भारत जोडो न्याय यात्रेत शरद पवार, आदित्य ठाकरेही सहभागी होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा दि. १३ व १४ मार्चला नाशिक जिल्ह्यात येत असून, यात राहुल गांधी यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व ठाकरे गटाच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. शरद पवार हे राहुल गांधी यांच्या चांदवड येथील शेतकऱ्यांच्या सभेत, तर आदित्य ठाकरे हे …

The post भारत जोडो न्याय यात्रेत शरद पवार, आदित्य ठाकरेही सहभागी होणार appeared first on पुढारी.

Continue Reading भारत जोडो न्याय यात्रेत शरद पवार, आदित्य ठाकरेही सहभागी होणार

नाशिकमध्ये आयात उमेदवारच निवडणूक मैदानात उतरविण्याचे संकेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कधीकाळी बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर मनसेचा उमेदवार जवळपास निश्चित झाला असून, आयात उमेदवारच निवडणुकीच्या रिंगणात उतरविला जाणार असल्याची माहिती मनसेच्या गोटातून मिळत आहे. तसेच युती किंवा आघाडीसोबत न जाता, या निवडणुकीतही मनसे ‘एकला चलो’चा नारा …

The post नाशिकमध्ये आयात उमेदवारच निवडणूक मैदानात उतरविण्याचे संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आयात उमेदवारच निवडणूक मैदानात उतरविण्याचे संकेत

दादा भुसे यांच्या वक्तव्यावरुन महायुतीत वादाची ठिणगी, म्हणाले गेल्यावेळी…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात महायुतीची दिल्लीत बैठक होत असतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेने लढलेल्या जागांवर दावा केला आहे. त्यामुळे जागा वाटपावरून महायुतीत आणखीन एक वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भाजपा-शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांच्या मध्ये जागा वाटपाचा तिढा कायम …

The post दादा भुसे यांच्या वक्तव्यावरुन महायुतीत वादाची ठिणगी, म्हणाले गेल्यावेळी... appeared first on पुढारी.

Continue Reading दादा भुसे यांच्या वक्तव्यावरुन महायुतीत वादाची ठिणगी, म्हणाले गेल्यावेळी…

‘बमबम भोले’च्या गजराने त्र्यंबकनगरी दुमदुमली 

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा- महाशिवरात्रीचा पर्वकाल साधण्यासाठी हजारो शिवभक्तांनी त्र्यंबकेश्वर येथे गर्दी केली होती. त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी पहाटे चारपासून भक्तांनी रांगा लावल्या होत्या. गुरवारी रात्री पासूनच गर्दीत वाढ झाल्याने त्र्यंबक नगरी बमबम भोलेच्या जयघोषाने दुमदुमली होती. ञ्यंबकेश्वर मंदिर पुर्व दरवाजा दर्शन रांगेत सहा तासांपेक्षा जास्तवेळ लागत होता. तर पेड दर्शनासाठी देखील काही तासांची प्रतीक्षा करावी …

The post 'बमबम भोले'च्या गजराने त्र्यंबकनगरी दुमदुमली  appeared first on पुढारी.

Continue Reading ‘बमबम भोले’च्या गजराने त्र्यंबकनगरी दुमदुमली 

किराणा व्यावसायिकाची 46 लाखांची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकराेड येथील किराणा व्यावसायिकाने वेबसाईटमार्फत पेट्राेल पंप मिळविण्यासाठी अर्ज केला असता, सायबर चाेरट्यांनी या व्यावसायिकास ४६ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. त्यानुसार सायबर पाेलीस ठाण्यात अनाेळखी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकराेडच्या गाेसावीवाडी परिसरात राहणारे ४७ वर्षीय संताेष कटारे यांनी पेट्राेल पंप आणि त्याचे लायसन्स मिळण्यासाठी ऑईल कंपन्यांच्या वेगवेगळ्या वेबसाईटवर ऑनलाइन …

The post किराणा व्यावसायिकाची 46 लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading किराणा व्यावसायिकाची 46 लाखांची फसवणूक

इगतपुरीतील उंबरकोन फाट्याजवळ अपघात, 4 जण ठार

इगतपुरी पुढारी वृत्तसेवा-  इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर महामार्गावरील उंबरकोन फाट्याजवळ कार व मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झाले आहेत. शुक्रवार (दि. 8) दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. मोटारसायकल आणि चारचाकी वाहनाचा हा अपघात इतका भीषण होता की, यात 4 जण जागीच ठार झाले आहेत. अपघातातील गंभीर जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले …

The post इगतपुरीतील उंबरकोन फाट्याजवळ अपघात, 4 जण ठार appeared first on पुढारी.

Continue Reading इगतपुरीतील उंबरकोन फाट्याजवळ अपघात, 4 जण ठार

पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी शेतकऱ्यांचा कृषी विभागात ठिय्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधीची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने गेल्या सात ते आठ महिन्यांपासून तालुक्यातील शेतकरी कृषी विभागात फेऱ्या मारत आहेत. मात्र, रितसर अर्ज देऊन देखील काहीच काम होत नसल्याने संबंधित सर्व शेतकऱ्यांनी अखेर गुरूवारी (7) जळगावच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला …

The post पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी शेतकऱ्यांचा कृषी विभागात ठिय्या appeared first on पुढारी.

Continue Reading पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी शेतकऱ्यांचा कृषी विभागात ठिय्या

पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी शेतकऱ्यांचा कृषी विभागात ठिय्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधीची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने गेल्या सात ते आठ महिन्यांपासून तालुक्यातील शेतकरी कृषी विभागात फेऱ्या मारत आहेत. मात्र, रितसर अर्ज देऊन देखील काहीच काम होत नसल्याने संबंधित सर्व शेतकऱ्यांनी अखेर गुरूवारी (7) जळगावच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला …

The post पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी शेतकऱ्यांचा कृषी विभागात ठिय्या appeared first on पुढारी.

Continue Reading पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी शेतकऱ्यांचा कृषी विभागात ठिय्या

घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी स्वस्त

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क जागतिक महिला दिन – 2024 निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त नारी शक्तीला छानसे गिफ्ट दिले आहे. खुद्द पंतप्रधानांनी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी स्वस्त झाल्याची घोषणा केलेली आहे. नारी शक्तीकरीता घरगुती गॅसची किंमत कमी झाल्याने त्यांना लाख मोलाची मदत होणार असून महिलांचे बजेट सांभाळण्यास त्यांना आता मोठी मदतच …

The post घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी स्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी स्वस्त

श्री काळाराम मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते आरती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.८) सकाळी १० वाजेच्या सुमारास येतील प्रसिद्ध श्रीकाळारामाची महाआरती करण्यात आली. यावेळी मुलगा अमित ठाकरे व स्नुषा मिताली ठाकरे यांच्यासह मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मनसेचा १८ वर्धापनदिन शनिवारी (दि. ९) भाभा नगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी ९ वाजेपासून विविध कार्यक्रमांनी …

The post श्री काळाराम मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते आरती appeared first on पुढारी.

Continue Reading श्री काळाराम मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते आरती