नाशिक : चांदवडला महामार्गावर दोन तरुण दुचाकीस्वार ठार

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा शिवारातील आहेर वस्तीजवळील मुंबई-आग्रा महामार्गावर दुचाकीला अनोळखी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत चांदवड शहरातील दोन तरुण जागीच गतप्राण झाले. येथील हृषिकेश सोनवणे (२४) व स्वप्निल सोनवणे (२८) हे दोघे रविवारी (दि. २९) दुचाकीने मालेगावला गेले होते. मालेगाव येथून चांदवडला येताना शहराच्या शिवारातील आहेर वस्तीजवळ रात्री १०.३० च्या सुमारास मागच्या बाजूने भरधाव …

The post नाशिक : चांदवडला महामार्गावर दोन तरुण दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडला महामार्गावर दोन तरुण दुचाकीस्वार ठार

नाशिक: अन् पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चार मुलांना चावा

नाशिक (चांदवड) – पुढारी वृत्तसेवा चांदवड शहरात शुक्रवार (दि. 27) रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने रस्त्याने जाणाऱ्या चार मुलांना चावा घेतला. यामुळे नागरिकांमध्ये भटक्या श्वानांप्रती भीती वाढली आहे. जखमी मुलांना माजी नगरसेवक नवनाथ आहेर यांनी तत्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी नेले. यावेळी डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर औषधोपचार केले. चांदवड शहरात मोकाट कुत्रे व पिसाळलेल्या कुत्र्यांनी …

The post नाशिक: अन् पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चार मुलांना चावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: अन् पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चार मुलांना चावा

Nashik : चांदवडच्या जवानाचे उपचारादरम्यान निधन

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा भारतीय लष्करात तैनात असलेले चांदवडचे भूमिपुत्र सूरज उल्हास चौबे (३३) यांचे हरियाणातील अंबाला येथे उपचार सुरू असताना निधन झाले. आजारपणामुळे निधन झाल्याचे चौबे कुटुंबीयांनी सांगितले. या घटनेचे वृत्त समजताच सगळीकडे शोककळा पसरली आहे. लहानपणापासूनच सूरजला सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. शालेय शिक्षण घेत असतानाच मेहनत घेत त्याची लष्करात भरती झाली. …

The post Nashik : चांदवडच्या जवानाचे उपचारादरम्यान निधन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : चांदवडच्या जवानाचे उपचारादरम्यान निधन

नाशिक : चांदवडला भाजप-शिंदे गटाकडून अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ चांदवड तालुका भाजप व मित्रपक्ष असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांनी येथील गणूर चौफुलीवरील चांदवड – मनमाड राज्यमहामार्गावर उतरत जोरदार निदर्शने केली. यावेळी अजित पवार यांचा जाहीर निषेध करण्यात येऊन तहसीलदार प्रदीप पाटील यांना …

The post नाशिक : चांदवडला भाजप-शिंदे गटाकडून अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडला भाजप-शिंदे गटाकडून अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध

नाशिक : खडकजांबला अपघातात दुचाकीस्वार ठार

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा खडकजांब गावातील मुंबई-आग्रा महामार्गाने भरधाव जाणाऱ्या दुचाकीस्वारास महामार्ग ओलांडत असलेल्या व्यक्तीकडील लाकूड लागून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी वडनेरभैरव पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुनेश रमेश बग्गन (३५, रा. एकलहरे कॉलनी, नाशिक) असे मृताचे नाव आहे. बग्गन हे चांदवड तालुक्यातील …

The post नाशिक : खडकजांबला अपघातात दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खडकजांबला अपघातात दुचाकीस्वार ठार

नाशिक : मुलांकडून आईची 90 व्या वर्षी ग्रंथतुला

नाशिक (दिंडोरी) : ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ या म्हणीनुसार आई ही कुटुंबासाठी मोठा आधार असते. चांदवड तालुक्यातील धाेडंबे येथील त्र्यंबकराव बाबूराव उशीर, साेमनाथ उशीर, तुकाराम उशीर व सुरेश उशीर या चार भावांनी आई गीताबाई बाबूराव उशीर यांची 90 व्या वर्षी सहस्रचंद्रदर्शन साेहळा व ग्रंथतुला करत एक वेगळा आदर्श घालून दिला. गीताईंचे ७५ दिव्यांनी सुवासिनींच्या …

The post नाशिक : मुलांकडून आईची 90 व्या वर्षी ग्रंथतुला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुलांकडून आईची 90 व्या वर्षी ग्रंथतुला

नाशिक : चांदवडला उपकोषागार अधिकारी लाच घेताना जाळ्यात

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तक्रारदाराचे थकीत वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी व कोणतेही आक्षेप न घेण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाचेची मागणी करत तडजोडी अंती १० हजारांची लाच स्वीकारताना चांदवडचे उपकोषागार अधिकारी सुनील तडवी (वय ४९) यांना नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाच्या पोलिस निरीक्षक गायत्री जाधव-पाटील यांनी रंगेहाथ अटक केली. नाशिक येथील ४९ वर्षीय तक्रारदाराचे थकीत …

The post नाशिक : चांदवडला उपकोषागार अधिकारी लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडला उपकोषागार अधिकारी लाच घेताना जाळ्यात

नाशिक : चांदवडला एकाच रात्री चार मंदिरांत चोरी

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा शहरातील वरचेगाव, गुजराथ गल्ली व नेमीनगर येथील तीन जैन मंदिर व सोमवार पेठेतील पगडी गणपती मंदिर ही चार मंदिरे चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडत ६५ हजारांचा ऐवज लंपास केला. वरचेगाव येथील जैन मंदिरातील मुख्य मूर्तीच्या डोक्यावरील तीन थराचा ५० हजार रुपयांचा चांदीचा मुकुट, पाच हजारांचे चांदीचे फुले, पंचमुखी छत्रपालास असलेले सात …

The post नाशिक : चांदवडला एकाच रात्री चार मंदिरांत चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडला एकाच रात्री चार मंदिरांत चोरी

नाशिक : अज्ञाताने केला हल्ला; मुलाचा मृत्यू तर वयोवृद्ध वडील जखमी

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा कातरवाडी शिवारात रात्रीच्या वेळी पत्र्याच्या शेडमध्ये गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर अनोळखी मारेकऱ्याने केलेल्या हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. वयोवृद्ध वडील गंभीर जखमी झाले असून, रुग्णालयात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेने चांदवड तालुक्यातील कातरवाडी परिसर हादरला आहे. तालुक्यातील कातरवाडी शिवारात राहत असलेले वयोवृद्ध बाबूराव महादू झाल्टे हे मुलगा सोपान …

The post नाशिक : अज्ञाताने केला हल्ला; मुलाचा मृत्यू तर वयोवृद्ध वडील जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अज्ञाताने केला हल्ला; मुलाचा मृत्यू तर वयोवृद्ध वडील जखमी

नाशिक : धोतरखेडे शिवारामध्ये अपघात ; एक ठार, एक गंभीर

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील धोतरखेडे गावच्या शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गावर समोरून जाणाऱ्या दुचाकीला भरधाव येणाऱ्या चारचाकीने मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीचालक ठार झाला, तर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत सोमनाथ सयाजी जाधव (३५, रा. कानमंडाळे) यांनी फिर्याद दिल्याने वडनेरभैरव पोलिसांत चारचाकी गाडी …

The post नाशिक : धोतरखेडे शिवारामध्ये अपघात ; एक ठार, एक गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धोतरखेडे शिवारामध्ये अपघात ; एक ठार, एक गंभीर