नाशिक : धुमाकूळ घालणारा बिबट्या झाला जेरबंद

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा गोंदेगाव (ता. निफाड) येथील मका उत्पादक शेतकरी निवृत्ती आहेर या शेतकऱ्याच्या घराजवळ मक्याच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी (दि. 9) पहाटे सावजाच्या शोधात असलेला बिबट्या जेरबंद झाला आहे. नागरिकांना वारंवार दर्शन देत धुमाकूळ घालणारा हा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गोंदेगाव शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला …

The post नाशिक : धुमाकूळ घालणारा बिबट्या झाला जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धुमाकूळ घालणारा बिबट्या झाला जेरबंद

नाशिक : खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन! वाचविले माय लेकराचे प्राण

नाशिक/ निफाड : दीपक श्रीवास्तव, पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील सायखेडा येथे गोदावरी नदीवर असलेल्या पुलावरून उडी मारुन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या माय लेकराला सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कादरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या दक्षतेमुळे जीवदान मिळाले आहे. खाकी वर्दीतील माणुसकी वरील विश्वास वाढविणाऱ्या पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्राप्त माहितीनुसार, शुक्रवार दि. 9 सप्टेंबर रोजी …

The post नाशिक : खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन! वाचविले माय लेकराचे प्राण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन! वाचविले माय लेकराचे प्राण

नाशिक : सायखेड्याला बाप्पा आले होडीतून; म्हणाले, पुलावरुन अजिबात नको…(व्हिडीओ)

नाशिक (निफाड): पुढारी ऑनलाइन नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात गोदावरीच्या काठी वसलेलं सायखेडा हे एक सुंदर गाव आहे.  कांदा मार्केट आणि लगतच्या गावांची एक प्रमुख बाजारपेठ म्हणून सायखेड्याची ओळख तर आहेच शिवाय पौराणिक वारसा देखील सायखेड्याला प्राप्त आहे. परंतु गावात प्रवेश करण्यासाठी नाशिक ते औरंगाबाद महामार्गावरून सायखेड्याला पोचण्यासाठी पार करावा लागतो तो एक खूप जूना व …

The post नाशिक : सायखेड्याला बाप्पा आले होडीतून; म्हणाले, पुलावरुन अजिबात नको...(व्हिडीओ) appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सायखेड्याला बाप्पा आले होडीतून; म्हणाले, पुलावरुन अजिबात नको…(व्हिडीओ)

नाशिक : ज्येष्ठ नेते भास्करराव बोरस्ते यांचे निधन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील बँकिंग, शैक्षणिक, समाजकारण, राजकारण अशा विविध क्षेत्रांतील ज्येष्ठ नेते भास्करराव बोरस्ते यांचे बुधवारी (दि.31) वृद्धापकाळाने वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. निफाड तालुक्यातील साकोरे मिग येथे राहणारे भास्करराव बोरस्ते यांनी माध्यमिक शिक्षणानंतर बीवायके कॉलेज येथे पदवीचे शिक्षण घेतले. पुणे : हवालदारासह दोघांना लाच घेताना पकडले; निलंबित होमगार्डसह दोघांच्या विरुद्ध गुन्हा …

The post नाशिक : ज्येष्ठ नेते भास्करराव बोरस्ते यांचे निधन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ज्येष्ठ नेते भास्करराव बोरस्ते यांचे निधन

Nashik Crime : निफाडला दहा लाखांचा गांजा पकडला

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा कादवा पुलाजवळ गांजाची चोरटी वाहतूक करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात विशेष पोलिस पथकाला यश मिळाले. पथकाने टोळीकडील दहा लाख रुपये किमतीचा 196 किलो गांजा, स्कॉर्पिओ गाडी, मोबाइल यासह एकूण 15 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सोलापूर : शिक्षण विभागातील वादावर अखेर पडदा याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विशेष पोलिस पथकाला निफाड येथील …

The post Nashik Crime : निफाडला दहा लाखांचा गांजा पकडला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : निफाडला दहा लाखांचा गांजा पकडला

नाशिक : कोळवाडीत बिबट्याकडून वासराचा फडशा

नाशिक (गोंदेगाव) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील कोळवाडी – शंकरनगर येथील कापसे वस्तीवर शनिवारी (दि. 20) पहाटे 3.30 च्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून वासराचा फडशा पडला. नागरी वस्तीत आक्रमण करून पाळीव प्राण्यावर हल्ला करण्याची शंकरनगरमधील ही पहिलीच घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शंकरनगरमध्ये योगेश विष्णू कापसे यांची वस्ती आहे. त्यांच्या घरासमोरील वासरावर …

The post नाशिक : कोळवाडीत बिबट्याकडून वासराचा फडशा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोळवाडीत बिबट्याकडून वासराचा फडशा

नाशिक : पंधरवड्यापासून होत आहे बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

नाशिक (निफाड): पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील शिवडी, सोनेवाडी, उगांव परिसरात गेल्या पंधरवड्यापासुन बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. मात्र, वनविभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. ऑस्ट्रेलियात कोसळला अवकाशीय कचरा शिवडी परिसरातील सोनेवाडी रस्त्याजवळील कातकाडे वस्तीवर रविवारी दि. ७ रोजी मध्यरात्री बिबट्याने घरासमोरील ओट्यावर बसलेल्या श्वानाला ओढून नेत …

The post नाशिक : पंधरवड्यापासून होत आहे बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंधरवड्यापासून होत आहे बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

कोथिंबिरीने केले शेतकर्‍याला लखपती

नाशिक : लाला कुडके येवला तालुक्यातील पूर्व भागात राजापूर येथे बर्‍याच शेतकर्‍यांनी मूग पिकाऐवजी यावर्षी कोथिंबिरीची केलेली शेती त्यांना लखपती करून गेली. कोथिंबिरीचे आगार असलेल्या निफाड भागात अतिपावसामुळे कोथिंबीर पीक सडल्याने येवला तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्‍यांना बिघाभर क्षेत्रातील कोथिंबिरीला 75 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले असून, काही शेतकर्‍यांना पाच एकरांत कोथिंबिरीमुळे साडेसात लाख …

The post कोथिंबिरीने केले शेतकर्‍याला लखपती appeared first on पुढारी.

Continue Reading कोथिंबिरीने केले शेतकर्‍याला लखपती

Nashik Niphad : बिबट्याची स्वारी द्राक्षपंढरीच्या दारी, आढळले पावलांचे ठसे

नाशिक (उगांव ता. निफाड) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील शिवडी उगांव भागात गेल्या महिन्याभरापासून बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी निफाडच्या उत्तर भागातील नागरिकांनी केली आहे. निफाड तालुक्याच्या उत्तर भागात बिबट्याचा संचार वाढला आहे. दोन दिवसापूर्वी निफाड उगांव रोडवर एका मोटारसायकलस्वारावर बिबट्याने हल्ला केला होता. …

The post Nashik Niphad : बिबट्याची स्वारी द्राक्षपंढरीच्या दारी, आढळले पावलांचे ठसे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Niphad : बिबट्याची स्वारी द्राक्षपंढरीच्या दारी, आढळले पावलांचे ठसे

Nashik : निफाडवर शोककळा ; महाजनपूरच्या जवानाला राजस्थानमध्ये वीरमरण

नाशिक : (निफाड) : निफाड तालुक्यातील महाजनपूर येथील सुपुत्र वीरजवान रंगनाथ वामन पवार (44) यांना राजस्थान येथे भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत असताना वीर मरण आल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने निफाड तालुक्यावर शोककळा पसरली असून त्यांच्या मृत्यूचे अद्याप कारण समजू शकलेले नाही. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई-वडिल असा परिवार आहे. रंगनाथ वामन पवार यांचे …

The post Nashik : निफाडवर शोककळा ; महाजनपूरच्या जवानाला राजस्थानमध्ये वीरमरण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : निफाडवर शोककळा ; महाजनपूरच्या जवानाला राजस्थानमध्ये वीरमरण