न्यायालय अवमानप्रकरणी मनपा व स्मार्ट कंपनीला नोटीस, नेमकं काय प्रकरण?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गोदावरी नदीच्या निळ्या पूररेषेत कुठल्याही प्रकारच्या बांधकामाला मुंबई उच्च न्यायालयाने निर्बंध घालते असताना स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून गोदावरी नदीपात्रात अहिल्यादेवी होळकर पुलाखाली मॅकेनिकल गेटचे काम करण्यात येत आहे. यासंदर्भात लेखी आक्षेप नोंदवून देखील नदीपात्रात काँक्रीटीकरणाचे काम सुरूच असल्यामुळे पर्यावरणप्रेमी निशिकांत पगारे यांनी न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली असून, या प्रकरणात न्यायालयाच्या …

Continue Reading न्यायालय अवमानप्रकरणी मनपा व स्मार्ट कंपनीला नोटीस, नेमकं काय प्रकरण?

‘स्वाइन फ्लू’च्या रुग्णांची माहिती दडवली, ६५० खासगी रुग्णालयांना नोटिसा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असताना खासगी रुग्णालयांकडून या आजाराच्या रुग्णांची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील ६५ वर्षीय स्वाइन फ्लूग्रस्त वृद्धा शहरातील खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तब्बल आठवडाभर ही माहिती दडवून ठेवण्यात आली होती. हा प्रकार महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या लक्षात आल्यानंतर …

Continue Reading ‘स्वाइन फ्लू’च्या रुग्णांची माहिती दडवली, ६५० खासगी रुग्णालयांना नोटिसा

नाशिक महापालिकेसमोर विक्रेत्यांचे ‘भाजीफेक’ आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या निषेधार्थ गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर परिसरातील भाजीविक्रेत्यांनी शुक्रवारी (दि.१९) महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनसमोर ‘भाजीफेक’ आंदोलन करत संताप व्यक्त केला. अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करत हॉकर्स झोन जोपर्यंत जाहीर केले जात नाही तोपर्यंत विक्रेत्यांना आहे त्याच जागेवर व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही यावेळी भाजीविक्रेत्यांकडून …

Continue Reading नाशिक महापालिकेसमोर विक्रेत्यांचे ‘भाजीफेक’ आंदोलन

श्वान निर्बीजीकरण मनपाला पडलं महागात, एका श्वानामागे आता ‘इतका’ येणार खर्च

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया महापालिकेला भलतीच महागात पडली आहे. अॅनिमल वेल्फेअर बोर्डाचे प्रमाणपत्र सादर न केल्याने काही महिन्यांपूर्वी श्वान निर्बीजीकरणाचा ठेका तडकाफडकी रद्द करण्यात आला होता. त्यानंतर नव्याने राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेअंती नाशिक रोड व पंचवटी विभागासाठी प्रतिश्वान १६५० रुपये न्यूनतम दराच्या निविदेला स्थायीची मंजुरी घेण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली …

The post श्वान निर्बीजीकरण मनपाला पडलं महागात, एका श्वानामागे आता 'इतका' येणार खर्च appeared first on पुढारी.

Continue Reading श्वान निर्बीजीकरण मनपाला पडलं महागात, एका श्वानामागे आता ‘इतका’ येणार खर्च

मृत जनावरांची विल्हेवाटही आता खासगीकरणातून,

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- घंटागाडीद्वारे घरोघरी केरकचऱ्याचे संकलन व विल्हेवाट, साफसफाईचे आउटसोर्सिंग करणाऱ्या नाशिक महापालिकेने आता शहरात मृत होणारी जनावरे उचलणे व खतप्रकल्पावर विल्हेवाट लावण्याचे कामही खासगीकरणातून करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तीन वर्षे मुदतीचा ठेका दिला जाणार आहे. यासंदर्भातील १.२७ कोटींच्या खर्चास महासभेने मंजुरी दिली आहे. घंटागाड्यांमार्फत घरोघरी केरकचरा संकलन व खतप्रकल्पावर वाहून नेण्यासाठी …

The post मृत जनावरांची विल्हेवाटही आता खासगीकरणातून, appeared first on पुढारी.

Continue Reading मृत जनावरांची विल्हेवाटही आता खासगीकरणातून,

नाशिकचा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प आता मनपाच्या ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- विल्होळी वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम प्रा. लि. बंगळुरू या मक्तेदाराने पूर्ण क्षमतेने प्रकल्प न चालविल्यामुळे डब्यात गेलेला ‘वेस्ट टू एनर्जी’ अर्थात ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प महापालिकेने ताब्यात घेतला आहे. या प्रकल्पाच्या यंत्रणेतील महत्त्वाचा भाग असलेला परंतु नादुरुस्त झालेला गॅस व हवेचा बलून नव्याने बसविण्यात येणार असून, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्याचा निर्धार …

The post नाशिकचा 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्प आता मनपाच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प आता मनपाच्या ताब्यात

अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवाजवी घरपट्टीवाढीने त्रासलेल्या नाशिकमधील दुकाने, वाणिज्य आस्थापनांवर आता नवा कर लादण्याची तयारी नाशिक महापालिकेने केली आहे. केंद्राच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी राज्य शासनाने महसूलवृद्धीची अट टाकल्याने कोंडीत सापडलेल्या महापालिकेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींचा आधार घेत शहरातील ६५ हजार दुकाने, वाणिज्य आस्थापनांकडून परवाना शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. परवाना शुल्क वसुलीच्या …

The post अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन appeared first on पुढारी.

Continue Reading अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

लाचखोर कर्मचाऱ्यांविरोधात मनपा अभियोग दाखल करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लाच मागितल्याप्रकरणी रंगेहात अटक करण्यात आलेल्या वरिष्ठ लिपिकासह तिघा कर्मचाऱ्यांविरोधात ठोस पुरावे आढळल्याने संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी न्यायालयात अभियोग दाखल करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. यासंदर्भातील दोन स्वतंत्र प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहेत. सिटी सेंटर मॉलमागील अनधिकृत चहाची टपरी महापालिकेच्या हॉकर्स झोनमध्ये अधिकृत करून देण्यासाठी महापालिकेचे प्रभारी सहाय्यक …

The post लाचखोर कर्मचाऱ्यांविरोधात मनपा अभियोग दाखल करणार appeared first on पुढारी.

Continue Reading लाचखोर कर्मचाऱ्यांविरोधात मनपा अभियोग दाखल करणार

नाशिक मनपा नोकरभरतीसाठी प्रश्नपत्रिका अंतिम टप्प्यात 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; महापालिकेतील आरोग्य, वैद्यकीय व अग्निशमन विभागातील ५८७ पदांच्या भरतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भरतीसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी भरतीप्रक्रिया राबविणाऱ्या टाटा कन्सल्टन्सी (टीसीएस)ने संवर्गनिहाय प्रश्नपत्रिका तयार केली असून, महापालिका प्रशासनाच्या अवलोकनानंतर संभाव्य त्रुटी दुरुस्ती करून प्रश्नपत्रिका अंतिम केली जाणार आहे. महापालिकेसाठी १९९५ मध्ये विविध संवर्गातील ७०९२ पदांच्या …

The post नाशिक मनपा नोकरभरतीसाठी प्रश्नपत्रिका अंतिम टप्प्यात  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा नोकरभरतीसाठी प्रश्नपत्रिका अंतिम टप्प्यात 

नाशिक मनपा : फेब्रुवारीत पुष्पोत्सवाने बहरणार महापालिका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कोरोनामुळे खंडित झालेली महानगरपालिकेच्या पुष्पोत्सवाच्या आयोजनाची परंपरा गेल्या वर्षीपासून पूर्ववत सुरू झाली. आता येत्या फेब्रुवारीतही महापालिका मुख्यालय पुष्पोत्सवाने बहरणार आहे. उद्यान विभागाने पुष्पोत्सवाच्या आयोजनाची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. यंदा शहरातील बांधकाम व्यावसायिक व डेकोरेटर्सनादेखील या उत्सवात सहभागी करून घेतले जाणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी दिली आहे. पर्यावरण …

The post नाशिक मनपा : फेब्रुवारीत पुष्पोत्सवाने बहरणार महापालिका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा : फेब्रुवारीत पुष्पोत्सवाने बहरणार महापालिका