नाशिक-पिंपळगाव बसवंत, मोदींच्या सभेपूर्वी पाच शिवसैनिक स्थानबद्ध

ओझर: पुढारी वृत्तसेवा पिंपळगाव येथे आज होणाऱ्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोट्या आश्वासनांबद्दल जाब विचारण्याचा इशारा देणाऱ्या पाच शिवसैनिकांना पोलिसांना ताब्यात घेत नजरकैदेत ठेवले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, तालुकाप्रमुख सुधीर कराड, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील, युवासेना तालुकाप्रमुख आशिष शिंदे यांना निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम व …

Continue Reading नाशिक-पिंपळगाव बसवंत, मोदींच्या सभेपूर्वी पाच शिवसैनिक स्थानबद्ध

ब्रेकींग! मोदींच्या सभेपूर्वी कांद्याच्या माळा घालून निषेध

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव बसवंत येथील जाहीर सभेसाठी निघालेल्या त्रस्त कांदा उत्पादकांचे प्रतिनिधी म्हणून कांद्याच्या माळा घालून संतप्त घोषणा दिल्या. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पिंपळगाव बसवंत येथे आज बुधवारी (दि. १५) पंतप्रधान मोदी यांची सभा होत आहे. मोदींच्या सभेसाठी ग्रामीण पोलिसांनी सुमारे दोन हजार पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे. …

Continue Reading ब्रेकींग! मोदींच्या सभेपूर्वी कांद्याच्या माळा घालून निषेध

मोदींच्या सभेसाठी नाशिकच्या पिंपळगावला जय्यत तयारी

पिंपळगाव बसवंत(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. बुधवारी (दि. १५) दुपारी 2 वाजता होणाऱ्या या सभेसाठी पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सात एकर मैदानावर या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. (Lok Sabha Election …

Continue Reading मोदींच्या सभेसाठी नाशिकच्या पिंपळगावला जय्यत तयारी

पंतप्रधान नरेंद्र माेदींची तोफ धडाडणार, महायुतीचा प्रचार करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. सभेची तारीख आणि ठिकाण सध्या निश्चित नसले, तरी याबाबत भाजप गोटातून तयारी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील रणसंग्राम सुरू झाला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. स्टार प्रचारकांचे …

The post पंतप्रधान नरेंद्र माेदींची तोफ धडाडणार, महायुतीचा प्रचार करणार appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान नरेंद्र माेदींची तोफ धडाडणार, महायुतीचा प्रचार करणार

भाजपच्या सर्वेक्षणात आघाडी; आज उमेदवारीची घोषणा शक्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनाच महायुतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता बळावली आहे. भाजपने केलेल्या तत्काळ सर्वेक्षणात नाशिकमधून निवडून येण्यास सक्षम उमेदवार म्हणून भुजबळ यांचेच नाव आघाडीवर आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, बुधवारी (दि. १०) भुजबळ यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे. नाशिक …

The post भाजपच्या सर्वेक्षणात आघाडी; आज उमेदवारीची घोषणा शक्य appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपच्या सर्वेक्षणात आघाडी; आज उमेदवारीची घोषणा शक्य

प्रवीण दरेकर: खासदार शिंदे यांची उमेदवारीची घोषणा भाजपला मान्य नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि. 12) नाशिकमध्ये धनुष्यबाणच राहील, असा दावा करत विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची एकतर्फी घोषणा केल्याने महायुतीत संघर्ष उफाळला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी, श्रीकांत शिंदे हे ऑथॉरिटी नाहीत. उमेदवारांच्या नावांचा अंतिम निर्णय हा दिल्लीचे नेतृत्वच घेईल, अशा …

The post प्रवीण दरेकर: खासदार शिंदे यांची उमेदवारीची घोषणा भाजपला मान्य नाही appeared first on पुढारी.

Continue Reading प्रवीण दरेकर: खासदार शिंदे यांची उमेदवारीची घोषणा भाजपला मान्य नाही

मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या खर्चाचा आलेख वाढताच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला दीड महिन्यांचा कालावधी उलटला, तरी या दौऱ्याच्या खर्चाचा आलेख वाढताच राहिला आहे. दौऱ्यानिमित्त महापालिकेच्या माध्यमातून शहरात रस्ते डांबरीकरण, सजावटीसह केलेल्या सुमारे ३० कोटींच्या कामांना गेल्या महिन्यात मंजुरी दिल्यानंतरही कामांची देयके एकामागून एक सुरूच आहेत. पुतळ्यांच्या रंगरंगोटीवर 10 लाख रुपयांचा खर्च झाला असून, यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या …

The post मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या खर्चाचा आलेख वाढताच appeared first on पुढारी.

Continue Reading मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या खर्चाचा आलेख वाढताच

पाच आमदारांसह तीन जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांचे पक्षनेतृत्वाला पत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जागेवरून भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच भाजपच्या पाच आमदारांसह तीन जिल्हाध्यक्ष तसेच स्थानिक ज्येष्ठ नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिकची जागा भाजपला सोडावी, असे पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख …

The post पाच आमदारांसह तीन जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांचे पक्षनेतृत्वाला पत्र appeared first on पुढारी.

Continue Reading पाच आमदारांसह तीन जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांचे पक्षनेतृत्वाला पत्र

जेलरोडला शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मेळावा उत्साहात

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा देशातील प्रत्येक राज्यात आज ठिकठिकाणी आंदोलने सुरू असल्याचे चित्र आहे. स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये मोठे आंदोलन झाले. शेतकरी अस्वस्थ असून तेही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. मणिपुरमध्ये अशांतता आहे. महाराष्ट्रात मराठा, धनगर आणि ओबीसी समाजाचे आंदोलन सुरू आहेत, देशभरात आज सर्वत्र आंदोलने सुरू आहे. केंद्र शासन आंदोलन दडपण्याचा प्रयन्त करीत आहे. त्यामुळे येत्या लोकसभा …

The post जेलरोडला शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मेळावा उत्साहात appeared first on पुढारी.

Continue Reading जेलरोडला शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मेळावा उत्साहात

‘हर घर जल’ योजना : राज्यात सर्वाधिक कामे करण्यात नाशिक आघाडीवर

नाशिक: पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हर घर जल ही महत्त्वाकांक्षी योजना नाशिक जिल्ह्यात पूर्णत्वास जाणार नसल्याचे समोर येत आहे. तरी राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक कामे होत आहेत. सुधारित आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १,२२२ योजनांपैकी ८२१ योजना पूर्णत्वास जात आहेत. काही कारणास्तव या योजनांमधील ४०१ कामे अपुर्ण राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण …

The post 'हर घर जल' योजना : राज्यात सर्वाधिक कामे करण्यात नाशिक आघाडीवर appeared first on पुढारी.

Continue Reading ‘हर घर जल’ योजना : राज्यात सर्वाधिक कामे करण्यात नाशिक आघाडीवर