छगन भुजबळांच्या राजकिय खेळीकडे सर्वांचे लक्ष, कट्टर समर्थकाने घेतला अर्ज

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक व दिंडाेरी लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारपासून (दि.२६) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत अर्ज विक्री व दाखल करता येईल. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ३ मेपर्यंत आहे. नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या माघारीनंतरही पक्षाने नाशिकच्या जागेवर दावा कायम …

Continue Reading छगन भुजबळांच्या राजकिय खेळीकडे सर्वांचे लक्ष, कट्टर समर्थकाने घेतला अर्ज

नाशिकमध्ये अर्ध्याहुन जास्त मराठा मतदार माझ्या बरोबर

येवला : पुढारी वृत्तसेवा- मी कधीच कुणाला घाबरत नाही, मी कुणालाही घाबरून माघार घेतलेली नाही. मी मराठा समाजाच्या नाराजीला घाबरून माघार घेतली नाही. तर माझ्यामागे नाशिक लोकसभा मतदारसंघातील अर्ध्याहुन अधिक मराठा मतदार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. भुजबळ म्हणाले, अडीच लाखांवरून जास्त मराठा मतदार तेवढेच ओबीसी मतदार व इतर मागासवर्गीय …

Continue Reading नाशिकमध्ये अर्ध्याहुन जास्त मराठा मतदार माझ्या बरोबर

राजकीय पक्षांचे शक्तिप्रदर्शन : जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिसांची तटबंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लाेकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्यासाठी गुरुवार (दि.२६) पासून सुरुवात होत आहे. अर्ज भरणे, माघारीची प्रक्रिया व प्रचार यामुळे निवडणुकीत रंगत येणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागणार असल्याने पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. कार्यालयास बॅरिकेडिंगसोबत पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येत आहे. लाेकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयाेगाने …

Continue Reading राजकीय पक्षांचे शक्तिप्रदर्शन : जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिसांची तटबंदी

अर्ज दाखल करताना वेळेचे भान राखा : जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवार (दि. २६) पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. उमेदवारी अर्जासाठी ३ मे अंतिम मुदत असून, शासकीय सुटीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत अर्ज दाखल करता येईल. उमेदवार व राजकीय पक्षांनी अर्ज भरताना आयोगाच्या सूचनांचे पालन करताना वेळेचे भान राखावे, असे निर्देश …

Continue Reading अर्ज दाखल करताना वेळेचे भान राखा : जिल्हाधिकारी जलज शर्मा

‘ठाणे हवे की नाशिक’ शिवसेनाच्या शिंदे गटाची कोंडी; राष्ट्रवादीही आक्रमक होऊन आज घेणार बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘ठाणे हवे की नाशिक’ या कोंडीत शिवसेनेच्या शिंदे गटाला अडकविल्यानंतर आता भाजपने नाशिकची जागा ताब्यात घेण्यासाठी जाळे फेकले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची ‘वन-टू-वन’ चर्चा सुरू केली आहे. नाशिक पूर्व मतदारसंघातील आमदार ॲड. राहुल ढिकले यांना निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाकडून पुन्हा विचारणा झाली असून, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे …

Continue Reading ‘ठाणे हवे की नाशिक’ शिवसेनाच्या शिंदे गटाची कोंडी; राष्ट्रवादीही आक्रमक होऊन आज घेणार बैठक

आजही राष्ट्रवादीचा नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी माघारी घेतलेली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक लोकसभेवरील दावा सोडलेला नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादीच्या कार्यालयात मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते …

Continue Reading आजही राष्ट्रवादीचा नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा कायम

Lok Sabha Election 2024 | उमेदवारीबाबत राष्ट्रवादीच्या आमदारांचा दावा कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभेच्या निवडणुकीत नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये एकमत होत नसल्याचे समोर आले आहे. केंद्राच्या नेतृत्वाने नाव दिले असले तरी नावाची घोषणा होण्यात होणारा विलंब बघता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. संपूर्ण जिल्ह्यातील १५ पैकी सहा विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या आमदारांचे वर्चस्व आहे. मात्र, जिल्ह्यातील दिंडोरी आणि नाशिक लोकसभेसाठी कुठेच संधी …

Continue Reading Lok Sabha Election 2024 | उमेदवारीबाबत राष्ट्रवादीच्या आमदारांचा दावा कायम

जिल्हा प्रशासनाने बोलाविली आज राजकीय पक्षांची बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी शुक्रवार (दि. २६) पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. निवडणूक प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शनासाठी जिल्हा प्रशासनाने सोमवारी (दि. २२) राजकीय पक्षांची बैठक बोलाविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा हे मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा निवडणूक कार्यक्रमात नाशिक, दिंडोरी व धुळे …

Continue Reading जिल्हा प्रशासनाने बोलाविली आज राजकीय पक्षांची बैठक

नाशिक हवं असेल तर…. महायुतीत रंगला वाद

नाशिक  : पुढारी वृत्तसेवा नाशिक हवे असल्यास ठाणे भाजपला द्या, अशी सूचना भाजप नेत्यांनी शिंदे गटाला केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव पुढे आल्याचे समजते. मुंबई, ठाण्यातील पाच जागा आणि नाशिक सहावी जागा या जागांच्या वाटपावरून महायुतीत वाद सुरु आहे. यापूर्वी संभाजी नगर आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जागांवर तोडगा काढण्यात आला. …

Continue Reading नाशिक हवं असेल तर…. महायुतीत रंगला वाद

भुजबळांची माघार; तरीही महायुतीत ‘कोल्ड वॉर’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभेचे मतदान शेवटच्या पाचव्या टप्प्यात होणार असले तरी, त्याबाबतची प्रक्रिया अवघ्या चार दिवसांनी (दि. २६) सुरू होणार आहे. मात्र, अशातही महायुतीचा उमेदवार घोषित केला जात नसल्याने, भाजप-सेनेत धुसफुस वाढली आहे. विशेष म्हणजे तिकिटाच्या रेसमध्ये अग्रस्थानी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर माघार घेतल्यानंतरही उमेदवारीचा पेच …

Continue Reading भुजबळांची माघार; तरीही महायुतीत ‘कोल्ड वॉर’