नाशिक : पाण्यातून वाट काढतच गाठावी लागते शाळा, पालकांचा जीव रोजच टांगणीला

वाहेगावसाळ : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा  चांदवड तालुक्यातील रेडगाव खुर्द येथील पाटे रस्ता ते म्हसोबा मंदिर पर्यंतचा प्रवास शाळकरी मुलांसाठी मोठी कसरत आहे. सुरक्षित रस्त्याअभावी येथील शाळकरी मुलांना पाण्यातूनच वाट काढत शाळा गाठावी लागत आहे. चिमुकल्यांना रोजच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. मुले घरी सुरक्षित पोहचेपर्यंत पालकांचा जीव टांगणीला असतो. नदीला पाणी असल्याने आम्हाला …

The post नाशिक : पाण्यातून वाट काढतच गाठावी लागते शाळा, पालकांचा जीव रोजच टांगणीला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाण्यातून वाट काढतच गाठावी लागते शाळा, पालकांचा जीव रोजच टांगणीला

नाशिकच्या कोणार्कनगरमधून सहा मुलांचे अपहरण झाल्याचा मेसेज व्हायरल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाल्यानंतर शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये अपहरणाचे गुन्हे दाखल केले जातात. मात्र, काही अतिउत्साही नागरिकांकडून कोणतीही खातरजमा न करता ‘कोणार्कनगरमधून सहा मुलांचे अपहरण’ अशा आशयाचे चुकीचे मेसेज व्हायरल करून अफवा पसरवत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, त्याचा फटका इतर सर्वसामान्य नागरिकांनाही बसत आहे. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कपडे विक्रेत्यांनाही …

The post नाशिकच्या कोणार्कनगरमधून सहा मुलांचे अपहरण झाल्याचा मेसेज व्हायरल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या कोणार्कनगरमधून सहा मुलांचे अपहरण झाल्याचा मेसेज व्हायरल

नाशिक : भरपावसात रस्त्यावरच करावे लागले अंत्यसंस्कार

वणी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या व वणी बाजूकडून गडावर (रडतोंडी पायरी मार्ग) जाणार्‍या मार्गावरील चंडीकापूर गावात स्मशानभूमीच नसल्याने ग्रामस्थांना भरपावसात रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. मृत आत्म्याच्या वेदना मृत्यूनंतरही संपत नसल्याचा प्रत्यय नुकताच आला. अंतिम संस्कारावेळीसुद्धा पार्थिवाला होणार्‍या यातना पाहून शोकाकुल नातेवाइक व ग्रामस्थ अधिकच गहिवरले. सप्तशृंगगड, चंडीकापूर परिसरात गेल्या चार-पाच …

The post नाशिक : भरपावसात रस्त्यावरच करावे लागले अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भरपावसात रस्त्यावरच करावे लागले अंत्यसंस्कार

नाशिकमध्ये शिवसेनेकडून रामदास कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबीयांवर केलेल्या विधानाच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मंगळवारी (दि.20) शिवसेनेतर्फे आंदोलन करत शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. दापोली येथे झालेल्या एका कार्यक्रमात कदम यांनी ठाकरे कुटुंबीयांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून, नाशिक शहरातही त्याचे …

The post नाशिकमध्ये शिवसेनेकडून रामदास कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये शिवसेनेकडून रामदास कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

नाशिक : शारीरिक संबंधास नकार दिल्याने तरुणीचे अश्लील फोटो केले व्हायरल

नाशिक : तरुणीने शारीरिक संबंधास नकार दिल्याने एकाने तरुणीचे अश्लील फोटो व मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करीत तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित रोहन बंजारा (रा. नंदुरबार) याने 1 जून ते 19 सप्टेंबर 2022 दरम्यान विनयभंग केला असून, त्याच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेताना …

The post नाशिक : शारीरिक संबंधास नकार दिल्याने तरुणीचे अश्लील फोटो केले व्हायरल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शारीरिक संबंधास नकार दिल्याने तरुणीचे अश्लील फोटो केले व्हायरल

नाशिक : अमृत महोत्सव रोषणाईचा लखलखाट 14 लाखांचा!, आयुक्तांचेही दिपले डोळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील काही संधीसाधूंनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संधी साधत महापालिकेवर केलेल्या विद्युत रोषणाईतही आपले हात धुवून घेतले. मनपाच्या राजीव गांधी भवनावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईपोटी 14 लाख 10 हजार रुपये इतके बिल आकारण्यात आले असून, याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी (दि.20) स्थायी समितीकडे सादर झाला. त्यावर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनीही आश्चर्य व्यक्त करत …

The post नाशिक : अमृत महोत्सव रोषणाईचा लखलखाट 14 लाखांचा!, आयुक्तांचेही दिपले डोळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अमृत महोत्सव रोषणाईचा लखलखाट 14 लाखांचा!, आयुक्तांचेही दिपले डोळे

नाशिकमध्ये वन्यजीवांच्या अवयवांची पुन्हा तस्करी; तिघे संशयित जेरबंद

नाशिक: पुढारी वृत्तसेवा शहराचा उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृषीनगर जॉगिंग ट्रॅकजवळील सायकल सर्कल येथे बिबट्याची कातडी, चिंकाराचे दोन शिंगे आणि नीलगायीचे दोन शिंगे या वन्यजीवांच्या अवयवांची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघा संशयित तरुणांना वनपथकाने सापळा रचत जेरबंद केले आणि वन्यजीवांच्या अवयवांच्या तस्करीचा आणखी एक प्रकार उधळला. दहा दिवसांपूर्वी इगतपुरीच्या वन्यजीव तस्करीचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा …

The post नाशिकमध्ये वन्यजीवांच्या अवयवांची पुन्हा तस्करी; तिघे संशयित जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये वन्यजीवांच्या अवयवांची पुन्हा तस्करी; तिघे संशयित जेरबंद

Gulabrao Patil : आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाचा, ठाकरेंचा पवार-गांधी यांच्या मिक्स विचारांचा

जळगाव : शिवसेनेतील फुटीनंतर यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. परंतु, आमचा मेळावा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा असून ठाकरे सेनेचा दसरा मेळावा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या मिक्स विचारांचा मेळावा असेल, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आमचं नातं हिंदुत्वाशी आहे. त्यामुळे त्यांचे नात कोणाशी आहे? …

The post Gulabrao Patil : आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाचा, ठाकरेंचा पवार-गांधी यांच्या मिक्स विचारांचा appeared first on पुढारी.

Continue Reading Gulabrao Patil : आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाचा, ठाकरेंचा पवार-गांधी यांच्या मिक्स विचारांचा

नाशिकमध्ये ‘वेदांता’वरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक, महसूल समोर आंदोलन

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा वेदांता व पॉस्कोन प्रकल्प केंद्र शासनाने गुजरातला स्थलांतरित करित महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगार केल्याचा आरोप करीत नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे महसूल आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हा प्रकल्प हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असलेल्या तळेगाव येथे होणार होता. परंतु अचानकपणे हा प्रकल्प गुजरातला पळविण्यात …

The post नाशिकमध्ये 'वेदांता'वरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक, महसूल समोर आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ‘वेदांता’वरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक, महसूल समोर आंदोलन

नाशिक : खेळता खेळता लहान मुलाने गिळलं नेलकटर

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा  : आतापर्यंत तुम्ही बाळाने नाणे गिळल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. पण, नाशिकमध्ये एका आठ महिन्याच्या बाळाने चक्क नेलकटर गिळल्याची घटना घडली आहे.  बाळाने खेळता-खेळता नेलकटर गिळल्याचा हा प्रकार येथील नाशिकरोड भागात घडला. येथील के. जे मेहता शाळा परिसरात वास्तव्यास असलेल्या एका आठ महिन्याच्या मुलाने खेळता खेळता नेलकटर गिळले. आडगाव येथील डॉ. वसंतराव …

The post नाशिक : खेळता खेळता लहान मुलाने गिळलं नेलकटर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खेळता खेळता लहान मुलाने गिळलं नेलकटर