मालेगावचा पारा ४२, नाशिक 40.4; दिवसभर चटके ‘हिट वेव्ह’ची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एप्रिल महिन्याच्या मध्यात जिल्ह्यातील उन्ह तळपत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (दि.१५) मालेगावचा पारा ४२ अंशावर पोहचला. तर नाशिकमध्ये ४०.४ अंश सेल्सियस पाऱ्याची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील हे सर्वात उच्चांकी तापमान ठरले आहे. उन्हाच्या झळांनी नाशिककर हैराण झाले. सायंकाळनंतर वातावरणात बदल होत, ढगाळ हवामानासह जोरदार वारे वाहू लागले. काही ठिकाणी अवकाळीच्या रिमझिम …

The post मालेगावचा पारा ४२, नाशिक 40.4; दिवसभर चटके 'हिट वेव्ह'ची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावचा पारा ४२, नाशिक 40.4; दिवसभर चटके ‘हिट वेव्ह’ची शक्यता

नाशिकमध्ये उष्णतेच्या झळा, पारा थेट ३८.४ अंशांवर, नागरिक घामाघूम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एप्रिल महिन्याच्या मध्यात नाशिकच्या तापमानात वाढ कायम आहे. रविवारी (दि.१४) शहरातील पारा थेट ३८.४ अंशांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने नागरिक घामाघूम झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून नाशिकच्या तापमानात चढ-उतार कायम आहे. त्यातच आता पारा थेट ३८ अंशांच्या पलीकडे जाऊन पोहोचला आहे. परिणामी तीव्र उकाडा जाणवत असून, दुपारी १२ ते ४ यावेळेत …

The post नाशिकमध्ये उष्णतेच्या झळा, पारा थेट ३८.४ अंशांवर, नागरिक घामाघूम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये उष्णतेच्या झळा, पारा थेट ३८.४ अंशांवर, नागरिक घामाघूम

दुष्काळाचे चटके : धरणांची पाणीपातळी खालावल्याने तीव्र पाणीटंचाई

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा एप्रिलच्या प्रारंभीच जिल्ह्यातील धरणांचा जलसाठा खालावला आहे. जिल्ह्यातील २४ प्रमुख धरणांत केवळ २९.८४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात निम्म्याहून कमी साठा उपलब्ध आहे. धरणांची पाणीपातळी खालावल्याने सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. जिल्ह्यात यंदाच्या वर्षी उन्हाचा तडाखा अधिक आहे. तापमानाचा पारा थेट ४० अंशांपर्यंत जाऊन पोहोचला. परिणामी अवघ्या …

The post दुष्काळाचे चटके : धरणांची पाणीपातळी खालावल्याने तीव्र पाणीटंचाई appeared first on पुढारी.

Continue Reading दुष्काळाचे चटके : धरणांची पाणीपातळी खालावल्याने तीव्र पाणीटंचाई

२०१७ नंतर मार्च ठरला नाशिक जिल्ह्यासाठी ‘हाॅट’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चालूवर्षी नाशिकमध्ये उष्णतेचा दाह जाणवत असून, मार्च महिन्यात सरासरी तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ झाली. त्यामुळे २०१७ नंतर कधी नव्हे ते मार्च महिन्यात जिल्ह्यात पारा चाळिशीच्या जवळ पोहोचल्याने अंगाची लाहालाही झाली आहे. उष्णतेचा दाह वाढल्याने जिल्हावासीय हैराण झाले आहेत. त्यामुळे उन्हापासून काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाकडून …

The post २०१७ नंतर मार्च ठरला नाशिक जिल्ह्यासाठी 'हाॅट' appeared first on पुढारी.

Continue Reading २०१७ नंतर मार्च ठरला नाशिक जिल्ह्यासाठी ‘हाॅट’

नाशिकला उन्हाचा तडाखा, मध्य भारतामधील कोरड्या हवामानाचा परिणाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मार्चच्या दुसऱ्या पंधरवाड्यात नाशिकमध्ये उन्हाच्या तडाख्यात वाढ झाली आहे. तापमानाचा पारा ३५.५ अंशावर पोहचला असून प्रचंड उकाडा जाणवत आहे. उन्हाच्या झळांसोबत सामान्य घामाघूम होत आहेत. मध्य भारतामधील कोरड्या हवामानाचा परिणाम नाशिकमध्ये दिसून येत आहे. हवेतील आर्द्रता नष्ट नाहीशी झाल्याने तीव्र उकाडा जाणवत आहे. सकाळी साडेदहानंतर उन्हाचा चटका बसायला सुरवात होत आहे. …

The post नाशिकला उन्हाचा तडाखा, मध्य भारतामधील कोरड्या हवामानाचा परिणाम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला उन्हाचा तडाखा, मध्य भारतामधील कोरड्या हवामानाचा परिणाम

जळगावात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; तापमान घटल्याने दिलासा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा एकीकडे राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असून त्यातच अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहेत. आज गुरुवारी (दि.20)  साडेपाचच्या सुमारास जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, पावसाच्या हजेरीमुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यातील काही भागात दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. …

The post जळगावात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; तापमान घटल्याने दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; तापमान घटल्याने दिलासा

जळगाव : भुसावळात मंगळवारी पुन्हा उच्‍चांकी तापमान

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील तापमानाने चाळीशी कधीच ओलांडली आहे. मंगळवारी आज (दि.१८) जळगाव व भुसावळचे तापमान ४५ अंश असल्याची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे रात्री नऊपर्यंत उन्हाच्या झळा सुरू असल्याने वृध्दांसह सर्वांनाच उन्हाचा त्रासामुळे जीवाची लाही लाही होत असल्याचे चित्र आहे. धुळे : मेणबत्तीच्या कारखान्यात स्फोट; चार महिलांचा मृत्यू तर दोन गंभीर जळगाव …

The post जळगाव : भुसावळात मंगळवारी पुन्हा उच्‍चांकी तापमान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भुसावळात मंगळवारी पुन्हा उच्‍चांकी तापमान

उत्तर महाराष्ट्र तापला; भुसावळमध्ये 43 तर नाशिकमध्ये पारा 39.2 अंशांवर

जळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तापमानात घट झाली होती. मात्र सोमवारी (दि. 17) आकाश निरभ्र होताच उकाडा वाढला. भुसावळमध्ये तापमानाचा पारा 43 अंशांवर, तर जळगावात 42 अंश तापमानाची नोंद झाली. धुळ्यालाही सूर्यनारायणाने भाजून काढले असून, तेथे 41 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नंदुरबारला 40.2 अंश सेल्सियस तापमान होते. जळगाव जिल्ह्यात गेल्या …

The post उत्तर महाराष्ट्र तापला; भुसावळमध्ये 43 तर नाशिकमध्ये पारा 39.2 अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading उत्तर महाराष्ट्र तापला; भुसावळमध्ये 43 तर नाशिकमध्ये पारा 39.2 अंशांवर

नाशिककरांनो सावधान, उन्हाचा तडाखा वाढणार!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहर व परिसरात शुक्रवारी (दि.७) दिवसभर ऊन आणि ढगाळ हवामानाचा खेळ सुरू होता. वातावरणातील या सततच्या बदलामुळे शहरवासीयांना घामाच्या धारा लागल्या. पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून, त्यानंतर मात्र उन्हाचा तडाखा आणखीन वाढेल, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांपलीकडे …

The post नाशिककरांनो सावधान, उन्हाचा तडाखा वाढणार! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनो सावधान, उन्हाचा तडाखा वाढणार!

नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथे एप्रिलच्या प्रारंभीच उन्हाचा तडाखा वाढला आहे. वाढत्या उन्हासोबत सर्वसामान्यांना घामाच्या धारा लागल्या आहेत. शहरात शनिवारी (दि. 1) 32.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातील ढगाळ हवामानानंतर नाशिकमधील वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे. उन्हाचा कडाका वाढला असून एप्रिलच्या पहिल्याच दिवशी पारा 32 अंशांपलीकडे पोहोचला आहे. त्यामुळे …

The post नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढला