मुख्यमंत्री हट्टाग्रहामुळेच हेमंत गोडसेंना उमेदवारी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून महायुतीत गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. नाशिकच्या उमेदवारीची माळ शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याच गळ्यात पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोडसे यांच्या उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील गोडसेंच्या उमेदवारीसाठी भक्कम पाठबळ …
‘ठाणे हवे की नाशिक’ शिवसेनाच्या शिंदे गटाची कोंडी; राष्ट्रवादीही आक्रमक होऊन आज घेणार बैठक
नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘ठाणे हवे की नाशिक’ या कोंडीत शिवसेनेच्या शिंदे गटाला अडकविल्यानंतर आता भाजपने नाशिकची जागा ताब्यात घेण्यासाठी जाळे फेकले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची ‘वन-टू-वन’ चर्चा सुरू केली आहे. नाशिक पूर्व मतदारसंघातील आमदार ॲड. राहुल ढिकले यांना निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाकडून पुन्हा विचारणा झाली असून, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे …
‘वंचित’कडून दिंडोरीपाठोपाठ जळगावमधील उमेदवार बदलला
नाशिक : पुढारी वृत्तसेवा वंचित बहुजन आघाडीने नाशिकमधून करण गायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाकडून सोमवारी (दि.२२) याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. निवडणुकीतील वंचितच्या एन्ट्रींमुळे नाशिकमध्ये महायुती, महाविकास आघाडी तसेच वंचित असा तिहेरी सामना रंगणार असल्याचे दिसत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. येत्या शुक्रवार (दि.२६)पासून उमेदवारी …
नाशिकच्या उमेदवारीसाठी मुंबईत लॉबिंग
नाशिक : पुढारी वृत्तसेवाराष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतरही महायुतीतील उमेदवारीचा पेच कायम राहिला आहे. उमेदवारीसाठी आता भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली असून ठाण्याच्या बदल्यात नाशिकची मागणी केल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व उबाठाचे जिल्हा संघटक विजय करंजकर यांनी मुंबई …
भुजबळांची माघार; तरीही महायुतीत ‘कोल्ड वॉर’
नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभेचे मतदान शेवटच्या पाचव्या टप्प्यात होणार असले तरी, त्याबाबतची प्रक्रिया अवघ्या चार दिवसांनी (दि. २६) सुरू होणार आहे. मात्र, अशातही महायुतीचा उमेदवार घोषित केला जात नसल्याने, भाजप-सेनेत धुसफुस वाढली आहे. विशेष म्हणजे तिकिटाच्या रेसमध्ये अग्रस्थानी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर माघार घेतल्यानंतरही उमेदवारीचा पेच …
वंचितकडून मालती थविल यांना उमेदवारी, गुलाब बर्डेचा पत्ता कट
नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी लोकसभा मतदार संघात दिलेला उमेदवार वंचितने अवघ्या आठ दिवसांत बदलला आहे. वंचितने पाचव्या यादीत दिंडोरीत महाराष्ट्र केसरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील पहिलवान गुलाब मोहन बर्डे यांना रिंगणात उतरविले होते. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना प्रचारात उतरणे शक्य नसल्याने, वंचितकडून मालती शंकर थविल यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीसोबत अखेरपर्यंत सूत्र जुळले नसल्याने …
सस्पेन्स, धाकधूक कायम! हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या दारी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन वेळा प्रबळ मताधिक्क्याने निवडून येऊनदेखील उमेदवारी मिळविण्यात अद्यापपर्यंत अपयशी ठरलेल्या खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा पक्षाचे सर्वोच्च नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाणे येथील शुभ-दीप निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार गोडसे यांना दिल्याची माहिती समोर येत आहे. …
The post सस्पेन्स, धाकधूक कायम! हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या दारी appeared first on पुढारी.
कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे उद्धव ठाकरेंचे आश्वासन
नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्यच्या शिष्टमंडळाने मुंबई मातोश्री येथे रविवार (दि.१४) रोजी दुपारी १२.३० वाजता महाविकास आघाडीचे नेते व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राज्यातील संघटित व असंघटित कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबद्दल चर्चा केली. यावेळी समितीच्या वतीने 15 मागण्याचे निवेदन .उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. या 15 मागण्याबाबत …
The post कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे उद्धव ठाकरेंचे आश्वासन appeared first on पुढारी.
शोभा बच्छाव यांना उमेदवारी; स्थानिकांची नाराजी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा धुळे लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहिर झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या धुळे व नाशिक जिल्हाध्यक्षांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामास्त्र उगारले आहेत. त्यामुळे लोकसभा प्रचाराआधीच डॉ. बच्छाव यांना स्वकीयांची समजूत काढण्याची वेळ आली आहे. डॉ. बच्छाव यांना काँग्रेस पक्षाने बुधवारी (दि.१०) उमेदवारी जाहिर …
The post शोभा बच्छाव यांना उमेदवारी; स्थानिकांची नाराजी appeared first on पुढारी.
महायुतीच्या उमेदवाराचा सस्पेन्स उत्कंठा वाढविणारा
नााशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणूकीचा जोर उत्तरोत्तर वाढत असला तरी, महायुतीच्या उमेदवाराबाबतचा सस्पेन्स नाशिककरांची उत्कंठा वाढविणारा ठरत आहे. दररोज नव्या उमेदवाराचे नाव चर्चेत येत असले तरी, उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्न कायम आहे. या नावांमधील बरीच नावे बळजबरीनेच पुढे केली जात असल्याने, लोकसभा निवडणूकीसाठी तो उमेदवार खरोखरच सक्षम आहे काय? असा …
The post महायुतीच्या उमेदवाराचा सस्पेन्स उत्कंठा वाढविणारा appeared first on पुढारी.