त्र्यंबकनगरी पर्यटकांनी गजबजली, दहा पट दर देऊनही मिळेना खोली

त्र्यंबकेश्वर (जि, नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; शनिवार (दि.23)पासून त्र्यंबकनगरी पर्यटकांनी गजबजली आहे. यंदा नाताळ सहलींच्या गर्दीत वाढ झाली आहे. यामुळे रविवारी (दि.24) कुंभमेळा पर्वणीप्रमाणे गर्दी वाढल्याने शहरातील काही रस्त्यांवर चालण्यास जागा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यापुढचा संपूर्ण आठवडा गर्दीचा माहौल कायम राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. भाविक पर्यटकांच्या गर्दीत वाढ झाल्याने निवास, प्रवास …

The post त्र्यंबकनगरी पर्यटकांनी गजबजली, दहा पट दर देऊनही मिळेना खोली appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकनगरी पर्यटकांनी गजबजली, दहा पट दर देऊनही मिळेना खोली

थंडीने नाशिककर गारठले, पाऱ्यातील घसरण कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शहर व परिसरामध्ये वातावरणातील बदल कायम असून, रविवारी (दि.१७) पारा थेट १२.६ अंशांवर स्थिरावला. त्यामुळे थंडीचा कडाका जाणवत आहे. वाढत्या थंडीमुळे नाशिककर गारठून गेले आहेत. हवामानात होणाऱ्या या बदलानंतर नागरिकांमध्ये विविध आजार बळावत आहेत. (Nashik cold) उत्तर भारताकडून येणाऱ्या शीतलहरी तसेच नाशिकमधील कोरड्या हवामानामुळे थंडीचा जाेर वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून …

The post थंडीने नाशिककर गारठले, पाऱ्यातील घसरण कायम appeared first on पुढारी.

Continue Reading थंडीने नाशिककर गारठले, पाऱ्यातील घसरण कायम

नाशिक : पिंपळनेर पोलिसांचा कापूस चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग; अडथळ्यासाठी फेकल्या कापसाच्या गोण्या

पुढारी वृत्तसेवा; पिंपळनेर : साक्री तालुक्यातील कुडाशी येथे सिनेस्टाईल पाठलाग करणाऱ्या पोलिसांना चकवा देत कापूस चोरांची टोळी पसार झाल्याची घटना आज (दि. १२) घडली. पिंपळनेर पोलिसांनी चोरट्यांनी रस्त्यावर फेकलेल्या कापूस भरलेल्या ५० गोण्या जप्त केल्या. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, पोकॉ पंकज वाघ हे रात्री गस्त घालत होते. या दरम्यान कुडाशी रस्त्यावर कापसाच्या …

The post नाशिक : पिंपळनेर पोलिसांचा कापूस चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग; अडथळ्यासाठी फेकल्या कापसाच्या गोण्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिंपळनेर पोलिसांचा कापूस चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग; अडथळ्यासाठी फेकल्या कापसाच्या गोण्या

नाशिक : जिल्हा कांदा बटाटा उत्पादक सहकारी संस्ठेच्या निवडणुकीत सहा उमेदवारांच्या हरकती फेटाळल्या

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याची प्रतिष्ठेची झालेल्या कांदा बटाटा उत्पादक सहकारी संघटनेच्या निवडणुकीमध्ये सोमवारी (दि. ११) अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये सहा उमेदवारांनी घेतलेल्या हरकती फेटाळण्यात आलेल्या आहेत. गेल्या आठवड्यातील सहा उमेदवारांनी हरकतीं नोंदविल्या होत्या. उमेदवारी अर्जासाठी संघाकडून खते खरेदी व्यवहार होणे बंधनकारक आहे. मात्र, उमेदवारांनी व्यवहार केलेले नसल्याने त्यांचे अर्ज बाद करण्यात आले …

The post नाशिक : जिल्हा कांदा बटाटा उत्पादक सहकारी संस्ठेच्या निवडणुकीत सहा उमेदवारांच्या हरकती फेटाळल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा कांदा बटाटा उत्पादक सहकारी संस्ठेच्या निवडणुकीत सहा उमेदवारांच्या हरकती फेटाळल्या

पोलिस उपनिरीक्षक परीक्षेला २४० उमेदवार गैरहजर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय पदासाठीची स्पर्धा पूर्व परीक्षा रविवारी (दि.१०) सकाळी ११ ते १२ या वेळेत झाली. या परीक्षेला एकूण २ हजार ४५८ उमेदवारांपैकी २ हजार २१८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली तर, २४० उमेदवार परीक्षेला अनुपस्थित राहिले. (MPSC PSI Bharti) नाशिकमधील पेठे विद्यालय, सारडा कन्या विद्यालय, …

The post पोलिस उपनिरीक्षक परीक्षेला २४० उमेदवार गैरहजर appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिस उपनिरीक्षक परीक्षेला २४० उमेदवार गैरहजर

नाशिक: शांतीनिकेतन चौक परिसरात ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट

नाशिक: पुढारी वृत्तसेवा : गंगापूर रोड येथील शांतीनिकेतन चौक परिसरात ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना आज (दि.९) सायंकाळी घडली. वाहनातून ३ सिलिंडर नेत असताना त्यापैकी एका सिलिंडरचा स्फोट झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या स्फोटात चारचाकी गाडीचे व एका रिक्षाचे नुकसान झाले. तसेच परिसरातील ऋषिराज होरीझॉन सह इतर इमारतीमधील काचा फुटल्या. या घटनेनंतर परिसरात भीतीचे …

The post नाशिक: शांतीनिकेतन चौक परिसरात ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: शांतीनिकेतन चौक परिसरात ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट

नाशिक : कांदा निर्यात बंदीविरोधात मनमाड- नगर महामार्ग रोखला

येवला : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी जाहीर केल्याने कांदा बाजारभाव गडगडले आहेत. याच्या निषेधार्थ येवला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मनमाड – नगर महामार्गावर शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रास्ता रोको केला. शेतकऱ्यांनी ठिय्या देत आंदोलन केल्याने वाहतूक खोळंबली होती. यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या निर्यातबंदीमुळे चार …

The post नाशिक : कांदा निर्यात बंदीविरोधात मनमाड- नगर महामार्ग रोखला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा निर्यात बंदीविरोधात मनमाड- नगर महामार्ग रोखला

नाशिकमध्ये धडाडणार सुषमा अंधारेंची तोफ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा)च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा रविवार (दि. १०) पासून नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या यात्रेदरम्यान, रविवारी सायंकाळी ५ वाजता मनमाडमधील एकात्मता चौक येथे, तर सोमवारी (दि. ११) सायंकाळी ५ वाजता नाशिक शहरातील बी. डी. भालेकर मैदानावर अंधारे यांची जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती ठाकरे …

The post नाशिकमध्ये धडाडणार सुषमा अंधारेंची तोफ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये धडाडणार सुषमा अंधारेंची तोफ

पीएम योजनेतून नाशिकला शंभर इलेक्ट्रिक बसेस; केंद्र शासनाची मंजुरी

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : पीएम ई बस योजनेअंतर्गत केंद्र शासनाने नाशिक महापालिकेसाठी 100 इलेक्ट्रिक बसेसला अनुदान मंजूर केले आहे. यामुळे नाशिक मध्ये पर्यावरण पूरक बस वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला असून महापालिकेच्या सिटी लिंक बससेवेचा तोटाही डिझेल सीएनजी इंधनावरील बसेसच्या तुलनेत काही प्रमाणात कमी होणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी नाशिक महापालिकेने सर्व सेवा चालविण्याचा निर्णय …

The post पीएम योजनेतून नाशिकला शंभर इलेक्ट्रिक बसेस; केंद्र शासनाची मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading पीएम योजनेतून नाशिकला शंभर इलेक्ट्रिक बसेस; केंद्र शासनाची मंजुरी

घरातील गोष्टी बाहेर सांगणे चांगल्या मुलाचे लक्षण नाही: जयंत पाटील

दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा : कुटुंबातील काही गोष्टींची चर्चा बाहेर करायची नसते. अशा गोष्टी कुटुंबातच ठेवायच्या असतात. त्या चर्चा बाहेर सांगायच्या नसतात. हे चांगल्या मुलाचे लक्षण नाही, असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता लगावला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज (दि.१) …

The post घरातील गोष्टी बाहेर सांगणे चांगल्या मुलाचे लक्षण नाही: जयंत पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading घरातील गोष्टी बाहेर सांगणे चांगल्या मुलाचे लक्षण नाही: जयंत पाटील