोकादायक वाडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात तब्बल १,१८६ धोकादायक वाडे

नाशिक : महापालिकेचा ‘प्रभारी’ कारभार; बदली, निवृत्ती अन् लाचखोरीमुळे विभाग वाऱ्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेचा कारभार सध्या ‘प्रभारी’ झाला आहे. बदली, निवृत्ती अन् लाचखोरीच्या प्रकारांमुळे बहुतांश विभागाच्या चाव्या प्रभारी कारभाऱ्यांकडे आल्या आहेत. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची पुणे येथे साखर आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर त्यांचा पदभार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्याचबरोबर इतरही प्रमुख विभागांत प्रभारी राज असल्याने, जनसेवेच्या कामांवर …

The post नाशिक : महापालिकेचा 'प्रभारी' कारभार; बदली, निवृत्ती अन् लाचखोरीमुळे विभाग वाऱ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेचा ‘प्रभारी’ कारभार; बदली, निवृत्ती अन् लाचखोरीमुळे विभाग वाऱ्यावर

नाशिक : मनपाच्या सहाही विभागांत “आरआरआर’ केंद्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने ‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ हे अभियान देशभरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना रिड्यूस, रियुज आणि रिसायकल सेंटर (कमी करणे, पुनर्वापर आणि पुनर्वापरासाठी प्रक्रिया केंद्र – आरआरआर) स्थापन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेमार्फत स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ …

The post नाशिक : मनपाच्या सहाही विभागांत "आरआरआर' केंद्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या सहाही विभागांत “आरआरआर’ केंद्र

नाशिक : बायोमेट्रिकची सक्ती, मनपा मुख्यालयातील अधिकारी ‘फुलटाइम ऑन ड्यूटी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा स्वैर कारभार समोर आल्यानंतर प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवसातून तीन वेळा बायोमेट्रिक सक्तीचे केल्याने गुरुवारी (दि.२५) अधिकाऱ्यांसह कर्मचारी ‘फुलटाइम ऑन ड्यूटी’ दिसून आले. एरवी बैठका तसेच व्हिजिटच्या नावे दिवसभर दांडी मारणारे कर्मचारी तसेच अधिकारी बायोमेट्रिक सक्तीमुळे आपापल्या कार्यालयातच आढळून आले. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार …

The post नाशिक : बायोमेट्रिकची सक्ती, मनपा मुख्यालयातील अधिकारी 'फुलटाइम ऑन ड्यूटी' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बायोमेट्रिकची सक्ती, मनपा मुख्यालयातील अधिकारी ‘फुलटाइम ऑन ड्यूटी’

नाशिकचे ड्रीम प्रोजक्ट रखडले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दहा महिन्यांच्या प्रशासकीय काळात महापालिकेत एकही ठोस असे नवीन काम उभे राहिले नाही. राज्यातील सत्ताधारी पक्षांचाही मनपा प्रशासनावर अंकुश नसल्याने महापालिकेतील भाजपच्या सत्ताकाळातील आयटी पार्क, प्रोजेक्ट गोदा, लॉजिस्टिक पार्क, सीसीटीव्ही, स्मार्ट स्कूल यासह अनेक प्रकल्प रखडले आहेत. तर दुसरीकडे प्रशासनाकडून मनपा कर्मचारी, अधिकार्‍यांची सेवा प्रवेश नियमावली तयार करताना मनमानी कारभार सुरू …

The post नाशिकचे ड्रीम प्रोजक्ट रखडले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे ड्रीम प्रोजक्ट रखडले

नाशिक : ब्लॅकस्पॉटवरील ३१५ अतिक्रमणधारकांना अंतिम नोटीस बजावणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा औरंगाबादरोडसह शहर परिसरातील अपघातप्रवण क्षेत्र अर्थात ब्लॅकस्पॉट अपघातमुक्त करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. संबंधित ब्लॅकस्पॉटवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी नगरनियोजन विभागामार्फत रेखांकनाचे (डिमार्केशन) काम सुरू असून, या विभागाने ३१५ अतिक्रमणधारकांना मागील महिन्यात नोटीस बजावली होती. आता अंतिम नोटीस बजावून अतिक्रमण काढून घेण्याची ताकीद दिली जाणार आहे. औरंगाबादरोडवरील मिरची चौकात गेल्या वर्षी …

The post नाशिक : ब्लॅकस्पॉटवरील ३१५ अतिक्रमणधारकांना अंतिम नोटीस बजावणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ब्लॅकस्पॉटवरील ३१५ अतिक्रमणधारकांना अंतिम नोटीस बजावणार

नाशिक : महापालिकेतर्फे 2500 पदांच्या नोकरभरतीसाठी तयारी सुरु

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका, नगर परिषदांमधील ४० हजार पदांच्या भरतीची घोषणा केल्यामुळे अनेक वर्षांपासून नोकरभरतीची प्रतीक्षा करणाऱ्या नाशिक महापालिकेने भरतीसाठी आता जय्यत तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने अग्निशमन, वैद्यकीय विभागांतील ७०४ पदांसह विविध विभागांमधील सुमारे अडीच हजार पदांच्या भरतीसाठी मनपातील ११ विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलींचे प्रस्ताव प्रशासन विभागाने गुरुवारी …

The post नाशिक : महापालिकेतर्फे 2500 पदांच्या नोकरभरतीसाठी तयारी सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेतर्फे 2500 पदांच्या नोकरभरतीसाठी तयारी सुरु

नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकाला फेब्रुवारी उजाडणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विधान परिषद पदवीधर निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे महापालिकेचे अंदाजपत्रक लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांकडून फेब्रुवारीपर्यंत अंदाजपत्रक सादर केले तरी ते स्थायी समिती आणि महासभेवर येईपर्यंत विलंब होणार आहे. आगामी २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकासह चालू आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक मंजुरीच्या प्रक्रियेला आता फेब्रुवारी उजाडणार आहे. यामुळे जमा-खर्चाचा ताळेबंद सादर करण्यास खातेप्रमुखांना …

The post नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकाला फेब्रुवारी उजाडणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकाला फेब्रुवारी उजाडणार

नाशिक मनपा अतिरिक्त आयुक्तपदी भाग्यश्री बाणायत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या धूरफवारणी ठेक्यासह इतरही ठेक्यात वादग्रस्त ठरलेले अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम यांची शासनाने सहा महिन्यांतच उचलबांगडी केली. औषध फवारणीच्या ठेकेदारासोबत शासकीय विश्रामगृहावर बैठक घेतल्याच्या कारणामुळे आत्राम हे दीड महिन्यापूर्वी वादात सापडले होते. त्यांच्या रिक्त पदावर शिर्डी संस्थानच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांची नियुक्ती झाली आहे. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त प्रवीण …

The post नाशिक मनपा अतिरिक्त आयुक्तपदी भाग्यश्री बाणायत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा अतिरिक्त आयुक्तपदी भाग्यश्री बाणायत