लोकसभा निवडणूक 2024 : जिल्हास्तरीय समितीचा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीतील कायदा सुवस्था अबाधित राखण्यासाठी परवानाधारकांकडील अग्निशस्त्रे जमा करण्यात येणार आहेत. जिल्ह्यामध्ये ९४१ परवानाधारक असून त्यांच्याजवळ ९७९ शस्त्रे आहेत. त्यापैकी परवानाधारकांनी २२१ शस्त्रे ते वास्तव्यास असलेल्या हद्दीतील पोलिस ठाण्यामध्ये जमा करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा …

The post लोकसभा निवडणूक 2024 : जिल्हास्तरीय समितीचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभा निवडणूक 2024 : जिल्हास्तरीय समितीचा निर्णय

‘केबीसी’ मायाजालाच्या सुत्रधारावर महाराष्ट्रासह राजस्थानमध्येही गुन्हे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) केबीसी कंपनीचा संचालक भाऊसाहेब चव्हाण याच्याकडील ८४.२४ कोटी रुपयांच्या स्थावर व जंगम मालमत्तेवर तात्पुरती जप्ती आणली आहे. यासंदर्भात ईडीने गुरुवारी (दि.२१) माहिती दिली. मनी लॉडंरींग प्रतिबंधक कायद्यानुसार केलेल्या कारवाईत या मालमत्ता नाशिक जिल्ह्यासह ठाणे, सिंधुदुर्गसह राजस्थान राज्यात आहेत. भाऊसाहेब चव्हाण याने केबीसी मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या माध्यमातून मल्टीलेव्हल …

The post ‘केबीसी’ मायाजालाच्या सुत्रधारावर महाराष्ट्रासह राजस्थानमध्येही गुन्हे appeared first on पुढारी.

Continue Reading ‘केबीसी’ मायाजालाच्या सुत्रधारावर महाराष्ट्रासह राजस्थानमध्येही गुन्हे

मनसे एन्ट्रीमुळे शिंदेसेनेत अस्वस्थता; भाजपमध्येही नाराजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महायुतीच्या रिक्षाला मनसेचे इंजीन जोडले जाणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. नाशिकच्या जागेवरून महायुतीतील शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असताना, आता मनसेनेही नाशिकसह शिर्डीवर दावा केल्याने शिंदे सेनेत अस्वस्थता पसरली आहे. नाशिकची जागा मनसेला गेल्यास भाजपचा दावाही कायमस्वरूपी खोडला जाणार असल्यामुळे केंद्र …

The post मनसे एन्ट्रीमुळे शिंदेसेनेत अस्वस्थता; भाजपमध्येही नाराजी appeared first on पुढारी.

Continue Reading मनसे एन्ट्रीमुळे शिंदेसेनेत अस्वस्थता; भाजपमध्येही नाराजी

NMC : ४४ कोटींच्या वसुलीसाठी मनपाची जप्ती मोहीम सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महानगरपालिका मालकीच्या व्यापारी संकुलांमधील तब्बल दीड हजार गाळेधारकांकडील ४४.५८ कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी विविध कर विभागाने जप्ती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत गेल्या दोन दिवसांत शरणपूर मिनी मार्केटमधील पाच, यशवंत मंडईमधील चार, तर कथडा मार्केटमधील एक अशा प्रकारे 10 गाळे तसेच महात्मा फुले मार्केटमधील ओटा जप्त करण्यात आला आहे. येत्या …

The post NMC : ४४ कोटींच्या वसुलीसाठी मनपाची जप्ती मोहीम सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading NMC : ४४ कोटींच्या वसुलीसाठी मनपाची जप्ती मोहीम सुरू

रमजानचा पहिला खंड पूर्ण, दुसऱ्या खंडाची सुरुवात

जूने नाशिक: पुढारी वृत्तसेवा- पवित्र रमजान महिना सुरू होऊन गुरुवारी दहा दिवस अर्थात दहा रोजे पूर्ण झाले आहेत. मात्र, या महिन्यात रात्री पठण केली जाणार्‍या विशेष नमाजला (तरावीहला) बुधवारीच दहा दिवस पूर्ण झाले होते. या दहा दिवसांच्या काळालाच अशरा (टप्पा) म्हटले जाते. रमजान महिन्यात प्रत्येक दहा दिवसांचा कालावधी हा एक अशरा मानला जातो. यानुसार गुरुवारी …

The post रमजानचा पहिला खंड पूर्ण, दुसऱ्या खंडाची सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading रमजानचा पहिला खंड पूर्ण, दुसऱ्या खंडाची सुरुवात

तारवालानगरला तीन लाखांची घरफोडी

नाशिक : तारवालानगर येथील लामखेडे मळा परिसरात चोरट्याने घरफोडी करून तीन लाख तीन हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व मोबाइल चोरून नेला. प्रशांत ठाकरे (५२) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने बुधवारी (दि.२०) दुपारी घरफोडी करून दागिने व मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला आहे. महिला प्रवाशांचे दागिने लंपास नाशिक : नवीन मेळा व नाशिक …

The post तारवालानगरला तीन लाखांची घरफोडी appeared first on पुढारी.

Continue Reading तारवालानगरला तीन लाखांची घरफोडी

नाशिकच्या अंबडला फळ विक्रेत्याची हातगाडी डिझेल टाकून पेटवली

सिडको : पुढारी वृत्तसेवा– फळविक्रेत्या व्यावसायिकाच्या फळांच्या कॅरेटसह लोखंडी हातगाडा, वजनकाटा डिझेल टाकून पेटवून देत आर्थिक नुकसान केल्याची घटना कामटवाडा येथे घडली. या घटनेत फळविक्रेत्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्याने या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे. दरम्यान संशयिताने हातगाडी पेटवल्यानंतर मोटरसायकलवरुन पळ काढल्याची माहितीही मिळाली आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी कृष्ण …

The post नाशिकच्या अंबडला फळ विक्रेत्याची हातगाडी डिझेल टाकून पेटवली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या अंबडला फळ विक्रेत्याची हातगाडी डिझेल टाकून पेटवली

अरे बाप रे ! ग्रामसेवकानेच लांबवली 50 हजारांची रोकड ठेवलेली पिशवी

जळगाव : अमळनेर शहरातील कचेरी समोर दुचाकीला लावलेली ५० हजार रूपये ठेवलेल्या रोकडची पिशवी आणि महत्वाची कागदपत्रे ग्रामसेवक जितेंद्र पाटील यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक असे की, अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील विजय कैलास पाटील (वय २९) हे बांधकाम ठेकेदारीचा व्यवसाय करतात. ११ मार्च …

The post अरे बाप रे ! ग्रामसेवकानेच लांबवली 50 हजारांची रोकड ठेवलेली पिशवी appeared first on पुढारी.

Continue Reading अरे बाप रे ! ग्रामसेवकानेच लांबवली 50 हजारांची रोकड ठेवलेली पिशवी

रेल्वेत टीसी’ची नोकरी लावून देतो सांगून दोन भावांची फसवणूक, 30 लाखांना गंडा

जळगाव : भुसावळ शहरातील रेल्वे नॉर्थ कॉलनीत राहणाऱ्या दोघा भावांना रेल्वेमध्ये टीसी ची नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून दोघा भावांची तीस लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी दि. 20 रोजी भुसावळ शहर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ शहरातील रेल्वे नार्थ कॉलनीत राहणारे महेंद्र प्रकाश संसारे वय ४० हा तरूण आपल्या कुटुंबासह …

The post रेल्वेत टीसी'ची नोकरी लावून देतो सांगून दोन भावांची फसवणूक, 30 लाखांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading रेल्वेत टीसी’ची नोकरी लावून देतो सांगून दोन भावांची फसवणूक, 30 लाखांना गंडा

हरसुल-तोरंगण रोडवर प्रतिबंधित मद्यसाठा जप्त, सापळा रचून कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हरसुल-तोरंगण रोडवर सापळा रचून राज्यात प्रतिबंधित असलेली परराज्यातील विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. पथकाने ५९ हजार ५२० रुपयांचा विदेशी मद्यसाठा व कार असा एकूण २ लाख ९ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेला मद्यसाठा केवळ दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्री करता …

The post हरसुल-तोरंगण रोडवर प्रतिबंधित मद्यसाठा जप्त, सापळा रचून कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading हरसुल-तोरंगण रोडवर प्रतिबंधित मद्यसाठा जप्त, सापळा रचून कारवाई