नाशिक : तणनाशकामुळे पीक करपल्याने कंपनीने बाजारातून हटविला औषधाचा लॉट

नाशिक (पिंपरखेड) :  पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील विविध ठिकाणी मक्यावरील तणनाशकाचा विपरीत परिणाम होऊन मका पिकाचे नुकसान होऊन बळीराजा हतबल झाला आहे. देशातील अग्रगण्य कंपनीच्या टिंझर या मक्यावरील तणनाशक औषधाने पाच शेतकर्‍यांच्या शेतातील पिकावर शंभर टक्के दुष्परिणाम होऊन मका पीक करपून गेले. कंपनीने आपल्या तणनाशक औषधाचा लॉट बाजारातून काढून घेत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला आहे. नांदगाव तालुक्याततील …

The post नाशिक : तणनाशकामुळे पीक करपल्याने कंपनीने बाजारातून हटविला औषधाचा लॉट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तणनाशकामुळे पीक करपल्याने कंपनीने बाजारातून हटविला औषधाचा लॉट

नाशिक : शिवसेनेचा मोर्चा कायद्याच्या चौकटीत अडकण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री यांचे शनिवारी (दि.30) मालेगाव येथे आगमन होणार आहे. तर शिवसेना पदाधिकारी बाळा कोकणे यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीला अटक न झाल्याने शनिवारीच शिवसैनिक पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. यामुळे शहरासह जिल्ह्यात शिवसेना आणि शिंदे गटसमर्थक आमने-सामने येण्याची शक्यता आहे. मात्र, मनाई आदेशामुळे मोर्चाबाबत कोणताही अर्ज दिला नसल्याचे आयुक्तालयाकडून सांगण्यात आल्याने …

The post नाशिक : शिवसेनेचा मोर्चा कायद्याच्या चौकटीत अडकण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेनेचा मोर्चा कायद्याच्या चौकटीत अडकण्याची शक्यता

नाशिक : ‘त्या’ शिक्षकांची चौकशी, मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीस वृक्षारोपणास मज्जाव

देवगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव कन्या शासकीय आश्रमशाळेत इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकणार्‍या विद्यार्थिनीस मासिक पाळीच्या कारणास्तव शिक्षकानेच वृक्षारोपण करण्यास रोखल्याच्या खळबळजनक घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेत बुधवारी (दि. 27) सकाळी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांनी आश्रमशाळेस भेट देत चौकशी सुरू केली. महाराष्ट्र महिला आयोगाने या प्रकरणी तातडीने कार्यवाही …

The post नाशिक : 'त्या' शिक्षकांची चौकशी, मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीस वृक्षारोपणास मज्जाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्या’ शिक्षकांची चौकशी, मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीस वृक्षारोपणास मज्जाव

मालेगाव जिल्हानिर्मिती पुन्हा चर्चेत, मुख्यमंत्री शिंदेंचा शनिवारी दौरा

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतील अंतर्गत बंडात मंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ आमदार दादा भुसे यांनी केलेली पाठराखण मालेगावच्या विकासाला बूस्टर डोस देणारी ठरण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर शिंदे यांचा पहिला लक्षवेधी दौरा नाशिक जिल्ह्यात होत असून, त्याचे मुख्य केंद्र मालेगाव राहणार आहे. याप्रसंगी मालेगाव जिल्हानिर्मितीसह वळण योजनांचे रिटर्न गिफ्ट मिळण्याच्या आशा …

The post मालेगाव जिल्हानिर्मिती पुन्हा चर्चेत, मुख्यमंत्री शिंदेंचा शनिवारी दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव जिल्हानिर्मिती पुन्हा चर्चेत, मुख्यमंत्री शिंदेंचा शनिवारी दौरा

नाशिक शहरात 11 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील राजकीय घडामोडी, आगामी धार्मिक सण-उत्सवांसह वादग्रस्त विधानांमुळे होणारी निदर्शने, आंदोलने यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी 28 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे. सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर …

The post नाशिक शहरात 11 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात 11 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

नाशिक : नितीन गडकरींना राष्ट्रवादीचे पत्र ; फास्टटॅगला काळे स्टिकर लावण्याचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय महामार्ग तीनवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांच्या समस्यांबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पाठविलेल्या पत्रात 15 ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्त न केल्यास वाहनांवरील फास्टटॅगला काळे स्टिकर लावण्याचा इशारा दिला आहे. मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र खड्ड्यांचे साम—ाज्य पसरले आहे. पावसाच्या जोरदार सरी आणि …

The post नाशिक : नितीन गडकरींना राष्ट्रवादीचे पत्र ; फास्टटॅगला काळे स्टिकर लावण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नितीन गडकरींना राष्ट्रवादीचे पत्र ; फास्टटॅगला काळे स्टिकर लावण्याचा इशारा

नाशिक : रानभाजी महोत्सवातून आदिवासी संस्कृती जतन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रानभाज्या महोत्सवातून उत्पादक ते ग्राहक साखळी तयार होत असून, या माध्यमातून आदिवासी भागातील संस्कृती समोर आणण्याचे व जतन करण्याचे महत्त्वाचे काम होत आहे. या महोत्सवातून विविध रानभाज्यांबरोबर महिला स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होत आहेत. या माध्यमातून आदिवासी भागातील स्वयंसहायता गटांना उत्पन्न मिळणार असून, रानभाज्यांचे संवर्धन होणार …

The post नाशिक : रानभाजी महोत्सवातून आदिवासी संस्कृती जतन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रानभाजी महोत्सवातून आदिवासी संस्कृती जतन

नाशिक मनपा डुकरांना शहरातून हद्दपार करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा डुकरांपासून स्वच्छता कमी आणि त्यांचा नागरिकांना उपद्रवच अधिक होत असल्याने मनपा हद्दीतील सर्व डुकरांना शहरातून हद्दपार करण्याचा निर्णय मनपाच्या पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे. वराह पालकांनी त्यांची जनावरे शहराबाहेर घेऊन न गेल्यास डुकरांना ठार करण्याचा इशारा पशूसंवर्धन विभागाने दिला आहे. डुकरांमार्फत गाव, शहर, वस्त्यांची स्वच्छता राखली जाते. कचराकुंडी तसेच इतरही सर्व प्रकारची …

The post नाशिक मनपा डुकरांना शहरातून हद्दपार करणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा डुकरांना शहरातून हद्दपार करणार

नाशिक : शिवसैनिकांच्या निष्ठेपायी मुद्रांकांच्या मागणीत वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड करून भाजपाशी युती करीत राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेना पक्षासह पक्षनेतृत्वावर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. न्यायालयीन प्रक्रियेत हा वाद अडकल्यानंतर शिवसेना पक्ष व पक्षप्रमुखांवर शिवबंधनानंतर पुन्हा एकदा निष्ठा दाखवण्यासाठी शिवसैनिकांना 100 रुपयांच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र लिहून देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत शहरातील मुद्रांक विक्रेत्यांकडे 100 …

The post नाशिक : शिवसैनिकांच्या निष्ठेपायी मुद्रांकांच्या मागणीत वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसैनिकांच्या निष्ठेपायी मुद्रांकांच्या मागणीत वाढ

नाशिक : ‘ईडी’ची धमकी देत व्यावसायिकाकडून उकळली पाच लाखांची खंडणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा व्यवसायाची महत्त्वाची माहिती चोरून ईडी (सक्तवसुली संचलनालय) व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून समाजात बदनामी करण्याची धमकी देत एकाने व्यावसायिकाकडून पाच लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून संशयित मारुती रमेश खोसरे यास पकडले. समीर सीताराम सोनवणे (41, रा. महात्मानगर) यांनी दिलेल्या …

The post नाशिक : ‘ईडी’ची धमकी देत व्यावसायिकाकडून उकळली पाच लाखांची खंडणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘ईडी’ची धमकी देत व्यावसायिकाकडून उकळली पाच लाखांची खंडणी