ट्विन टॉवर्स पाडले; नाशिकमध्ये धाबे दणाणले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशातील सर्वांत मोठे 32 मजली ट्विन टॉवर्स अवघ्या 12 सेकंदांत जमीनदोस्त झाले अन् भ्रष्टाचाराचे टॉवर पडले म्हणून देशभरातील लोकांनी टाळ्यांचा गजर केला. या कारवाईमुळे देशभरात सकारात्मक संदेश गेला असला तरी, बेकायदेशीरपणे भ्रष्टाचाराचे इमले उभारणार्‍यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. नाशिकमधील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून, माहिती अधिकार कार्यकर्ते सरसावल्याने …

The post ट्विन टॉवर्स पाडले; नाशिकमध्ये धाबे दणाणले appeared first on पुढारी.

Continue Reading ट्विन टॉवर्स पाडले; नाशिकमध्ये धाबे दणाणले

नाशिकमध्ये तांब्या-पितळेच्या वस्तूंवर चोरट्यांचा डोळा, संशयित सीसीटीव्हीत कैद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी असलेल्या तांब्या-पितळेच्या वस्तू चोरीला जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे बहुतांश मंडळांच्या ठिकाणी पोलिस तसेच कार्यकर्त्यांचा पहारा असतानाही काही भामटे अत्यंत हाथसफाईने या वस्तू लंपास करीत आहेत. या भामट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा आनंद असून, मोठमोठ्या …

The post नाशिकमध्ये तांब्या-पितळेच्या वस्तूंवर चोरट्यांचा डोळा, संशयित सीसीटीव्हीत कैद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये तांब्या-पितळेच्या वस्तूंवर चोरट्यांचा डोळा, संशयित सीसीटीव्हीत कैद

नाशिक : भरधाव कारच्या धडकेत जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक, सातपूर : पुढारी वृत्तसेवा सातपूर- त्र्यंबकेश्वर रोडवर भरधाव कारच्या धडकेत 25 वर्षीय युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. याच ठिकाणी महिनाभरापूर्वी अशीच घटना घडली होती. वाहतूक सुरक्षाव्यवस्था नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघातांचे प्रकार घडत आहेत, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम वासुडकर हा युवक सातपूर औद्योगिक वसाहतील टपारिया टूल्स या खासगी …

The post नाशिक : भरधाव कारच्या धडकेत जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भरधाव कारच्या धडकेत जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक : सिन्नरकरांना हवीय सव्वा कोटीची तातडीची मदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यात सिन्नर शहरात झालेल्या ढगफुटीमुळे अंदाजे 6 कोटी रुपयांचे प्राथमिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शहरालगतच्या भागातील शेतीपिकांसह पाच पूल तसेच घरे व दुकानांचे अतोनात नुकसान झाले आहे. सिन्नरकरांना तातडीच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने 1 कोटी 21 लाख 85 हजार 550 रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. सिन्नर शहर व परिसरात …

The post नाशिक : सिन्नरकरांना हवीय सव्वा कोटीची तातडीची मदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नरकरांना हवीय सव्वा कोटीची तातडीची मदत

नाशिक : विसर्जन मिरवणुकीस उशीर केल्यास गुन्हा, बैठकीत झाले ‘हे’ निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील शेवटच्या मंडळालाही विसर्जनस्थळी जाता यावे, यासाठी मिरवणुकीत सहभागी होणार्‍या मंडळांची सकाळी 11 वाजताच मिरवणूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिरवणुकीस उशीर केल्यास संबंधित मंडळांच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी बैठकीत सांगितले. रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्र किनार्‍यावर ‘रेड झोन’; पर्यटकांना पोहण्यासाठी मनाई भद्रकाली पोलिस ठाण्यात मंगळवारी …

The post नाशिक : विसर्जन मिरवणुकीस उशीर केल्यास गुन्हा, बैठकीत झाले 'हे' निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विसर्जन मिरवणुकीस उशीर केल्यास गुन्हा, बैठकीत झाले ‘हे’ निर्णय

नाशिक : अतिक्रमणे होऊ नये याकरिता दक्षता समिती; आरक्षित जागांचे करणार सर्वेक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या मालकीचे भूखंड सुरक्षित करण्याच्या आयुक्तांच्या सूचनेनंतर आता आरक्षित जागा व इमारतींचे विभागनिहाय सर्वेक्षण करण्याबरोबरच अतिक्रमणे होऊ नये याकरिता दक्षता समिती गठीत करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर अतिक्रमणे उद्ध्वस्त केली जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील आनंदवली शिवारातील सर्व्हे क्रमांक 67 या महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर खासगी व्यावसायिकाने बांधकाम …

The post नाशिक : अतिक्रमणे होऊ नये याकरिता दक्षता समिती; आरक्षित जागांचे करणार सर्वेक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अतिक्रमणे होऊ नये याकरिता दक्षता समिती; आरक्षित जागांचे करणार सर्वेक्षण

नाशिक : हद्दपार गुन्हेगाराचा दोघांनी काढला काटा, मालेगावच्या गोल्डननगरमध्येे मध्यरात्री खून

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा गोल्डननगरमध्ये मंगळवारी (दि. 6) मध्यरात्री थरारनाट्य घडले. सराईत गुन्हेगारावर दोघांनी धारदार हत्यारांनी हल्ला करत त्याचा निर्घृण खून केला. मनमाडमार्गे रेल्वेने पसार होण्याच्या प्रयत्नातील दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. शकील हॉटेलजवळ रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. सलमान अहमद सलीम अहमद (28, रा. बाग-ए-महेमूद जलकुंभाजवळ, संगमेश्वर शिवार) याच्यावर मागील …

The post नाशिक : हद्दपार गुन्हेगाराचा दोघांनी काढला काटा, मालेगावच्या गोल्डननगरमध्येे मध्यरात्री खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हद्दपार गुन्हेगाराचा दोघांनी काढला काटा, मालेगावच्या गोल्डननगरमध्येे मध्यरात्री खून

नाशिक : लहवितकरांनी सोडला नि:श्वास; पाच वर्षांची बिबट्या मादी जेरबंद

नाशिक ( देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा लहवित गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून संचार करणारी पाच वर्षांची बिबट्या मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. गेल्या काही दिवसांपासून लहवित वंजारवाडी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातल्याने शेतकरी नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहाणी करून राजाराम पाळदे यांच्या शेतात पिंजरा लावला होता. …

The post नाशिक : लहवितकरांनी सोडला नि:श्वास; पाच वर्षांची बिबट्या मादी जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लहवितकरांनी सोडला नि:श्वास; पाच वर्षांची बिबट्या मादी जेरबंद

Nashik : मालेगावी कृषीसेवा केंद्राला भीषण आग

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यांमधील एका कृषीसेवा केंद्राला मंगळवारी दि.6 सकाळी अचानक आग लागली. तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अवघ्या काही मिनिटांत आग शमविण्यात यश आले. परंतु, तत्पूर्वी भडकलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात औषधे, खते यांना झळ पोहोचली. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दाभाडी येथील …

The post Nashik : मालेगावी कृषीसेवा केंद्राला भीषण आग appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मालेगावी कृषीसेवा केंद्राला भीषण आग

नाशिक : फळविहीरवाडीचा बंधारा दुरुस्त करण्याचे गिरीश महाजन यांचे आदेश

नाशिक (सर्वतीर्थ टाकेद) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील अडसरे येथील फळविहीरवाडीतील ढगफुटीमुळे फुटलेल्या पाझर तलावाची राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. तसेच स्थानिक शेतकर्‍यांशी संवाद साधला. फुटलेला बंधारा तत्काळ दुरुस्त करण्यात यावा. जेणेकरून या भागातील पाणीप्रश्न मार्गी लागेल. शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून अहवाल शासनस्तरावर पाठवावा, …

The post नाशिक : फळविहीरवाडीचा बंधारा दुरुस्त करण्याचे गिरीश महाजन यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फळविहीरवाडीचा बंधारा दुरुस्त करण्याचे गिरीश महाजन यांचे आदेश