दुहेरी दौऱ्यात स्वकीयांची समजूत काढण्यात मुख्यमंत्र्यांचा कालापव्यय

केंद्र-राज्यातील सत्ता, पाच विधानसभा क्षेत्रांत स्वकीय आमदारांची रसद, विरोधकांची झालेली पडझड आणि राज्यात पंचेचाळीस प्लस जिंकण्याचा आत्मविश्वास या बाबी अनुकूल वातावरणाची प्रचिती देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये एकदा नव्हे तर दोनदा येऊन केलेली बांधबंदिस्ती चर्चेचा विषय बनला आहे. मुखियाचा दुहेरी दौरा महायुतीतील बेकीची परिणती की खुंटा हलवून बळकटीकरणाचा प्रयत्न हा मुद्दा आता केंद्रस्थानी …

Continue Reading दुहेरी दौऱ्यात स्वकीयांची समजूत काढण्यात मुख्यमंत्र्यांचा कालापव्यय

नाशिक, दिंडोरीत आज प्रचारवॉर! सभांमधून कलगीतुरा रंगणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक, दिंडोरी मतदारसंघांत बुधवारी (दि.१५) ‘प्रचार वॉर’ रंगणार आहे. नाशिकमधील शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे, तर दिंडोरीतील भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर दुपारी १ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. तर, दिंडोरीतच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर …

Continue Reading नाशिक, दिंडोरीत आज प्रचारवॉर! सभांमधून कलगीतुरा रंगणार

‘होम वोटींग’: धुळे मतदारसंघात ४३२ ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांची नोंदणी

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा धुळे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २०) मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार या निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार व कोरोना रुग्ण मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातर्गत मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात रविवारी (दि. १२) गृह मतदानाच्या पहिल्या दिवशी …

Continue Reading ‘होम वोटींग’: धुळे मतदारसंघात ४३२ ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांची नोंदणी

नाशिक जिल्हा प्रशासन : सि-व्हिजल ॲपवर ७१ तक्रारी दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणूकीच्या धामधूमीत जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या घटना प्रामुख्याने समोर येत आहेत. जिल्हा प्रशासनाकडे सि-व्हिजील ॲपवर आजपर्यंत ७१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर ११ गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये निफाड, येवला व सुरगाण्यातील अवैध दारु जप्तीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार २० मे रोजी पाचव्या टप्यात मतदान …

Continue Reading नाशिक जिल्हा प्रशासन : सि-व्हिजल ॲपवर ७१ तक्रारी दाखल

शिंदेंची शेवटची फडफड; फडणवीस तर कच्चे मडके : – संजय राऊतांचा हल्लाबोल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेवटची फडफड सुरू आहे. त्यांचे राजकारण लवकरच संपेल असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेऊ नका. ते राजकारणातले एकदम कच्चे मडके आहे असा टोलाही राऊत यांनी लगावला. नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नाशिक …

Continue Reading शिंदेंची शेवटची फडफड; फडणवीस तर कच्चे मडके : – संजय राऊतांचा हल्लाबोल

‘डॅमेज कंट्रोल पार्ट-टू’साठी मुख्यमंत्री आज पुन्हा नाशिकच्या मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महायुतीच्या समन्वय बैठकीनंतरही नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाच्या उमेदवाराविषयीची नाराजी कायम असून, महायुतीचे नेते प्रचारात सक्रिय होत नसल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘डॅमेज कंट्रोल’साठी पुन्हा एकदा रविवारी (दि. १२) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसह ते शहरातील विकासक, व्यापारी आणि उद्योजकांशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी …

Continue Reading ‘डॅमेज कंट्रोल पार्ट-टू’साठी मुख्यमंत्री आज पुन्हा नाशिकच्या मैदानात

आ. कोकाटेंकडून मुख्यमंत्र्यांसमोर गोडसेंविरोधात तक्रारीचा पाढा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारापासून चार हात लांब असलेले सिन्नरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी गुरूवारी (दि.९) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत गोडसेंविरोधात तक्रारीचा पाढा वाचला. गोडसेंकडून मतदारसंघात हस्तक्षेप केला जात असल्याने त्यांचा प्रचार कशासाठी करायचा, असा सवालच कोकाटेंकडून मुख्यमंत्र्यांना केला गेला. …

Continue Reading आ. कोकाटेंकडून मुख्यमंत्र्यांसमोर गोडसेंविरोधात तक्रारीचा पाढा

जिल्ह्यात आजपासून ज्येष्ठांच्या मतदानास प्रारंभ 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील ८५ वर्षावरील घरबसल्या मतदान करु इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी गुरुवारपासून (दि.९) मतदानास प्रारंभ होत आहे. त्यानूसार जिल्हाधिकारी कार्यालयातून नाशिक व दिंडोरी मतदार संघा अंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी मतपत्रिकांचे वितरण करण्यात आले. नाशिक व दिंडाेरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार (दि.२०) मतदान घेण्यात येणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. यंदाच्या निवडणूकीत प्रत्येकाला …

Continue Reading जिल्ह्यात आजपासून ज्येष्ठांच्या मतदानास प्रारंभ 

मुख्यमंत्र्यांकडून नाशिकमध्ये ‘डॅमेज कंट्रोल’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी महायुतीत रंगलेला संघर्ष, त्यातून उद‌्भवलेली नाराजी आणि उमेदवारी घोषित करण्यासाठी झालेला विलंब यामुळे उमेदवाला पर्यायाने पक्षाला फटका बसू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकचा दौरा करत ‘डॅमेज कंट्रोल’ केले. एकीकडे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेत प्रचाराला बूस्ट देण्याचा प्रयत्न करताना दुसरीकडे महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी सुसंवादही …

Continue Reading मुख्यमंत्र्यांकडून नाशिकमध्ये ‘डॅमेज कंट्रोल’

राजाभाऊ वाजे यांखा 26 दिवसांपासून दररोज 14 तास प्रचार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढतीचे चित्र माघारीनंतर स्पष्ट झाले आहे. तीन प्रमुख पक्षांसह अपक्ष अशी बहुरंगी आणि रंगतदार लढत होणार असल्याचे चित्र आहे. आता प्रचारासाठी केवळ आठ दिवसांचा अवधी उरला असल्याने संपूर्ण मतदारसंघात उमेदवारांच्या दौऱ्यांनी धुरळा उडाला आहे. अन्य पक्षांच्या तुलनेत उमेदवारीचा घोळ न घालता महाविकास आघाडीने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ …

Continue Reading राजाभाऊ वाजे यांखा 26 दिवसांपासून दररोज 14 तास प्रचार