दमबाजी, हाणामारी अन् मिटवामिटवी; मनसे-ठाकरे गटात असाही राडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; मल्टिलेव्हल मार्केटिंग व्यवसायातील आर्थिक देवाणघेवाणीवरून मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचा प्रकार पाथर्डी फाटा येथील नरहरीनगर भागात घडला. यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झालीच, शिवाय कार्यालयाची तोडफोड केली गेली. पुढे प्रकरण इंदिरानगर पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. विनयभंगासह लुटमारीची फिर्यादही दाखल केली जाणार होती. मात्र, दोन्ही गटाच्या नेत्यांनी सामाेपचाराची भूमिका घेत, प्रकरण …

The post दमबाजी, हाणामारी अन् मिटवामिटवी; मनसे-ठाकरे गटात असाही राडा appeared first on पुढारी.

Continue Reading दमबाजी, हाणामारी अन् मिटवामिटवी; मनसे-ठाकरे गटात असाही राडा

किरीट सोमय्यांविरोधात नाशिकमध्ये ठाकरे गट रस्त्यावर

पंचवटी नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्यभरात सर्वत्र संताप व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. याचे पडसाद नाशिकमध्येही उमटत असून, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मंगळवारी (दि. १८) सकाळी पंचवटी कारंजा येथे किरीट सोमय्यांचा जाहीर निषेध करत ‘जोडे मारो’ आंदोलन केले. कथित व्हिडिओमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या हे अश्लील …

The post किरीट सोमय्यांविरोधात नाशिकमध्ये ठाकरे गट रस्त्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading किरीट सोमय्यांविरोधात नाशिकमध्ये ठाकरे गट रस्त्यावर

नाशिक : देवळा येथे किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  देवळा येथे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने मंगळवारी (दि. १८) रोजी किरीट सोमय्या यांच्या अश्लिल व्हिडीओ विरोधात त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. अनेक कथित घोटाळे उघड करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओची सत्यता …

The post नाशिक : देवळा येथे किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा येथे किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो

नाशिक : शिवसेना फुटीला अजित पवारही तेवढेच जबाबदार – गरीश महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना ठाकरे गटातील आमदार-खासदार पक्षाला कंटाळले असून, वर्धापनदिनी आ. मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झटका दिला. भविष्यातही उद्धव ठाकरे यांना आणखी झटके बसणार आहेत. शिवसेना फुटीला ठाकरे यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादीचे अजित पवार हेही तितकेच जबाबदार आहेत. असा आरोप ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केला. ठाकरे यांच्यासोबत भविष्यात …

The post नाशिक : शिवसेना फुटीला अजित पवारही तेवढेच जबाबदार - गरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेना फुटीला अजित पवारही तेवढेच जबाबदार – गरीश महाजन

नाशिक : शिवसेना ठाकरे गटातर्फे वर्धापनदिनानिमित्त आज विविध उपक्रम

नाशिक : शिवसेना ठाकरे गटातर्फे महानगरात वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात येणार असून यानिमित्त सोमवारी (दि.19) ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, मिठाईवाटप, विद्यार्थी गुणगौरवसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली कुमावतनगर येथे महाआरती आणि ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, मदर तेरेसा आश्रमात फळवाटप, मविप्र हायस्कूल (म्हसरूळ) येथे शालेय साहित्य वाटप, रामकुंडावर गंगाआरती, लाटेनगर येथे महाआरती, …

The post नाशिक : शिवसेना ठाकरे गटातर्फे वर्धापनदिनानिमित्त आज विविध उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेना ठाकरे गटातर्फे वर्धापनदिनानिमित्त आज विविध उपक्रम

नाशिक : ठाकरे गटाला आणखी झटके बसणार; ग्रामविकासमंत्र्यांचे टीकास्त्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना ठाकरे गटातील आमदार-खासदार पक्षाला कंटाळले असून, वर्धापनदिनी आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झटका दिला. भविष्यातही उद्धव ठाकरे यांना आणखी झटके बसणार आहेत. ठाकरे यांच्यासोबत सकाळच्या भोंग्याशिवाय कोणी ही नसेल, अशी टीका राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केली. ना. महाजन रविवारी (दि.१८) नाशिक दौऱ्यावर …

The post नाशिक : ठाकरे गटाला आणखी झटके बसणार; ग्रामविकासमंत्र्यांचे टीकास्त्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ठाकरे गटाला आणखी झटके बसणार; ग्रामविकासमंत्र्यांचे टीकास्त्र

मालेगाव बाजार समितीच्या सभापती पदी डॉ. अद्वय हिरे

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे तर उपसभापतीपदी विनोद चव्हाण यांची अविरोध निवड झाली. बाजार समितीत निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.२५) नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष सभा पार पडली. त्यांना संजय मोरे यांनी सहाय्य केले. डॉ. हिरे यांच्या कर्मवीर …

The post मालेगाव बाजार समितीच्या सभापती पदी डॉ. अद्वय हिरे appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव बाजार समितीच्या सभापती पदी डॉ. अद्वय हिरे

धुळ्यात पाणी प्रश्न पेटला, शिवसेनेच्या ठाकरे गटाचा महानगरपालिकेवर मोर्चा

धुळे : पुढारी वृत्तसेवा  धुळे शहरातील विशेषतः देवपूर भागातील संतप्त महिलांनी, नागरिकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आज धुळे महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयात हंडा मोर्चा काढला. भाजपचे खासदार व महापौर सातत्याने पाणीपुरवठ्याच्या समस्येवर चुकीचे व खोटे आश्वासन देऊन धुळेकर जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप यावेळी शिवसेना पदाधिकारी व आंदोलकांनी केला. शहरातील पाणीपुरवठ्याच्या स्त्रोतांमध्ये मुबलक पाणी असताना देखील …

The post धुळ्यात पाणी प्रश्न पेटला, शिवसेनेच्या ठाकरे गटाचा महानगरपालिकेवर मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात पाणी प्रश्न पेटला, शिवसेनेच्या ठाकरे गटाचा महानगरपालिकेवर मोर्चा

धुळे : नालेसफाईच्या नावाने कोट्यावधींची बिले काढल्याचा आरोप, नाल्याच्या काठावर जाऊन शिवसेनेचे आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरातील नालेसफाई झाली नसल्याची बाब आज शिवसेनेने आंदोलनाच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिली. महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपाचा गट आणि अधिकाऱ्यांनी पावसामुळे नाल्यांच्या माध्यमातून होणाऱ्या दुर्घटना टाळणे ऐवजी कोट्यवधी रुपयांची बिले काढण्याकडे लक्ष केंद्रित केले असल्याचा खळबळ जनक आरोप यावेळी करण्यात आला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज शहरातील 10 ते 12 नाल्यांसह उपनाल्यांना भेटी देऊन …

The post धुळे : नालेसफाईच्या नावाने कोट्यावधींची बिले काढल्याचा आरोप, नाल्याच्या काठावर जाऊन शिवसेनेचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : नालेसफाईच्या नावाने कोट्यावधींची बिले काढल्याचा आरोप, नाल्याच्या काठावर जाऊन शिवसेनेचे आंदोलन

नाशिक : खा. राऊत जनतेचा दिवस खराब करतात – खा. श्रीकांत शिंदेची घणाघाती टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत हे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जनतेचा दिवस खराब करतात. राऊत यांच्या बोलण्याचा लाेकांना विट आला आहे, अशी घणाघाती टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राउतांवर केली. सत्ताधारी शिवसेना व भाजप यांनी छत्रपती संभाजीनगर येथून सावरकर गाैरव यात्रा काढणार आहे. ठाकरे गटाचे खा. राऊत यांनी …

The post नाशिक : खा. राऊत जनतेचा दिवस खराब करतात - खा. श्रीकांत शिंदेची घणाघाती टीका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खा. राऊत जनतेचा दिवस खराब करतात – खा. श्रीकांत शिंदेची घणाघाती टीका