हंडाभर पाण्यासाठी नांदगावकरांवर भटकंतीची वेळ

नांदगावकरांवर हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रशासनातर्फे सध्या तालुक्यात ४९ टँकरच्या माध्यमातून ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे. ४७ गावे अन‌् २२२ वाड्या-वस्त्यांवर ११८ टँकर फेऱ्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे.   (Nashik Water Crisis) गतवर्षी जिल्ह्याचे पर्जन्यमान घडले. नांदगाव तालुकाही त्यास अपवाद नाही. त्याचे परिणाम जाणवायला लागले आहेत. मुसळधार पावसाचे आवर्तनच न झाल्याने पावसाळा उलटण्यापूर्वीच …

The post हंडाभर पाण्यासाठी नांदगावकरांवर भटकंतीची वेळ appeared first on पुढारी.

Continue Reading हंडाभर पाण्यासाठी नांदगावकरांवर भटकंतीची वेळ

नाशिक विभागात टंचाईच्या झळा, ९६ मंडळे दुष्काळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गतवर्षी अत्यल्प पर्जन्यमान राहिल्याने नाशिक विभागावर पाणीटंचाईचे संकट घोंगावते आहे. पावसाअभावी विभागातील सहा तालुके व ९६ महसूल मंडळांमध्ये शासनाने दुष्काळ घोषित केला आहे. महसूल प्रशासनातर्फे या सर्व ठिकाणी टँकरने पाणीपुरवठ्यासह विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे. सद्यस्थितीत नंदुरबार वगळता उर्वरित चार जिल्ह्यांत दोन लाख ६३ हजार ६१९ ग्रामस्थांना १४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा …

The post नाशिक विभागात टंचाईच्या झळा, ९६ मंडळे दुष्काळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विभागात टंचाईच्या झळा, ९६ मंडळे दुष्काळी

नाशिक जिल्ह्यातील ३८० गावे-वाड्या तहानलेल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नवीन वर्षाच्या प्रारंभी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. तब्बल १३१ गावे आणि २४९ वाड्या असे एकूण ३८० ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. या सर्व ठिकाणी १०८ टॅंकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. गावात टँकर येताच पाणी भरण्यासाठी महिलावर्गाची झुंबड उडते आहे. (Nashik News) जानेवारी महिना …

The post नाशिक जिल्ह्यातील ३८० गावे-वाड्या तहानलेल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील ३८० गावे-वाड्या तहानलेल्या

बिबट्या दिसताच महिला हंडे टाकून पळाल्या; ; संतप्त महिलांचा रास्ता रोको

सुरगाणा (जि. नाशिक) प्रतिनिधी; सुरगाणा तालुक्यातील जांभुळपाडा दा. येथे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. महिलांना जंगलातील झिऱ्यावर पाण्यासाठी आटापिटा करत जंगलात पहाटे, दिवस रात्र पाण्याच्या शोधात जावं लागत आहे. (दि. 21) सकाळी 5.30 च्या सुमारास काही महिला पाणी भरण्यासाठी गेल्या असता त्यांना अचानकपणे बिबट्या आढळून आला, बिबट्याचे दर्शन होताच सगळ्या महिल्यानी …

The post बिबट्या दिसताच महिला हंडे टाकून पळाल्या; ; संतप्त महिलांचा रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading बिबट्या दिसताच महिला हंडे टाकून पळाल्या; ; संतप्त महिलांचा रास्ता रोको

सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सवावर पाणीटंचाईचे सावट

महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी आद्य शक्तीपीठ म्हणून असलेल्या सप्तशृंगी गडावरती विविध राज्यातून हजारो भावी भक्त देवीच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र ऐन नवरात्रोत्सवात सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांसह भाविकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सप्तशृंगीगडावर गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने ग्रामस्थांना गल्ली गल्ली टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. निसर्ग संपन्न आणि प्राचीन काळापासून 108 कुंडाची गाव म्हणून ओळख असलेल्या …

The post सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सवावर पाणीटंचाईचे सावट appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सवावर पाणीटंचाईचे सावट

उत्तर महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया, ६०० गावे-वाड्या तहानलेल्या

यंदाच्या वर्षी उत्तर महाराष्ट्रावर पावसाने अवकृपा केली आहे. बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाअभावी पाण्याचे स्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. परिणामी हंडाभर पाण्यासाठी जनतेला वणवण फिरावे लागत आहे. विभागात चार जिल्ह्यांमधील १५५ गावे आणि ४४१ वाड्या अशा एकूण ५९६ ठिकाणी टंचाईच्या झळा बसल्या आहेत. त्यामुळे या भागातील जनतेची तहान भागविण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून १३६ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जातो. पावसाने …

The post उत्तर महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया, ६०० गावे-वाड्या तहानलेल्या appeared first on पुढारी.

Continue Reading उत्तर महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया, ६०० गावे-वाड्या तहानलेल्या

नाशिक : जिल्ह्यातील टंचाईची परिस्थिती चिंताजनक, ना. भुसे यांच्या अध्यक्षतेत बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाने दडी मारल्याने यंदा जिल्ह्यातील टंचाईची चिंताजनक बनली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये ५६ टक्के पर्जन्य तुट आहे. पुरेश्या पावसाअभावी गंगापूरवगळता जिल्ह्यात अन्य धरण समुहांची परिस्थिती विदारक आहे. जिल्ह्यातील ४४ महसुली मंडळांत २१ दिवसांपासून पावसाना खंड दिल्याची धक्कादायक बाब पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत समोर आली. गंगापूरमधील उपलब्ध साठ्यामुळे नाशिककरांच्या …

The post नाशिक : जिल्ह्यातील टंचाईची परिस्थिती चिंताजनक, ना. भुसे यांच्या अध्यक्षतेत बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील टंचाईची परिस्थिती चिंताजनक, ना. भुसे यांच्या अध्यक्षतेत बैठक

नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट, धरणांमध्ये अवघा ६६ टक्के जलसाठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आॅगस्टच्या अखेरच्या टप्प्यातही पावसाचा लहरीपणा कायम आहे. जिल्ह्याचे चित्र चिंताजनक आहे. दमदार पावसाअभावी धरणांमध्येही मर्यादित साठा आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणे ६६ टक्केच भरली आहेत. यामुळे पावसाची ओढ कायम राहिल्यास जिल्हावासीयांवरील पाणीटंचाईचे सावट अधिक गडद होणार आहे. अल निनोमुळे यंदा मान्सूनवर विपरीत परिणाम झाला आहे. मान्सूनचे तीन महिने सरले तरीही अर्धा अधिक …

The post नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट, धरणांमध्ये अवघा ६६ टक्के जलसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट, धरणांमध्ये अवघा ६६ टक्के जलसाठा

नाशिक : भवानी तलाव ओव्हरफ्लो तरी नळाला पाणी नाही, सप्तशृंगगडावरील महिलांची पाण्यासाठी भटकंती

सप्तशृंगगगड प्रतिनिधी : सप्तशृंगगड हे धार्मिक तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असल्याने सपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे गाव आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच गेल्या एक ते दीड महिन्यात मोठया प्रमाणावर पाऊस पडत असल्याने सप्तशृंगी गडाला पाणीपुरवठा करणारे भवानी धरण हे पुर्ण भरून वाहु लागले आहे. असे असतानाही येथील नळांना चार …

The post नाशिक : भवानी तलाव ओव्हरफ्लो तरी नळाला पाणी नाही, सप्तशृंगगडावरील महिलांची पाण्यासाठी भटकंती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भवानी तलाव ओव्हरफ्लो तरी नळाला पाणी नाही, सप्तशृंगगडावरील महिलांची पाण्यासाठी भटकंती

लासलगावला भीषण पाणीटंचाई, ग्रामपंचायत सदस्य करतोय गावाला टॅंकरने पाणीपुरवठा

लासलगाव (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक दिवसापासून लासलगाव सह परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून यामुळे लासलगावकर हतबल झाले आहे. या पार्श्वभूमीवर येथील ग्रामपंचायत सदस्य शेखर होळकर हे सामाजिक बांधिलकी म्हणून वार्डात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. दररोज साधारणता ५० हजार ते ६० हजार लिटर पाणी पुरवठा करत आहे. विशेष म्हणजे कुठलाही गाजावाजा किंवा …

The post लासलगावला भीषण पाणीटंचाई, ग्रामपंचायत सदस्य करतोय गावाला टॅंकरने पाणीपुरवठा appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगावला भीषण पाणीटंचाई, ग्रामपंचायत सदस्य करतोय गावाला टॅंकरने पाणीपुरवठा