नाशिक : बायोमेट्रिकची सक्ती, मनपा मुख्यालयातील अधिकारी ‘फुलटाइम ऑन ड्यूटी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा स्वैर कारभार समोर आल्यानंतर प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवसातून तीन वेळा बायोमेट्रिक सक्तीचे केल्याने गुरुवारी (दि.२५) अधिकाऱ्यांसह कर्मचारी ‘फुलटाइम ऑन ड्यूटी’ दिसून आले. एरवी बैठका तसेच व्हिजिटच्या नावे दिवसभर दांडी मारणारे कर्मचारी तसेच अधिकारी बायोमेट्रिक सक्तीमुळे आपापल्या कार्यालयातच आढळून आले. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार …

The post नाशिक : बायोमेट्रिकची सक्ती, मनपा मुख्यालयातील अधिकारी 'फुलटाइम ऑन ड्यूटी' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बायोमेट्रिकची सक्ती, मनपा मुख्यालयातील अधिकारी ‘फुलटाइम ऑन ड्यूटी’

नाशिक : सालगडी नसल्याने शेतकरी चिंतातूर; दीड लाख रुपयांचा भाव

नाशिक (कनाशी) : पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांचे नवीन वर्ष म्हणून ओळख असलेला गुढीपाडवा सण पार पडला. खरिपाच्या हंगामाला सुरुवातही झाली. तरी ग्रामीण भागात सालगडी मिळेनासा झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी शेतकरी गुढीपाडवा सणाला शेतातील कामांसाठी सालगड्यांची नेमणूक करतात. परंतु यंदा शेतीत वर्षभर राबणाऱ्या सालगड्यांचे भाव दीड लाखाहून अधिक झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. ग्रामीण भागात …

The post नाशिक : सालगडी नसल्याने शेतकरी चिंतातूर; दीड लाख रुपयांचा भाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सालगडी नसल्याने शेतकरी चिंतातूर; दीड लाख रुपयांचा भाव

Nashik : सप्तशृंगीगडावरील पाणवठे कोरडे, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

सप्तशृंगगड (जि. नाशिक) : तुषार बर्डे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान तसेच कुलदैवत असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या गडावर वनविभागाने मंकी पॉइंट शिवालय तलावाच्या परिसरात लाखो रुपये खर्चून वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ठिकठिकाणी पाणवठे बांधले आहेत. मात्र, ऐन उन्हाळ्यात या पाणवठ्यांमध्ये पाणीच साेडले जात नसल्याने ते केवळ शाेभेच्या वास्तू ठरत आहेत. वन्यजिवांसाठी गडावर पाणवठे बांधले खरे, परंतु त्यात …

The post Nashik : सप्तशृंगीगडावरील पाणवठे कोरडे, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सप्तशृंगीगडावरील पाणवठे कोरडे, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

नाशिक : पार्टटाइम जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाला ३४ लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पार्टटाइम जॉब देण्याच्या बहाण्याने शहरातील एका ३३ वर्षीय तरुणाची तब्बल ३४ लाखांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. सायबर भामटे वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून नागरिकांना गंडा घालत असून, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सातपूर येथील धनंजय कोल्हे यांना पार्टटाइम जाॅब करा आणि लाखाे रुपये मिळवा, अशी ऑफर संशयितांनी दिली होती. संशयितांनी त्यांना टेलिग्राम …

The post नाशिक : पार्टटाइम जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाला ३४ लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पार्टटाइम जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाला ३४ लाखांचा गंडा

नाशिक : करवसुलीसाठी महापालिकेचे ‘वॉरंट अस्त्र’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा करवसुलीसाठी महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. ग्राहकांना सवलती देण्याबरोबरच कर बुडविणाऱ्यांना वॉरंटही बजावले जात आहे. आतापर्यंत ३७९ धेंडांना मालमत्ता जप्तीचे वाॅरंट बजावले असून, त्यातील १८८ थकबाकीदार वठणीवर आल्याने ‘वॉरंट अस्त्र’ चांगलेच प्रभावी ठरताना दिसून येत आहे. कारण वॉरंट बजावताच साडेनऊ कोटींचा भरणार करण्यात आला आहे. अजूनही 200 थकबाकीदारांनी …

The post नाशिक : करवसुलीसाठी महापालिकेचे 'वॉरंट अस्त्र' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : करवसुलीसाठी महापालिकेचे ‘वॉरंट अस्त्र’

नाशिक : जोपूळ येथील सरपंचाच्या द्राक्षबागेतील 80 झाडे तोडली, शेतीसाहित्याचीही चोरी

 दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जोपूळ येथील सरपंच माधव उगले यांच्या द्राक्षबागेचे समाजकंटकांनी मध्यरात्री मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच शेतीसाहित्याचीही चोरी करण्यात आली आहे. याबद्दल माहिती अशी की, जोपूळचे सरपंच माधव उगले यांची जोपूळ-पिंपळगाव मार्गावर जोपूळ शिवारात द्राक्षबाग आहे. काही समाजकंटकांनी 20 मेच्या मध्यरात्रीच्या सुमारास उगले यांच्या द्राक्षबागेत कुऱ्हाडीने घाव घालून मोठ्या …

The post नाशिक : जोपूळ येथील सरपंचाच्या द्राक्षबागेतील 80 झाडे तोडली, शेतीसाहित्याचीही चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जोपूळ येथील सरपंचाच्या द्राक्षबागेतील 80 झाडे तोडली, शेतीसाहित्याचीही चोरी

नाशिक : …तर महिला पथकाला चोप देणार ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा बँकेने कर्ज वसुलीसाठी जर महिला पथकांचा वापर केला आणि त्या महिलांनी शेतकऱ्यांना वसुलीसाठी अपमानित केले तर आमच्याही शेतकऱ्यांच्या महिला त्या महिलांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप व त्यांच्या शिष्टमंडळाने दिला आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक चव्हाण व स्वाभिमानी शेतकरी …

The post नाशिक : ...तर महिला पथकाला चोप देणार ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : …तर महिला पथकाला चोप देणार ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

Nashik : ग्रामस्थ हरिनाम सप्ताहात रंगले; चोरट्यांनी भर दिवसा घर फोडले

दातली : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मुसळगाव येथे आज गुरुवार(२५) पासून अमृतमहोत्सवी सप्ताह सुरू झालेला असून या निमित्ताने गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. आज सप्ताहाचा पहिला दिवस असल्याने सकाळी महंत श्री …

The post Nashik : ग्रामस्थ हरिनाम सप्ताहात रंगले; चोरट्यांनी भर दिवसा घर फोडले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ग्रामस्थ हरिनाम सप्ताहात रंगले; चोरट्यांनी भर दिवसा घर फोडले

Nashik : मृत रुग्ण जिवंत होतो तेव्हा…, जिल्हा रुग्णालयातील प्रकार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रुग्णाचा इसीजी केल्यानंतर कागदावरील सरळ रेषा म्हणजे रुग्णाच्या हृदयाची धडधड बंद झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीयदृष्ट्या सांगितले जाते. त्यामुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळतो. गुरूवारी (दि.25) जिल्हा रुग्णालयातही इसीजी रिपोर्टनुसार मृत ठरवलेला रुग्ण काहीवेळाने जिवंत असल्याचे लक्षात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अशोकस्तंभ परिसरातील एका व्यावसायिकाने सोमवारी (दि. २२) दुपारी पेटवून …

The post Nashik : मृत रुग्ण जिवंत होतो तेव्हा..., जिल्हा रुग्णालयातील प्रकार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मृत रुग्ण जिवंत होतो तेव्हा…, जिल्हा रुग्णालयातील प्रकार

ईडी लावली म्हणून तुम्हाला मोक्का लावला, एकनाथ खडसेंची मंत्री महाजनांवर टीका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा माझ्यामागे इतका वेळ वाया घालवण्यापेक्षा शेतकऱ्याच्या हितासाठी वेळ द्या. राज्यात सुडाचे राजकारण सुरू असून, विरोधात बोलले, तर ईडी लावायची, सीबाआय लावायची अशा स्वरुपाचे उद्योग करून दडपशाही केली जात आहे. माझ्यामागे तर गिरीशने सगळ्या यंत्रणा लावल्या अन् मला विचारतो, मला मोक्का का लावला? तू ईडी लावली म्हणून तुझ्यामागे मोक्का लावला. ईडी नसती, …

The post ईडी लावली म्हणून तुम्हाला मोक्का लावला, एकनाथ खडसेंची मंत्री महाजनांवर टीका appeared first on पुढारी.

Continue Reading ईडी लावली म्हणून तुम्हाला मोक्का लावला, एकनाथ खडसेंची मंत्री महाजनांवर टीका