धुळे: गंगापूर येथे हळदीच्या कार्यक्रमात महिलेचा एक जणावर विळ्याने वार

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा: गंगापूर (ता. साक्री) येथे हळदीच्या कार्यक्रमात महिलेने एका व्यक्तीच्या नाकावर आणि पोटावर विळ्याने वार केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला आहे. विठ्ठल कारंडे (रा. गंगापूर, ता. साक्री) असे व्यक्तीचे नाव आहे. तर हल्लेखोर महिलेचे बायाबाई भटू कारंडे असे नाव आहे. या प्रकरणी सुनंदा विठ्ठल कारंडे (रा. गंगापूर, ता. साक्री) यांनी फिर्याद दिली आहे. …

Continue Reading धुळे: गंगापूर येथे हळदीच्या कार्यक्रमात महिलेचा एक जणावर विळ्याने वार

नाशिक: खतवड येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने दोन मुलांसह जीवन संपविले

जानोरी, पुढारी वृत्तसेवा: दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून जीवन संपविले. ही घटना शुक्रवारी (दि.२६) घडली. संबंधित विवाहितेच्या नातेवाईकांनी पती, सासू, दीर यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे. Nashik News याबाबतचे वृत्त असे की, चांदवड तालुक्यातील …

Continue Reading नाशिक: खतवड येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने दोन मुलांसह जीवन संपविले

नाशिक: खतवड येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने दोन मुलांसह जीवन संपविले

जानोरी, पुढारी वृत्तसेवा: दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून जीवन संपविले. ही घटना शुक्रवारी (दि.२६) घडली. संबंधित विवाहितेच्या नातेवाईकांनी पती, सासू, दीर यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे. Nashik News याबाबतचे वृत्त असे की, चांदवड तालुक्यातील …

Continue Reading नाशिक: खतवड येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने दोन मुलांसह जीवन संपविले

पहिल्याच दिवशी नाशिकच्या दोन्ही मतदारसंघात एकूण तीन अर्ज दाखल

नाशिक : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता नाशिक जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या पहिल्याच दिवशी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २ व नाशिक मतदार संघासाठी १ असे एकूण ३ नामनिर्देशनपत्र दाखल झाले. २० दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या दालनात माजी आमदार जे. पी. गावित व सुभाष रामु चौधरी यांनी (कम्युनिस्ट …

Continue Reading पहिल्याच दिवशी नाशिकच्या दोन्ही मतदारसंघात एकूण तीन अर्ज दाखल

काळजी घ्या ! नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा तिसरा बळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकमध्ये पुन्हा एकदा स्वाइन फ्लूचा उद्रेक होण्यास सुरुवात झाली असून, मालेगावातील ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तींचा या आजारामुळे नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू ओढावला आहे. स्वाइन फ्लूमुळे बळी गेलेले तीनही रुग्ण अनुक्रमे निफाड, सिन्नर आणि मालेगाव या नाशिकच्या ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे महापालिकेबरोबरच ग्रामीण आरोग्य-वैद्यकीय यंत्रणाही कामाला लागली आहे. Swine Flu …

Continue Reading काळजी घ्या ! नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा तिसरा बळी

नाशिक जिल्ह्यात अवकाळीने ७२९ हेक्टरचे नुकसान, १०७ गावांना तडाखा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात सोमवारी (दि. १५) वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल १०७ गावांमधील ७२९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. त्यामुळे ३ हजार ५१८ शेतकरी बाधित झाले आहेत. सुरगाण्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला असून, ५०२ हेक्टरचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यामध्ये एकीकडे उष्णतेची लाट पसरली असून, पाऱ्याने चाळिशी …

Continue Reading नाशिक जिल्ह्यात अवकाळीने ७२९ हेक्टरचे नुकसान, १०७ गावांना तडाखा

नाशिकमध्ये चार दिवसांत दुसऱ्यांदा उच्चांकी पारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम असून, मागील चार दिवसांत पाऱ्याने दुसऱ्यांदा उच्चांकी पातळी गाठली आहे. शहरात गुरुवारी (दि.१८) पारा ४०.७ अंशांवर स्थिरावला. उष्णतेचा प्रकोप वाढल्याने नागरिकांना घाम फुटला आहे. उत्तर भारताकडून त्यातही विशेष करून राजस्थानच्या दक्षिण भाग तसेच गुजरात व मध्य प्रदेशातील मोकळ्या मैदानाकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील उष्णतेत चांगलीच वाढ झाली …

Continue Reading नाशिकमध्ये चार दिवसांत दुसऱ्यांदा उच्चांकी पारा

नाशिक : खर्डे येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी; राममंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

देवळा; पुढारी वृत्तसेवा : देवळा शहर व तालुक्यात रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. खर्डे येथे रामजन्मोत्सव निमित्ताने ह भ प अनंत महाराज कजवाडेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होऊन सायंकाळी सम्पूर्ण गावातून भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली. रथाचे महिलांनी औक्षण केले .सायंकाळी उशिरा पर्यंत मिरवणूक चालली .मिरवणूक शांततेत …

Continue Reading नाशिक : खर्डे येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी; राममंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

नाशिक : दुचाकीवरून उडून वाहत्या पाण्यात पडलेल्या तरुणाचा मृत्यू

पंचवटी; पुढारी वृत्तसेवा : दुचाकीवरून अमृतधामकडे जाताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेला सुजल वाळवंटे (२०) हा युवक थेट डाव्या कॅनॉलच्या पाटात पडून वाहून गेल्याची घटना शनिवारी (दि.१३) रात्री पावणे आठ वाजता घडली होती. पाटाला आवर्तन सोडल्याने त्यास चांगल्या प्रमाणात पाणी होते. पोलीस आणि अग्निशामक दलाने त्याचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तो सापडत …

The post नाशिक : दुचाकीवरून उडून वाहत्या पाण्यात पडलेल्या तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुचाकीवरून उडून वाहत्या पाण्यात पडलेल्या तरुणाचा मृत्यू

ठिकठिकाणी स्वागत कमानी; सामाजिक उपक्रमांची जय्यत तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. रविवारी (दि.१४) शहरासह उपनगरांमध्ये धूमधडाक्यात जन्मोत्सव साजरा केला जाणार असून, सर्वच मंडळांनी त्यासाठी जय्यत तयारी केली आहे. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून, निळे झेंडे लक्ष वेधून घेत आहेत. भीमसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह असून, मिरवणूकीसाठी चित्ररथ देखील सज्ज आहेत. यंदा लोकसभा …

The post ठिकठिकाणी स्वागत कमानी; सामाजिक उपक्रमांची जय्यत तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading ठिकठिकाणी स्वागत कमानी; सामाजिक उपक्रमांची जय्यत तयारी