देवळा तालुक्यात वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने नुकसान

देवळा ; पुढारी वृत्तसेवा- देवळा तालुक्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील डाळींब पिकासह व्यापाऱ्यांच्या कांद्याचे शेड पडून कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अनेक झाडे रस्त्यावर उन्मळून पडले आहेत. तसेच विजेचे खांब पडल्याने तालुक्यातील शहरासह १६ ते १७ तास वीज पुरवठा खंडीत झाला. सोमवार दि.१३ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास प्रचंड वेगाने वाहणारे वारे …

Continue Reading देवळा तालुक्यात वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने नुकसान

जळगाव जिल्ह्याने पहिल्यांदा ओलांडली मतदानाची ‘साठी”

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या रावेर व जळगाव मतदारसंघात दि. 13 मे रोजी मतदान झाले. यावेळी प्रथमच जळगाव जिल्ह्याने मतदानाचा 60 टक्केचा आकडा पार केला आहे. यात जळगाव लोकसभेमध्ये 58.48 टक्के मतदान झाले आहे. रावेर लोकसभेमध्ये 64.28 टक्के मतदान झालेले आहे. (Lok Sabha Election 2024) जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा व रावेर लोकसभेच्या …

Continue Reading जळगाव जिल्ह्याने पहिल्यांदा ओलांडली मतदानाची ‘साठी”

अवघ्या पाचशे रुपयांची लाच घेताना महिला शिपाई जाळ्यात

नाशिक : शहरातील विद्युत निरीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला शिपाई संशयित गीता हेमंत बोकडे (४५,रा. अशोकामार्ग) यांनी पाचशे रूपयांची लाच घेतल्याचे उघडकीस आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.१३) बोकडे यांना लाच घेताना रंगेहात पकडले. एका तक्रारदार महिलेला विद्युत ठेकेदार व पर्यवेक्षक परवाना मिळण्याकरिता विद्युत निरीक्षक कार्यालयात अर्ज करायचा होता. बोकडे यांनी तक्रारदार महिलेला …

Continue Reading अवघ्या पाचशे रुपयांची लाच घेताना महिला शिपाई जाळ्यात

सिडकोतभाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

सिडको : पुढारी वृत्तसेवा सोमवारी (दि. १३) महायुतीच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅली ही उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या उत्तमनगर येथील भोळे कार्यालयाजवळील मंगल संपर्क कार्यालयाजवळ आली असता तेथे उपस्थित असलेल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणा देत महायुतीच्या उमेदवारांना खुन्नस दिली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी महाविकास आघाडीच्या संपर्क …

Continue Reading सिडकोतभाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक स्थगित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिक्षक संघटनांच्या रेट्यापुढे केंद्रीय निवडणूक आयोगाने माघार घेत राज्यातील नाशिक व मुंबई शिक्षक तसेच मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम स्थगित केला आहे. आयोगाने मंगळवारी (दि. १४) यासंदर्भात पत्र काढले. शालेय सुट्यांनंतर नव्याने निवडणूकांचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता असल्याने हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात नाशिकसह राज्यातील …

Continue Reading नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक स्थगित

ब्रेकिंग! शिक्षक, पदवीधर मतदारसंघातील निवडणुका पुढे ढकलल्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या २ शिक्षक आणि २ पदवीधर मतदारसंघातील निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. निवडणूक आयोगाने ८ मे रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील एकूण ४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. यात मुंबई, कोकण पदवीधर आणि नाशिक, मुंबई शिक्षक मतदारसंघाचा समावेश होता. या …

Continue Reading ब्रेकिंग! शिक्षक, पदवीधर मतदारसंघातील निवडणुका पुढे ढकलल्या

नांदगावी एसटी बस- अल्टो अपघातात माय लेकासह लेकीचा मृत्यू

नांदगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – नांदगाव शहरा जवळील गंगाधरी जवळ एसटी बस आणि अल्टो कारची धडक होत अपघात झाला. या मध्ये अल्टो कार मधील आई वंदना संतोष नलावडे (४०), मुलगा शुभम संतोष नलावडे ( २३) राहणार शिंदे पळाशे, तर मुलगी कल्याणी मनोज शिंदे (२२) राहणार महाड सांगवी या अपघातात जागीच ठार झाले. तर …

Continue Reading नांदगावी एसटी बस- अल्टो अपघातात माय लेकासह लेकीचा मृत्यू

उमेदवार संख्या वाढल्यामुळे मालेगाव बॅलेट युनिटची संख्या दुप्पट

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी अर्ज माघारीनंतर १८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारांची संख्या १६ हून अधिक झाल्याने मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या बॅलेट युनिटची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघात ८०८, तर मध्य विधानसभा मतदारसंघात ८२२ बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे. सध्या ईव्हीएम मशीन सेटिंगचे कामकाज सुरू आहे. मालेगाव बाह्यमध्ये …

Continue Reading उमेदवार संख्या वाढल्यामुळे मालेगाव बॅलेट युनिटची संख्या दुप्पट

‘होम वोटींग’: धुळे मतदारसंघात ४३२ ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांची नोंदणी

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा धुळे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २०) मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार या निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार व कोरोना रुग्ण मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातर्गत मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात रविवारी (दि. १२) गृह मतदानाच्या पहिल्या दिवशी …

Continue Reading ‘होम वोटींग’: धुळे मतदारसंघात ४३२ ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांची नोंदणी

अखेर सर्पदंश लस मागणीची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्पदंशाचे औषध मिळत नसल्याच्या तक्रारीची दखल घेट पंतप्रधान कार्यालयाने घेत याबाबत सचिवांकडे विचारणा केली आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात संर्पदंशाने मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असल्याने ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्पदंशावरील लस उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील पांगरी येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण पांगारकर यांनी थेट पंतप्रधान कायर्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या पत्राची दखल …

Continue Reading अखेर सर्पदंश लस मागणीची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल