धुळे : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भातलागवड सुरु

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात दमदार पाऊस झाल्याने भातरोपणीला सुरवात झाली असून, चिखलणी करून भात रोपणी करताना शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. पश्चिम पट्ट्यात भातशेती केली जाते. कोकणाप्रमाणेच या भागातही आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने भात शेती करीत आहे. भात शेतीसाठी पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यातील भौगोलिक वातावरण अनुकूल असल्याने येथील तांदुळाला सर्वाधिक मागणी असते. …

The post धुळे : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भातलागवड सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भातलागवड सुरु

धुळे : बल्हाणे शिवारातील दोन हातभट्ट्या उद्धवस्त, पिंपळनेर पोलिसांची कारवाई

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील बल्हाणे येथे असलेल्या दोन हातभट्ट्यांवर पिंपळनेर पोलीसांनी आज सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास धडक कारवाई केली. या दोन्ही कारवायांमध्ये सुमारे दिड लाखांचे साहित्य व दारुसाठा नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे ग्रामस्थ व महिला वर्गाकडून समाधान व्यक्त होत जात आहे. पिंपळनेर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण पारधी यांच्या पथकाने आज सकाळी बल्हाणे …

The post धुळे : बल्हाणे शिवारातील दोन हातभट्ट्या उद्धवस्त, पिंपळनेर पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बल्हाणे शिवारातील दोन हातभट्ट्या उद्धवस्त, पिंपळनेर पोलिसांची कारवाई

धुळे : लाच मागितल्याप्रकरणी महिला तलाठीविरुद्द गुन्हा ; संगणक ऑपरेटर व कोतवालास अटक

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील रोजगाव येथील शेतीची खातेफोड करून तीन भावंडांच्या नावाने सातबारा करुन देण्यासाठी एप्रिल आणि मे महिन्यात लाच मागितल्याप्रकरणी महिला तलाठी व तामथरे येथील मंडलाधिकारी ज्योती पवार यांना लाचलुचपत विभागाने चिमठाणेजवळ पकडले. याप्रकरणी त्यांच्यासह संगणक ऑपरेटर आणि कोतवाल यांच्याविरोधातही गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराकडून खातेफोड करुन तीन भावाच्या …

The post धुळे : लाच मागितल्याप्रकरणी महिला तलाठीविरुद्द गुन्हा ; संगणक ऑपरेटर व कोतवालास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : लाच मागितल्याप्रकरणी महिला तलाठीविरुद्द गुन्हा ; संगणक ऑपरेटर व कोतवालास अटक

धुळे : गावठी बनावटीची मशीनगन, 20 पिस्टल, 280 जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यातील पळासनेर गावाजवळ वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणे गुन्हे शाखेने केली असून या आरोपीकडून एक मशीन गन, वीस पिस्टल आणि 280 जिवंत काढतुस जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून हा शस्त्रसाठा नेमका या आरोपीने कशासाठी आणला …

The post धुळे : गावठी बनावटीची मशीनगन, 20 पिस्टल, 280 जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : गावठी बनावटीची मशीनगन, 20 पिस्टल, 280 जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला अटक

धुळे : शहीद जवानाच्या कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते धनादेश वितरीत

धुळे – पुढारी वृत्तसेवा – भारतीय सैन्यदलातील धुळे जिल्ह्यातील शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबियातील सदस्यांना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील, नायक सुभेदार सतिष रोकडे, जिल्हा सैनिक कार्यालयातील वरीष्ठ लिपिक सहाजी बेरड, लिपिक जितेंद्र सरोदे, श्रीमती माया मनोहर पाटील (वीरपत्नी ), श्रीमती …

The post धुळे : शहीद जवानाच्या कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते धनादेश वितरीत appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शहीद जवानाच्या कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते धनादेश वितरीत

धुळे : भामेरच्या दोघी बहिणी झाल्या अधिकारी ; मोठी पीएसआय तर लहान आयुर्विमा अधिकारी

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील बळसाणे भामेर येथील रहिवासी विठ्ठल येलजी सोनवणे यांच्या दोन्ही कन्या एमपीएससी परीक्षा पास होऊन अधिकारी झाल्या आहेत. यात मोठी मुलगी नम्रता सोनवणे ही पोलिस उपनिरीक्षक झाली आहे. तर लहान मुलगी जयश्री सोनवणे ही एलआयसी मध्ये आयुर्विमा अधिकारी झाली आहे. घरच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दोन्ही बहिणींनी यश संपादन केल्यामुळे गावातून कौतुकाचा वर्षाव …

The post धुळे : भामेरच्या दोघी बहिणी झाल्या अधिकारी ; मोठी पीएसआय तर लहान आयुर्विमा अधिकारी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : भामेरच्या दोघी बहिणी झाल्या अधिकारी ; मोठी पीएसआय तर लहान आयुर्विमा अधिकारी

शेतकर्‍यांना दारोदारी फिरवल्याचा आरोप करीत धुळ्यात काँग्रेसचे आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविणार्‍या राज्यातील भाजपा-शिवसेना-अजित पवार गटाच्या सरकारने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. शेतकर्‍यांनी पिकविलेल्या कांदा, कपाशी तसेच इतर पिकाला भाव नाही. शेतकर्‍यासोबत युवक, विद्यार्थी, व्यापारी कामगार, बेरोजगार यांची घोर निराशा झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दारोदारी फिरायला लावणार्‍या सरकारच्या निषेधार्थ आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेसच्यावतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात …

The post शेतकर्‍यांना दारोदारी फिरवल्याचा आरोप करीत धुळ्यात काँग्रेसचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकर्‍यांना दारोदारी फिरवल्याचा आरोप करीत धुळ्यात काँग्रेसचे आंदोलन

खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे विमान जळगावात थांबविले

जळगाव : राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विमानाने धुळे जिल्ह्याकडे जात होते. मात्र ऐनवेळी खराब हवामानामुळे त्यांचे विमान जळगावात उतरवण्यात आले आहे. जळगावातून रस्ते मार्गाने मुख्यमंत्री धुळ्याकडे रवाना झाले आहेत. (Eknath Shinde Dhule) धुळे जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन (Eknath Shinde Dhule) करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ …

The post खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे विमान जळगावात थांबविले appeared first on पुढारी.

Continue Reading खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे विमान जळगावात थांबविले

शासन आपल्या दारी उपक्रमाचा धुळे जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर

धुळे :  पुढारी वृत्तसेवा ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत धुळे येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम सोमवार, 10 जुलै रोजी दुपारी 2.30 वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एसआरपीएफ मैदान येथे होणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाची माहिती जनसामान्यापर्यंत एलईडी चित्ररथामार्फत पोहचविण्यात येत आहेत. या चित्ररथास आज जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या चित्ररथाचे जिल्हाधिकारी …

The post शासन आपल्या दारी उपक्रमाचा धुळे जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर appeared first on पुढारी.

Continue Reading शासन आपल्या दारी उपक्रमाचा धुळे जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर

मानवी जीवनात गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण : स्वामी शिवानंद दादा

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा संत हे समाज जीवनाचे खरे मार्गदर्शक असून, संतांच्या गुरु वचनाप्रमाणे मानवाने त्यांच्या तत्त्वांचा अवलंब केल्यास आत्मसाक्षात्कार व आत्मन्नौती होते. जीवनाचे कल्याण होते. यासाठी मानवाने आसक्ती, विषय व अवगुणांचा त्याग केला पाहिजे. जीवन कृतार्थ बनवायचे असेल तर जीवनात गुरु आवश्यक आहे, असे प्रतिपादन  स्वामी शिवानंद दादाजी महाराज यांनी केले. येथील ओम …

The post मानवी जीवनात गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण : स्वामी शिवानंद दादा appeared first on पुढारी.

Continue Reading मानवी जीवनात गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण : स्वामी शिवानंद दादा