नाशिकच्या हरिहर किल्ल्यावर ट्रेकर्ससह पर्यटकांची झुंबड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वरुणराजाने सर्वदूर हजेरी लावल्याने वर्षा सहलींचे पेव फुटले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्यावर जाण्यासाठी ट्रेकर्ससह हौशी पर्यटकांची झुंबड उडाली होती. दुर्घटना टाळण्यासाठी वनविभागाने 50-50 पर्यटकांना ‘स्लॉट’द्वारे किल्ल्यावर सोडण्याचे नियोजन केले होते. मात्र, पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविताना वनविभागाच्या नाकीनऊ आल्याचे चित्र बघावयास मिळाले. निसर्गाचे कोंदण लाभलेल्या नाशिक जिल्ह्याला पर्यटकांची नेहमीच पसंती …

The post नाशिकच्या हरिहर किल्ल्यावर ट्रेकर्ससह पर्यटकांची झुंबड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या हरिहर किल्ल्यावर ट्रेकर्ससह पर्यटकांची झुंबड

त्र्यंबकला नदी-नाल्यांना पूर ; कुठे रस्ते पाण्याखाली तर कुठे दरडी कोसळल्या

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी पहाटे अचानक तेलीगल्ली आणि मेनरोड परिसरात नीलगंगा आणि म्हातार ओहोळ या नाल्यांच्या पुराचे पाणी घुसल्याने रहिवाशांची झोप उडवली. या पुराने मेनरोड परिसरात सर्वत्र चिखल साचला. त्र्यंबकेश्वरला दिवसभरात 93 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वशिष्ठा नदीस पूर असल्याने पिंप्रीजवळच्या पुलाच्या बाजूस असलेला रस्ता …

The post त्र्यंबकला नदी-नाल्यांना पूर ; कुठे रस्ते पाण्याखाली तर कुठे दरडी कोसळल्या appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकला नदी-नाल्यांना पूर ; कुठे रस्ते पाण्याखाली तर कुठे दरडी कोसळल्या

नाशिकमध्ये गोदावरी खळाळली ; पुरात अडकलेल्या 65 वृद्धांची सुटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे आणि गंगापूर धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीला महापुराचे स्वरूप आले आहे. नदीकाठी असलेल्या शहरातील संत गाडगे महाराज धर्मशाळा आणि लगतच असलेल्या मनपा शाळा क्र. 16 मध्ये उभारलेल्या बेघरांसाठीच्या निवारागृहाला (शेल्टर हाऊस) पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकून पडलेल्या 65 वृद्धांना मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने सुखरूप …

The post नाशिकमध्ये गोदावरी खळाळली ; पुरात अडकलेल्या 65 वृद्धांची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गोदावरी खळाळली ; पुरात अडकलेल्या 65 वृद्धांची सुटका

नाशिक : तांदळात आढळले किडे आणि खडे, चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शासनाकडून पुरविण्यात येणार्‍या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणावर किडे आणि खडे आढळून येत असल्याने शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने या बाबींची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम हे या चौकशी समितीचे अध्यक्ष असतील, तर जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहार योजनेचे लेखाधिकारी …

The post नाशिक : तांदळात आढळले किडे आणि खडे, चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तांदळात आढळले किडे आणि खडे, चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

नाशिक : नांदूरमध्यमेश्वरचे सर्व दरवाजे उघडले

निफाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून, गोदावरीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याची आवक वाढल्याने या धरणाचे सर्व आठही दरवाजे सोमवारी उघडण्यात आले. येथून 41,613 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. आधीच पालखेड धरणातून 21,560 क्यूसेक, दारणा धरणातून 15,080 क्यूसेक, कडवातून 4,150 …

The post नाशिक : नांदूरमध्यमेश्वरचे सर्व दरवाजे उघडले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदूरमध्यमेश्वरचे सर्व दरवाजे उघडले

नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम ; जिल्ह्यातील धरणसाठा ‘असा’

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोटमध्ये दिवसभरात 113 मिमी पाऊस झाला. यामुळे गंगापूर धरणात 67 टक्के साठा होऊन दहा हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू होता. र्त्यंबकेश्वर तालुक्यातील पावसाचा जोर कायम असून, दिवसभरात गौतमी धरणाच्या पाणलोटमध्ये 105, र्त्यंबकेश्वर येथे 93 , आंबोलीत 166 मिमी पाऊस झाला. यामुळे गंगापूर धरणातील विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, …

The post नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम ; जिल्ह्यातील धरणसाठा 'असा' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम ; जिल्ह्यातील धरणसाठा ‘असा’

नाशिक जिल्ह्यात गोदा, दारणा, कादवा, गिरणेला पूर, 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी दिवसभर अतिवृष्टी झाली. यामुळे सर्व प्रमुख धरणांमधून जवळपास 80 हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू असल्याने गोदावरी, दारणा, कादवा, गिरणा या नद्यांना पूर आले होते. त्यातच हवामान विभागाने 14 जुलैपर्यंत जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा दिल्यामुळे राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने धुळे येथून …

The post नाशिक जिल्ह्यात गोदा, दारणा, कादवा, गिरणेला पूर, 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात गोदा, दारणा, कादवा, गिरणेला पूर, 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट

फ्लेमिंगो दोन महिने आधीच नांदूरमध्यमेश्वरला, ऐन पावसाळ्यात प्रथमच आगमन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : स्थलांतरित पक्ष्यांचे माहेघर तसेच रामसरचा दर्जा मिळालेल्या नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात गेल्या दोन दिवसांपासून सुमारे साडेतीनशे ते चारशे ‘फ्लेमिंगो’च्या थव्याने मुक्काम ठोकला आहे. ऐन पावसाळ्यात ‘फ्लेमिंगो’चे नांदूरमध्यमेश्वर आगमन झाल्याची पहिलीच घटना घडली आहे. दोन-तीन महिन्यांआधीच ‘फ्लेमिंगो’ने हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्राचे भरतपूर अशी ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरात …

The post फ्लेमिंगो दोन महिने आधीच नांदूरमध्यमेश्वरला, ऐन पावसाळ्यात प्रथमच आगमन appeared first on पुढारी.

Continue Reading फ्लेमिंगो दोन महिने आधीच नांदूरमध्यमेश्वरला, ऐन पावसाळ्यात प्रथमच आगमन

नाशिक : गोदावरीला पहिला पूर ; प्रशासनातर्फे रहिवासी-व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे सोमवारी (दि.11) दुपारनंतर धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे गोदावरीला यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर आला आहे. नदीकाठच्या रहिवासी व व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन व निवारण कक्षाने गोदावरी नदीकाठावरील झोपड्या आणि गोदाघाट-रामकुंड परिसरातील टपर्‍या हटविल्या आहेत. येथील रहिवाशांचे …

The post नाशिक : गोदावरीला पहिला पूर ; प्रशासनातर्फे रहिवासी-व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदावरीला पहिला पूर ; प्रशासनातर्फे रहिवासी-व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा

जळगाव : हतनुर धरणाचे १६ दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या २६ गावांना सतर्कतेचा इशारा

जळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे तापी नदीच्या जलपातळीत वाढ झाली असून, हतनुर धरणाचे १६ दरवाजे हे आता पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. यापूर्वी कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु होता पण गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढत असल्याने आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास १६ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्याल आले आहेत. …

The post जळगाव : हतनुर धरणाचे १६ दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या २६ गावांना सतर्कतेचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : हतनुर धरणाचे १६ दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या २६ गावांना सतर्कतेचा इशारा