‘त्या’ वक्तव्यावरून शरद पवार गट बॅकफूटवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार जे. पी. गावित यांच्या नाराजीचा फटका थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता बळावल्याने शरद पवार गटाच्या नेत्यांनी रविवारी (दि.५) तातडीची पत्रकार परिषद घेतली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नाशिक दाैऱ्यातील वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगत गावितांप्रती आम्हाला आदर असल्याचा खुलासा करण्याची वेळ आघाडीच्या नेत्यांवर ओढावली. नाशिक …

Continue Reading ‘त्या’ वक्तव्यावरून शरद पवार गट बॅकफूटवर

Lok Sabha election 2024 : लोकसभेच्या रणात आमदारांचीही प्रतिष्ठा पणाला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उमेदवारी घोषणेला झालेला विलंब आणि बंडखोर-अपक्षांमुळे निर्माण झालेला मतविभागणीचा धोका विजयाचा मार्ग खडतर बनविणारा ठरू नये यासाठी महायुतीने उमेदवाराच्या प्रचाराची भक्कम तटबंदी उभारताना घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना दिलेले मतांचे टार्गेटही आता चर्चेत आले आहे. विशेषत: नाशिक लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या तीन व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन्ही आमदारांच्या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला …

Continue Reading Lok Sabha election 2024 : लोकसभेच्या रणात आमदारांचीही प्रतिष्ठा पणाला

निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणेची जय्यत तयारी; संवेदनशील केंद्रांवर पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहार पोलिसांनी शहरातील सर्व मतदान केंद्रांची पाहणी करीत त्यासंदर्भातील अहवाल महासंचालक कार्यालयास सादर केला आहे. यात शहरातील संवेदनशील मतदान केंद्रांचीही माहिती आहे. तसेच मतदानाच्या वेळी अतिरिक्त बंदाेबस्ताची मागणी करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार विशेष शाखेच्या निवडणूक कक्षासह शहर पोलिसांनी मतदान केंद्रांची पाहणी केली. पोलिस …

Continue Reading निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणेची जय्यत तयारी; संवेदनशील केंद्रांवर पाहणी

लोकसभेसाठी आज माघारी, चिन्हांचेही होणार वाटप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी सोमवारी (दि. ६) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. दोन्ही मतदारसंघांतून ५१ उमेदवार रिंगणात आहेत. महायुती व महाआघाडीतील बंडखोरांनीदेखील अर्ज भरल्याने पक्षाच्या प्रमुख उमेदवारांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे दुपारी तीनपर्यंत माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर जिल्ह्यातील अंतिम लढतींचे चित्र स्पष्ट होईल. जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक महत्त्वपूर्ण …

Continue Reading लोकसभेसाठी आज माघारी, चिन्हांचेही होणार वाटप

आज फैसला : अपक्षांसह वंचितच्या उमेदवाराच्या माघारीसाठी प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागील काही लोकसभा निवडणुकांचा विचार केल्यास, युती आणि आघाडीच्या उमेदवारांना वंंचितसह अपक्षांच्या टेकूची गरज भासल्याचे दिसून आले. त्यासाठी युतीकडून वंचितला, तर आघाडीकडून अपक्षांंना प्रोत्साहन दिले गेले. यावेळी मात्र नाशिक लाेकसभा मतदारसंघात अपक्षांसह वंचित महायुतीसह, महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता असल्याने, दोन्हीकडून अपक्ष अन् वंचित उमेदवारांच्या माघारीसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. …

Continue Reading आज फैसला : अपक्षांसह वंचितच्या उमेदवाराच्या माघारीसाठी प्रयत्न

नाराज करंजकर शिंदे गटात? रात्री उशिरा घेतली मुख्यमंत्री भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी रविवारी (दि.५) रात्री उशिरा ठाण्यात मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांची भेट घेतली असून ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून करंजकर यांची ओळख आहे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदावर ते गेल्या १३ …

Continue Reading नाराज करंजकर शिंदे गटात? रात्री उशिरा घेतली मुख्यमंत्री भेट

आज माघारीच्या दिनी हरिश्चंद्र चव्हाण यांची काय असेल भूमिका?

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण निवडणूक लढविणार की, माघार घेणार याकडे लक्ष लागून आहे. त्यांच्या या भूमिकेनंतरच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. चव्हाण यांनी भाजपकडून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, भाजपने केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनाच पुन्हा एकदा तिकीट …

Continue Reading आज माघारीच्या दिनी हरिश्चंद्र चव्हाण यांची काय असेल भूमिका?

जे. पी. गावितांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने माघारीचा सस्पेन्स कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपाने माघार घेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. पण मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेले माकपाचे अधिकृत उमेदवार जे. पी. गावित हे सोमवारी (दि.६) अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे. त्यामुळे माघारीवरून अद्याप तरी संदिग्धता आहे. लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघाच्या उमेदवारी माघारीसाठी अवघे काही तास उरले असतानाच नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत …

Continue Reading जे. पी. गावितांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने माघारीचा सस्पेन्स कायम

व्यूव्हरचनेचे फळ मिळाले, बोरस्ते यांची पक्षाच्या उपनेतेपदी बढती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) पक्ष संघटना वाढीसाठी घेतलेले परिश्रम आणि लोकसभा निवडणुकीत नाशिकची उमेदवारी पक्षाकडेच राहावी, यासाठी यशस्वीरित्या आखलेली व्यूव्हरचनेचे फळ जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांना मिळाले असून, मुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांना पक्षाच्या उपनेतेपदी बढती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह उध्दव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ …

Continue Reading व्यूव्हरचनेचे फळ मिळाले, बोरस्ते यांची पक्षाच्या उपनेतेपदी बढती

नाशिक लोकसभा मतदासंघातून इच्छुक असलेल्या महाराजांचा अर्ज अपात्र

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क जय बाबाजी भक्त परिवाराचे व नाशिक लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असलेले शांतीगिरी महाराज एबी फॉर्म न जोडल्यामुळे पक्षाकडून दाखल केलेले अर्ज बाद झाला आहेत. शांतीगिरी महाराज यांनी मागील आठवड्यातच शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. जय बाबाजी भक्त परिवाराने विडा उचलला असून या वेळेला लढायचं आणि …

The post नाशिक लोकसभा मतदासंघातून इच्छुक असलेल्या महाराजांचा अर्ज अपात्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक लोकसभा मतदासंघातून इच्छुक असलेल्या महाराजांचा अर्ज अपात्र