विधानसभा उपाध्यक्षांच्या ‘त्या’ पत्राने मिनी मंत्रालयात खळबळ

नाशिक: पुढारी वृत्तसेवा- विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून जिल्हा परिषदेच्या ठेकेदाराने निविदासोबत जोडलेल्या बनावट कागदपत्रांची तपासणी करत फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. या कागदपत्रांची वैधता तपासण्याचे काम सुरू आहे. तपासणीनंतर त्यात सत्यता आढळल्यास संबंधिताविरोधात फौजदार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही …

The post विधानसभा उपाध्यक्षांच्या 'त्या' पत्राने मिनी मंत्रालयात खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading विधानसभा उपाध्यक्षांच्या ‘त्या’ पत्राने मिनी मंत्रालयात खळबळ

गोडसेंचे नाव जाहीर केलेच कसे? मंत्री भुजबळांचा श्रीकांत शिंदेंना सवाल

नाशिक: पुढारी वृत्तसेवा- तीन दिवसांपुर्वी नाशिकमधील शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या लोकसभेसाठी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केली. तेव्हापासून महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. यावर भाजपचे मंत्री गिरीष महाजन यांनी टिका केल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही टिकेची झोड उडवली आहे. नागरी पुरवठामंत्री भुजबळ यांनी याबाबतीत जागावाटपाबाबत चर्चा सुरु असताना गोडसेंचे …

The post गोडसेंचे नाव जाहीर केलेच कसे? मंत्री भुजबळांचा श्रीकांत शिंदेंना सवाल appeared first on पुढारी.

Continue Reading गोडसेंचे नाव जाहीर केलेच कसे? मंत्री भुजबळांचा श्रीकांत शिंदेंना सवाल

मनोज जरांगे पाटील यांनी नाशिकमध्ये जाऊन विलास पांगारकर यांची घेतली भेट

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा- आचारसंहीता लागण्यापुर्वी सगेसोयरेचा निर्णय घेतला पाहिजे. मराठा आरक्षणाचे सरकारला गांभीर्य नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये. नाहीतर राजकीय नेत्यांच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही. असा इशारा मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. नाशिकमध्ये मराठा आरक्षणावेळी आंदोलन करणारे नेते विलास पांगारकर यांचा अपघात झाल्याने …

The post मनोज जरांगे पाटील यांनी नाशिकमध्ये जाऊन विलास पांगारकर यांची घेतली भेट appeared first on पुढारी.

Continue Reading मनोज जरांगे पाटील यांनी नाशिकमध्ये जाऊन विलास पांगारकर यांची घेतली भेट

तापी काठावरील १२ गावांचा पाणी प्रश्न सुटणार : विजयकुमार गावित

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील पाणी टंचाई असेलेले १७ गावांचे विहिरी आणि विंधनविहिरी अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव सादर झालेले असून तीन ते चार प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे. उर्वरित प्रस्तावाना या दोन दिवसात मान्यता मिळेल जेणेकरुन विहिरी व विंधन विहिरी लवकर अधिग्रहित होतील. त्याचबरोबर तापी काठावरील बारा गावांमधील पाणीटंचाईचा ही प्रश्न सुटणार असून येत्या पंधरा दिवसात …

The post तापी काठावरील १२ गावांचा पाणी प्रश्न सुटणार : विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading तापी काठावरील १२ गावांचा पाणी प्रश्न सुटणार : विजयकुमार गावित

महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ कार्यकारणी मध्ये धुळ्याचा सन्मान, सचिवपदी ॲड. संजीव वाणी, कार्यकारिणीत मंजुळ शाह

धुळे पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पुणे येथे महामंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पारेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मंडळाच्या सचिवपदी धुळे येथील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.संजीव वाणी यांची निवड करण्यात आली. कार्यकारणीत धुळ्याच्या मंजुळ शाह यांचा समावेश आहे. सभेत २०२४ – २०२८ या चार वर्षासाठी महामंडळाच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामध्ये …

The post महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ कार्यकारणी मध्ये धुळ्याचा सन्मान, सचिवपदी ॲड. संजीव वाणी, कार्यकारिणीत मंजुळ शाह appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ कार्यकारणी मध्ये धुळ्याचा सन्मान, सचिवपदी ॲड. संजीव वाणी, कार्यकारिणीत मंजुळ शाह

‘थोडी शिस्त पाळली पाहिजे’ मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना भुजबळांनी सुनावलं

पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीत चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकची जागा धनुष्णबाणाकडेच राहील व विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील अशी घोषणा नाशिकमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली. त्यानंतर भाजपमधून या घोषणेला विरोध झाला. त्यावर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली …

The post 'थोडी शिस्त पाळली पाहिजे' मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना भुजबळांनी सुनावलं appeared first on पुढारी.

Continue Reading ‘थोडी शिस्त पाळली पाहिजे’ मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना भुजबळांनी सुनावलं

मध्यरात्री झोपडीला आग, १९ शेळ्यांचा होरपळून मृत्यू

जळगांव- अमळनेर तालुक्यातील झाडी येथे (दि. १५) रोजी मध्यरात्री २.३० वाजेला लागलेल्या भीषण आगीत १९ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. यात तीन लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक असे की, अमळनेर तालुक्यातील झाडी येथे शिवदास यादव भिल हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून शेळी पालन करून ते आपला उदरनिर्वाह करतात. घराच्या मागील बाजूस असलेल्या झोपडीत बकऱ्या बांधलेल्या …

The post मध्यरात्री झोपडीला आग, १९ शेळ्यांचा होरपळून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading मध्यरात्री झोपडीला आग, १९ शेळ्यांचा होरपळून मृत्यू

नाशिकच्या जागेबाबत सस्पेन्स कायम, महाजन म्हणाले तो निर्णय…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिकमध्ये शिवसेनेचा खासदार असून विद्यमान खासदार ज्या पक्षाचा असेल, त्याच पक्षाला जागा साेडण्याचा निर्णय महायुतीत झाला आहे. काही जागांवर उमेदवारांची अदलाबदल होण्याची शक्यता असून नाशिकच्या जागेबद्दल राज्यातील वरिष्ठ पातळीवरील नेते निर्णय घेतील, असे सूचक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. महाजनांच्या वक्तव्यानंतर नाशिकमधील उमेदवाराचा सस्पेंन्स वाढला आहे. कॉग्रेसचे खासदार राहुल गांधी …

The post नाशिकच्या जागेबाबत सस्पेन्स कायम, महाजन म्हणाले तो निर्णय... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जागेबाबत सस्पेन्स कायम, महाजन म्हणाले तो निर्णय…

राजकीय पक्षांच्या सोशल मीडियावरील प्रचारावर ठेवणार ‘वॉच’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्षांच्या सोशल मीडियावरील प्रचारावर वॉच ठेवण्यात येणार आहे. उमेदवार व राजकीय पक्षांनी सोशल मीडियावर प्रचारावेळी निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केली आहे. (Lok Sabha Election 2024) गेल्या काही वर्षांत निवडणुकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराचा नवीन फंडा समोर …

The post राजकीय पक्षांच्या सोशल मीडियावरील प्रचारावर ठेवणार 'वॉच' appeared first on पुढारी.

Continue Reading राजकीय पक्षांच्या सोशल मीडियावरील प्रचारावर ठेवणार ‘वॉच’

राजकीय पक्षांच्या सोशल मीडियावरील प्रचारावर ठेवणार ‘वॉच’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्षांच्या सोशल मीडियावरील प्रचारावर वॉच ठेवण्यात येणार आहे. उमेदवार व राजकीय पक्षांनी सोशल मीडियावर प्रचारावेळी निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केली आहे. (Lok Sabha Election 2024) गेल्या काही वर्षांत निवडणुकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराचा नवीन फंडा समोर …

The post राजकीय पक्षांच्या सोशल मीडियावरील प्रचारावर ठेवणार 'वॉच' appeared first on पुढारी.

Continue Reading राजकीय पक्षांच्या सोशल मीडियावरील प्रचारावर ठेवणार ‘वॉच’