नाशिक : लाच मागणाऱ्या प्रांतधिकाऱ्याविरोधात विरोधात गुन्हा दाखल

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : खासगी कंपनीची जमीन एनए करण्याच्या मोबदल्यात ४० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी दिंडोरीचे प्रांताधिकारी निलेश अपार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत निलेश अपार (३७, रा. स्वामी बंगला, शासकीय विश्रामगृह, दिंडोरी) असे लाच …

The post नाशिक : लाच मागणाऱ्या प्रांतधिकाऱ्याविरोधात विरोधात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाच मागणाऱ्या प्रांतधिकाऱ्याविरोधात विरोधात गुन्हा दाखल

धुळे : अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी तरुणास सक्त मजुरीची शिक्षा

धुळे; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला तीन वर्ष सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश श्रीमती यास्मिन देशमुख यांनी सुनावली आहे. धुळे तालुक्यातील एका गावात १३ वर्षे वयाची पीडिता अंगणाबाहेर तिच्या आई समवेत झोपलेली असताना राहुल बाळू पाटील उर्फ राहुल अरुण पाटील या तरुणाने त्या अल्पवयीन मुलीस झोपेतून उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न …

The post धुळे : अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी तरुणास सक्त मजुरीची शिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी तरुणास सक्त मजुरीची शिक्षा

उद्धव ठाकरे : शिवसैनिकांनी सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी करावी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा ‘शिवसैनिकांनी सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी करून पक्षाचे नाव उज्वल करा’, असे आवाहन ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. नुकत्याच झालेल्या नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे नाशिक लोकसभासह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड त्याचप्रमाणे सुधाकर जाधव, योगेश नागरे, अरुण जाधव, श्रीराम गायकवाड, रंजना बोराडे हे संचालक निवडून आले आहेत. त्याचप्रमाणे …

The post उद्धव ठाकरे : शिवसैनिकांनी सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी करावी appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव ठाकरे : शिवसैनिकांनी सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी करावी

नाशिक : दंगलीची अफवा पसरताच पाथर्डी फाट्यावर पोलिसांचा ताफा सज्ज!

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पाथर्डीफाटा येथे दंगल झाल्याच्या अफवेने अंबड पोलिस ठाण्यासह इंदिरानगर व सातपूर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाथर्डी फाटा येथे मोठ्या प्रमाणात पोलिस ताफा पाहून नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. परंतु मॉकड्रिल असल्याचे समजल्यावर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.  सिडको परिसरात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जातीय दंगा झाला असल्याचा …

The post नाशिक : दंगलीची अफवा पसरताच पाथर्डी फाट्यावर पोलिसांचा ताफा सज्ज! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दंगलीची अफवा पसरताच पाथर्डी फाट्यावर पोलिसांचा ताफा सज्ज!

नाशिक : बजरंगवाडी हाणामारी प्रकरणातील २० गुन्हेगार तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्च महिन्यात वर्चस्ववादातून बजरंगवाडी येथे दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामधील २० गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. पिंपरी: नोकरीच्या आमिषाने सतरा जणांची …

The post नाशिक : बजरंगवाडी हाणामारी प्रकरणातील २० गुन्हेगार तडीपार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बजरंगवाडी हाणामारी प्रकरणातील २० गुन्हेगार तडीपार

पिंपळनेर : विद्यार्थ्यांनी वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवले

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा डांगशिरवाडे येथे शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक २ तसेच दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. वारकरी संप्रदायाची टाळ दिंडी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख आहे. हा अनमोल ठेवा पुढील पिढीने ही जतन करावा या हेतूने मुख्याध्यापक श्रीकांत दिलीप अहिरे, शिक्षक गोविंद ग्यानदेव बागुल, राजू रुधा ठाकरे …

The post पिंपळनेर : विद्यार्थ्यांनी वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवले appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : विद्यार्थ्यांनी वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवले

जळगाव : पाण्याची मोटर सुरु करताना विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शेतात विहिरीवरील पाण्याची मोटर सुरु करताना विजेचा धक्का लागल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना जळगाव तालुक्यातील धानोरा गावात घडली असून, याप्रकरणी बुधवारी (दि.२८) जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील धानोरा गावात सुनिल खंडू धनगर (३०) हा तरूण शेतीचे कामे करून  …

The post जळगाव : पाण्याची मोटर सुरु करताना विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पाण्याची मोटर सुरु करताना विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार

नाशिक : कर्तव्यात कसूर केल्याने तीन पोलीस निलंबित

इगतपुरी (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा घोटी सिन्नर मार्गावरील गंभीरवाडी जवळ गोवंश रक्षकांनी एका स्विफ्ट कार मधील दोन जनांना मारहाण केल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा ठपका ठेवत कर्तव्यात कसूर केली म्हणुन घोटी पोलीस ठाण्यातील तीन पोलीसांना निलंबित करण्यात आले आहे. तर सहायक पोलीस निरीक्षक श्रध्दा गंधास यांची नाशिक येथील पोलीस नियंत्रण कक्ष येथे …

The post नाशिक : कर्तव्यात कसूर केल्याने तीन पोलीस निलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कर्तव्यात कसूर केल्याने तीन पोलीस निलंबित

Bakri Eid : सुरगाण्यात बकरी ईदची कुर्बानी दुसऱ्या दिवशी

सुरगाणा : आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कुर्बानी देण्याचा स्वागतार्ह निर्णय सुरगाणा येथील मुस्लिम बांधवांनी घेतला असून या निर्णयाचे स्वागत हिंदू बांधवांनी केले आहे. आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी (गुरुवारी) आली आहे. हिंदू बांधव आषाढी एकादशीला उपवास करतात आणि मुस्लिम बांधव आपापल्या रितीरिवाजा प्रमाणे बकऱ्याची कुर्बानी …

The post Bakri Eid : सुरगाण्यात बकरी ईदची कुर्बानी दुसऱ्या दिवशी appeared first on पुढारी.

Continue Reading Bakri Eid : सुरगाण्यात बकरी ईदची कुर्बानी दुसऱ्या दिवशी

धुळे : भाविकांसाठी दीड टन केळी पंढरपूरला रवाना

धुळे : पुढारी वृत्तसेवा आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूर येथे गेलेल्या भाविकांना धुळे तालुक्यातील उडाणे येथील ह.भ.प.धर्मराज बागुल, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने केळीचे वाटप करण्यात येणार आहे. पंढरपूर येथे भाविकांना केळी वाटपाचे हे दुसरे वर्ष आहे. त्यासाठी आज सुमारे दिड टन केळी वाहनाने पंढरपूरकडे रवाना झाली आहे. त्या पाश्‍वभूमीवर माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हस्ते दिड टन केळीने …

The post धुळे : भाविकांसाठी दीड टन केळी पंढरपूरला रवाना appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : भाविकांसाठी दीड टन केळी पंढरपूरला रवाना