नाशिक : 40 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान, आज होणार मतमोजणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी (दि. 4) मतदारांनी भरघोस मतदान केले. जिल्ह्यात तब्बल 81.96 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. तालुकास्तरावर शुक्रवारी (दि. 5) मतमोजणी करण्यात येणार असून, निकालाकडे गावकर्‍यांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील बागलाण, निफाड, सिन्नर, येवला, चांदवड, देवळा आणि नांदगाव या सात तालुक्यांमधील 40 ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान पार पडले. …

The post नाशिक : 40 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान, आज होणार मतमोजणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 40 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान, आज होणार मतमोजणी

नाशिकला पावसाने झोडपले, तासाभरात 27.2 मिलिमीटर पर्जन्यमान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर व परिसरात गुरुवारी (दि.4) सायंकाळी पावसाने दमदार पुनरागमन केले. तासभर झालेल्या या पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले, तर ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने कार्यालयांमधून घरी परतणार्‍या चाकरमान्यांची दैना उडाली. शहरात 27.2 मिमी पर्जन्याची नोंद झाली.   दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार आगमन केले. दिवसभर कडक उकाडा जाणवल्यानंतर सायंकाळी 4.45 …

The post नाशिकला पावसाने झोडपले, तासाभरात 27.2 मिलिमीटर पर्जन्यमान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला पावसाने झोडपले, तासाभरात 27.2 मिलिमीटर पर्जन्यमान

नाशिकमध्ये रस्ता डांबरीकरण कामांना वेग, ठेकेदारांना आयुक्तांचे निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्तीची कामे वेगाने सुरू आहेत. पावसाने विश्रांती घेतल्याने डांबर, खडी टाकून खड्डे बुजवले जात आहेत. नाशिकरोड, पाथर्डी भागात डांबर टाकून रस्ते दुरुस्त करण्यात आले असून, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सूचनेनुसार शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही केली जात आहे. रस्त्याची दुरुस्ती करताना त्यांच्या दर्जाकडे …

The post नाशिकमध्ये रस्ता डांबरीकरण कामांना वेग, ठेकेदारांना आयुक्तांचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये रस्ता डांबरीकरण कामांना वेग, ठेकेदारांना आयुक्तांचे निर्देश

नाशिक : विद्यार्थिनीचा बनाव समोर आल्यानंतरही ‘त्या’ शिक्षकाची बदली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देवगाव (ता. त्र्यंबकेश्वर) येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षकाने आपणास मासिक पाळीच्या कारणास्तव वृक्षारोपण करण्यापासून रोखल्याचा त्या विद्यार्थिनीचा बनाव समोर आल्यानंतरही संबंधित शिक्षकाची प्रतिनियुक्तीवर म्हैसगण आश्रमशाळेत बदली करण्यात आली. स्थानिकांचा रोष कमी करण्यासाठीच या शिक्षकाची बदली करण्यात आल्याचे आदिवासी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. गेल्या आठवड्यात देवगाव आश्रमशाळेतील इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीला मासिक पाळी आल्याच्या …

The post नाशिक : विद्यार्थिनीचा बनाव समोर आल्यानंतरही 'त्या' शिक्षकाची बदली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थिनीचा बनाव समोर आल्यानंतरही ‘त्या’ शिक्षकाची बदली

नाशिक : प्रतिकेदारनाथच्या दर्शनाला अलोट गर्दी

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा श्रावण महिना सुरू झाला आणि त्र्यंबकेश्वर परिसरात असलेल्या प्रतिकेदारनाथाच्या दर्शनाला भाविक पर्यटकांची गर्दी वाढत आहे. रविवारी या मंदिरात भक्तांच्या रांगा लागत असून, किमान एक तास दर्शनासाठी रांगेत थांबावे लागले. मागच्या काही महिन्यांपर्यंत दुर्लक्षित असलेल्या मुळेगाव बारीतील शिवशक्ती आश्रमातील स्वरूपेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी रांगा लागत आहेत. मुळेगाव बारी परिसर वाहनांनी …

The post नाशिक : प्रतिकेदारनाथच्या दर्शनाला अलोट गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रतिकेदारनाथच्या दर्शनाला अलोट गर्दी

नाशिक : कवयित्री कराड यांच्या नावाने राज्य पुरस्कार, एमआयटी संस्थेच्या वतीने घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ज्येष्ठ लेखिका व कवयित्री ऊर्मिला विश्वनाथ कराड यांच्या नावाने पुढील वर्षापासून एमआयटी परिवारातर्फे आदर्श माता पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी घोषणा ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी एमआयटीचे राहुल कराड यांच्या वतीने केली. नाशिकच्या माहेरवाशीण ज्येष्ठ कवयित्री ऊर्मिला विश्वनाथ कराड यांच्या श्रद्धांजली सभेचे मविप्र, क्रांतिवीर व्ही. एन. नाईक या शिक्षण संस्थांच्या पुढाकारातून …

The post नाशिक : कवयित्री कराड यांच्या नावाने राज्य पुरस्कार, एमआयटी संस्थेच्या वतीने घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कवयित्री कराड यांच्या नावाने राज्य पुरस्कार, एमआयटी संस्थेच्या वतीने घोषणा

नाशिक : जिल्हा परिषदेचे गट बदलल्याने आरक्षणही बदलणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य मंत्रिमंडळाने जिल्हा परिषदेच्या गटांची रचना 2017 मधील निवडणुकीप्रमाणे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत पुन्हा 72 गट होणार असून, मागील महिन्यात जाहीर केलेली आरक्षण सोडतही रद्दबादल ठरली आहे. यामुळे आरक्षण सोडतीत निवडणूक प्रक्रियेतून बाहेर फेकले गेलेल्या नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राज्य सरकारने डिसेंबर 2021 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार …

The post नाशिक : जिल्हा परिषदेचे गट बदलल्याने आरक्षणही बदलणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेचे गट बदलल्याने आरक्षणही बदलणार

नाशिक : बनावट जात प्रमाणपत्राबद्दल अधिकार्‍यांना नोटिसा ; अपर जिल्हाधिकारी, दोन तहसीलदार गोत्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागांतर्गत येणार्‍या नाशिक अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून प्रशासकीय अधिकार्‍यांना बनावट जात जमात प्रमाणपत्र प्रकरणी कारणे दाखवा नोटिसा बजविल्या आहेत. त्यामध्ये अपर जिल्हाधिकारी व तहसीलदारांचा समावेश आहे. अशा प्रमाणपत्रांआधारे शासकीय नोकरी लाटणार्‍या अधिकार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून नाशिक अनुसूचित जमात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विविध निकष लावून प्रमाणपत्र …

The post नाशिक : बनावट जात प्रमाणपत्राबद्दल अधिकार्‍यांना नोटिसा ; अपर जिल्हाधिकारी, दोन तहसीलदार गोत्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बनावट जात प्रमाणपत्राबद्दल अधिकार्‍यांना नोटिसा ; अपर जिल्हाधिकारी, दोन तहसीलदार गोत्यात

नाशिक : इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रिया : पहिल्या फेरीसाठी 12,623 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इयत्ता अकरावी प्रवेशासाठी उत्सुकता लागलेली पहिली गुणवत्ता यादी बुधवारी (दि.2) जाहीर झाली. या फेरीसाठी 12 हजार 623 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. त्यामध्ये कला शाखेतील 2 हजार 81, वाणिज्य शाखेच्या 4 हजार 218, विज्ञान शाखेच्या 6 हजार 177, तर एचएसव्हीसी शाखेच्या 147 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना येत्या शनिवार (दि.6)पर्यंत प्रवेश …

The post नाशिक : इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रिया : पहिल्या फेरीसाठी 12,623 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रिया : पहिल्या फेरीसाठी 12,623 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट

नाशिक : बनावट कागदपत्रांच्या आधारे इन्शुरन्स कंपनीलाच घातला गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाहनाच्या इन्शुरन्स पॉलिसीच्या कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून पॉलिसी वैध असल्याचे भासवून त्याचा वापर न्यायालयात करीत इन्शुरन्स कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिटी सेंटर मॉलजवळील एका वाहनविक्रीच्या मॉलमध्ये 16 जुलै 2017 रोजी हा प्रकार घडला होता. झहीर अजगर खान (40, रा. भायखळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित …

The post नाशिक : बनावट कागदपत्रांच्या आधारे इन्शुरन्स कंपनीलाच घातला गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बनावट कागदपत्रांच्या आधारे इन्शुरन्स कंपनीलाच घातला गंडा