नाशिक : अखेर धनगर यांची कारागृहात रवानगी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता सुभाष धनगर व लिपीक नितीन अनिल जोशी (४५, रा. तपोवन) यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे दोघांचीही मंगळवारी (दि.६) सायंकाळी मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. धनगर व जोशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि. २) ५५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. …

The post नाशिक : अखेर धनगर यांची कारागृहात रवानगी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अखेर धनगर यांची कारागृहात रवानगी

वाढत्या उष्म्यामुळे नाशिककर झाले त्रस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर व परिसरात उष्णतेची लाट कायम आहे. मंगळवारी (दि. ६) तापमानाचा पारा ३५.९ अंश सेल्सियसवर पाेहचल्याने हवेत उष्मा अधिक जाणवत होता. त्यामुळे नाशिककर त्रस्त झाले. दरम्यान, पुढील चार दिवस जिल्ह्याच्या काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज आहे. अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचे वारे घोंगावते आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह …

The post वाढत्या उष्म्यामुळे नाशिककर झाले त्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading वाढत्या उष्म्यामुळे नाशिककर झाले त्रस्त

Nashik : ‘हरित नाशिक, सुंदर नाशिक’ साठी महापालिका लावणार ‘इतकी’ झाडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘हरित नाशिक, सुंदर नाशिक’ अशी बिरुदावली मिरविण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाकडून ऑक्टोबर २०२३ पर्यंत शहरभर २० हजार वृक्षलागवड केली जाणार आहे. शहराच्या सहाही विभागांत ही लागवड केली जाणार असून, यामध्ये स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घेतले जाणार आहे. त्याचबरोबर झाडांच्या देखभालीसाठी कंत्राटदारांचीही नेमणूक केली जाणार आहे. दरवर्षी ही मोहीम राबविली जात असून, गेल्यावर्षी …

The post Nashik : 'हरित नाशिक, सुंदर नाशिक' साठी महापालिका लावणार 'इतकी' झाडे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘हरित नाशिक, सुंदर नाशिक’ साठी महापालिका लावणार ‘इतकी’ झाडे

नाशिक महापालिकेच्या उद्यानातच होणार कंपोस्ट खताची निर्मिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारकडून राबविल्या जात असलेल्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एन-कॅप) अंतर्गत महापालिकेच्या उद्यान विभागाला ५० लाखांचा निधी प्राप्त झाला असून, त्यातून महापालिका सहा श्रेडर मशीन खरेदी करणार आहे. या मशीन महापालिकेच्या सहाही विभागांतील प्रमुख उद्यानांमध्ये बसविल्या जाणार असून, उद्यानातच कंपोस्ट खताची निर्मिती केली जाणार आहे. देशातील १३२ शहरांमधील प्रदूषण पातळी कमी …

The post नाशिक महापालिकेच्या उद्यानातच होणार कंपोस्ट खताची निर्मिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेच्या उद्यानातच होणार कंपोस्ट खताची निर्मिती

नाशिक : जिल्हा परिषदेत भाकरी फिरली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या अतंर्गत बदल्या मंगळवारी (दि.6) करण्यात आल्या. मुख्यालयातील विविध विभागातील 39 कर्मचाऱ्यांचे अतंर्गत बदल्या समुपदेशाने करण्यात आल्या. यामुळे वर्षोनुवर्षे एकाच विभागात असलेल्या कर्मचाऱ्यांचे टेबल बदलले गेले आहेत. तर बांधकाम विभागातील वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचा-यांच्या देखील बदल्या करण्याचे आदेश सीईओ आशिमा मित्तल यांनी दिले आहे. तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या …

The post नाशिक : जिल्हा परिषदेत भाकरी फिरली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेत भाकरी फिरली

राज्यात आयटीआयच्या दीड लाख जागा, लवकरच राबविणार प्रवेश प्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर इयत्ता अकरावी तसेच इतर व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची लगबग सुरू होते. इयत्ता अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी राज्यात आयटीआयच्या दीड लाख जागा उपलब्ध असणार आहेत. राज्यातील शासकीय …

The post राज्यात आयटीआयच्या दीड लाख जागा, लवकरच राबविणार प्रवेश प्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात आयटीआयच्या दीड लाख जागा, लवकरच राबविणार प्रवेश प्रक्रिया

नाशिक : महापालिकेचा ‘प्रभारी’ कारभार; बदली, निवृत्ती अन् लाचखोरीमुळे विभाग वाऱ्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेचा कारभार सध्या ‘प्रभारी’ झाला आहे. बदली, निवृत्ती अन् लाचखोरीच्या प्रकारांमुळे बहुतांश विभागाच्या चाव्या प्रभारी कारभाऱ्यांकडे आल्या आहेत. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची पुणे येथे साखर आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर त्यांचा पदभार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्याचबरोबर इतरही प्रमुख विभागांत प्रभारी राज असल्याने, जनसेवेच्या कामांवर …

The post नाशिक : महापालिकेचा 'प्रभारी' कारभार; बदली, निवृत्ती अन् लाचखोरीमुळे विभाग वाऱ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेचा ‘प्रभारी’ कारभार; बदली, निवृत्ती अन् लाचखोरीमुळे विभाग वाऱ्यावर

नाशिक : प्रत्येक रुग्णालयात लाखोंची धुलाई झाल्याचा संशय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक आरोग्य विभागातील ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुण्याच्या बिलांचा गैरव्यवहार समोर आला. यात प्रत्येक रुग्णालयात किमान पाच लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ३० खाटांचे रुग्णालय असतानाही दररोज २०० हून अधिक कपडे धुतल्याचे सांगत ठेकेदाराने शासनाकडे बिल दिल्याचे चौकशीतून समोर येत आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयात किमान पाच लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची …

The post नाशिक : प्रत्येक रुग्णालयात लाखोंची धुलाई झाल्याचा संशय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रत्येक रुग्णालयात लाखोंची धुलाई झाल्याचा संशय

Nashik : मालेगावी लाच घेताना पोलिस शिपाई रंगेहाथ ताब्यात

मालेगाव (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात लाचखोरांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई सुरू असली तरी त्याचा लाचखोरांवर कोणताही परिणाम झाल्याची बाब अधोरेखित होत आहे. नाशिकमधील दोन मोठ्या कारवायांनंतर मालेगाव तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचारी ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकला आहे. मंगळवारी (दि.६) ही कारवाई झाली. तक्रारदाराच्या बहिणीविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्याच्या …

The post Nashik : मालेगावी लाच घेताना पोलिस शिपाई रंगेहाथ ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मालेगावी लाच घेताना पोलिस शिपाई रंगेहाथ ताब्यात

नाशिक : धुरळा उडाला… ११ वर्षांनंतर रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला परवानगी दिल्यानंतर तब्बल ११ वर्षांनंतर शहरात बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवायला मिळाला. बोरगड परिसरातील ठक्कर मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून बैलगाडा स्पर्धक सहभागी झाले होते. तर विजेत्यांना लाखो रुपये किमतीच्या दुचाकीने गौरविण्यात आले. शर्यतीत वेगाने बैलजोडीचा थरार हा प्रत्येकाच्या अंगावर काटा निर्माण करणारा होता. काही वर्षांपासून बैलगाडी …

The post नाशिक : धुरळा उडाला... ११ वर्षांनंतर रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धुरळा उडाला… ११ वर्षांनंतर रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार